
गोबर धन योजना

अलीकडेच केंद्रीय जलशक्ती मंत्री (Union Minister for Jal Shakti) यांनी गोबर धन योजनेसाठी युनिफाईड रजिस्ट्रेशन पोर्टल लॉन्च केले.
गोबर धन योजना :
GOBARdhan Yojna - गॅल्वनायइजिंग ऑरगॅनिक बायो - ऍग्रो रिसोर्सेस धन योजना
Galvanizing Organic Bio- Agro Resources Dhan Scheme
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा II कार्यक्रमांतर्गत सरकारने ही योजना सुरू केली.
• मंत्रालय: जलशक्ती मंत्रालय (Ministry of Jal Shakti)
• उद्दिष्टे: गावे स्वच्छ ठेवणे, ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढवणे आणि गुरांच्या शेणापासून आणि सेंद्रिय कचऱ्यापासून ऊर्जा आणि सेंद्रिय खत तयार करणे.
गोवर्धन योजनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यात एक क्लस्टर तयार करून देशातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आणि संसाधन फायदे देखील प्रदान केले जातील.
युनिफाईड रजिस्ट्रेशन पोर्टल
या पोर्टल द्वारे कोणत्याही सरकारी, सहकारी किंवा खाजगी संस्थांना भारतात Biogas / CBG / Bio-CNG प्लांट उभारण्यासाठी रजिस्ट्रेशन करून नोंदणी क्रमांक मिळवता येईल.