न्यायदेवतेच्या नवीन मूर्तीचे अनावरण
New statue of “Lady Justice”
बातम्यांमध्ये :
• सुप्रीम कोर्टाने नुकतेच न्यायदेवतेच्या नवीन मूर्तीचे अनावरण केले.
Subject : GS - राज्यशास्त्र, न्यायमंडळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) न्यायदेवतेच्या नवीन मूर्ती बद्दल खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.
A. न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली.
B. हातातील तलवारीची जागा भारतीय संविधानाने घेतली.
C. विनोद गोस्वामी यांनी न्यायदेवतेची नवीन मूर्ती तयार केली.
पर्याय :
1. A आणि B बरोबर
2. B आणि C बरोबर
3. A आणि C बरोबर
4. A, B आणि C बरोबर
उत्तर : A, B आणि C बरोबर
न्यायदेवतेची नवीन मूर्ती कशी आहे ?
• नवीन मूर्ती पूर्णपणे भारतीय परंपरेला अनुसरून तयार केली आहे.
• यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे.
• न्यायदेवतेच्या मूर्तीत आणखी एक मोठा बदल म्हणजे तिच्या हातातील तलवारीची जागा भारतीय संविधानाने घेतली आहे.
• न्यायदेवतेच्या उजव्या हातात पूर्वीप्रमाणेच तराजू आहे.
• ही मूर्ती पांढऱ्या शुभ्र रंगाची असून, न्यायदेवता साडी परिधान करून आहे.
• तिच्या डोक्यावर मुकूट, कपाळावर टिकली, कानात आणि गळ्यात पारंपरिक भारतीय आभूषणे आहेत.
न्यायदेवतेची नवीन मूर्ती कोणी तयार केली ?
विनोद गोस्वामी यांनी न्यायदेवतेची नवीन मूर्ती तयार केली.
हातातील तलवारी ऐवजी भारतीय संविधान का ?
• सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या मते, तलवार हे हिंसेचे प्रतीक आहे.
• न्यायालये हिंसाचाराद्वारे न्याय देत नाहीत तर घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात.
• त्यामुळे दुसऱ्या हातात तलवार ऐवजी संविधान असावे जो प्रत्येकाला समान न्याय देतो.
जुन्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीचा अर्थ काय होतो ?
• न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हे सूचित करते की न्याय निःपक्षपाती असल्याचे गृहित धरले जाते.
• न्यायदान करणारी व्यक्ती निःपक्ष आहे, ती न्याय देण्यापूर्वी रंग, वर्ण, समाजातील स्थान या व अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता न्याय देते.
• तुम्ही श्रीमंत असो की गरीब, शक्तिशाली असो वा कमकुवत, प्रत्येकाला समान वागणूक दिली पाहिजे.
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी का काढण्यात आली ?
• "न्याय आंधळा आहे" हा जुना गैरसमज दूर करण्यासाठी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली.
• नवीन प्रतिमेत न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी नाही. जे असे दर्शवते करते की न्याय प्रत्येक परिस्थितीबद्दल जागरूक आणि संवेदनशील असावा.
• न्यायदान पद्धत प्रत्येक खटल्याची (केसची) परिस्थिती पाहते आणि विचार करते.
न्यायदेवतेच्या हातातील तराजू काय सांगतो ?
न्याय देण्यापूर्वी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली जाते व दोघांनाही समसमान न्यायाने जोखले जाते हे दर्शविण्यासाठी न्यायदेवतेच्या हातात तराजू दाखविलेला असतो.
न्यायदेवतेच्या मूर्ती ची कथा काय आहे ?
• न्यायदेवतेच्या प्रतिमेचे मूळ ग्रीक आणि रोमन पौराणिक कथांमध्ये आहे.
• ग्रीक पौराणिक कथांमध्ये, "थेमिस" ही न्यायप्रिय, हुशार आणि चांगला सल्ला दर्शवणारी देवी आहे.
• ती सहसा एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार धरलेली दाखवली जाते.
• तराजू संतुलन तर तलवार न्यायाची अंमलबजावणी करण्याची शक्ती यांचे प्रतीक आहे.
• रोमन पौराणिक कथा : रोमन पौराणिक कथांमध्ये, पहिला सम्राट ऑगस्टसने (Augustus) न्यायाची देवी जस्टिटियाची ओळख करून दिली. थेमिसप्रमाणे, जस्टिटियाकडे तराजू आणि तलवार होती.
परदेशातील न्यायदेवता भारतात कशी आली ?
• हा पुतळा ग्रीसमधून ब्रिटनला पोहोचला.
• १७ व्या शतकात ब्रिटीश अधिकाऱ्याने तो पहिल्यांदा भारतात आणला होता. हा ब्रिटिश अधिकारी कोर्ट ऑफिसर होता.
• 18 व्या शतकात ब्रिटीश काळात न्याय देवीची मूर्ती सार्वजनिक वापरात आणली गेली.
• पुढे देश स्वतंत्र झाल्यावर आपणही न्यायदेवतेचा स्वीकार केला.