आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस
दरवर्षी 30 जून रोजी आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस साजरा केला जातो.
का साजरा केला जातो ?
◦ लघुग्रहांमुळे पृथ्वीवर होणारे धोके व परिणाम यांविषयी जागरूकता निर्माण करणे.
◦ लोकांना लघुग्रह संशोधन तसेच तंत्रज्ञानाबद्दल शिक्षित करण्यासाठी.
◦ नवीन लघुग्रह, पृथ्वी तसेच आपली सूर्यमाला याबाबतचे शिक्षण तसेच जागृती निर्माण करण्यासाठी.
30 जून हाच दिवस का ?
मध्य सायबेरियाच्या तुंगुस्का प्रदेशात याच दिवशी लघुग्रहाचा स्फोट झाला. त्यामुळे या प्रदेशातील झाडे क्षणार्धात नष्ट झाली.
लघुग्रह म्हणजे काय ?
◦ सूर्याभोवती फिरणाऱ्या लहान खडकाळ वस्तू म्हणजे लघुग्रह होय.
◦ ते ग्रहांपेक्षा आकाराने खूपच लहान असतात.
◦ लघुग्रह अंदाजे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला आणि त्यातील ग्रहांच्या निर्मितीपासून उरलेल्या सामग्रीचे खडकाळ अवशेष आहेत.
◦ मंगळ आणि गुरु दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आढळतो.
___________________________________
प्रधानमंत्री प्रणाम योजना
प्रधानमंत्री प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट्स फॉर एग्रीकल्चर मॅनेजमेंट योजना
उद्देश :
या योजनेअंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करावा यासाठी जनजागृती मोहीम राबवणे हा आहे.
योजनेबद्दल अधिक माहिती :
◦ केंद्र सरकारने या योजनेद्वारे रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करावा यावर भर दिला जाणार आहे.
◦ सेंद्रिय खतांचा वापर जैवखत यांचा संतुलित वापर करावा यासाठी प्रोत्साहन देणे.
◦ यासाठी कोणतेही वेगळे बजेट असणार नाही. रासायनिक खत अनुदानाच्या बचतीद्वारे वित्त पुरवठा केला जाईल.
◦ अनुदानाच्या बचतीपैकी निम्मी रक्कम राज्याला प्रोत्साहन स्वरूपात दिली जाईल.
◦ याद्वारे रासायनिक खतांचा कमी वापर केल्यामुळे जमिनीची आणि मातीचे होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल
◦ यामुळे जनतेलाही रसायन मुक्त धान्य खायला मिळेल.
___________________________________
द्रव नॅनो युरिया
IFFCO ने अमेरिकेसोबत द्रव नॅनो युरिया निर्याती संबंधित करार केला.
नॅनो युरिया म्हणजे काय ?
नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित खत जे की वनस्पतींना नायट्रोजन प्रदान करते.
द्रव नॅनो युरियाचे फायदे :
◦ मातीचे आरोग्य राखणे,पीक उत्पादन क्षमता वाढवणे, उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे.
◦ नॅनो युरिया पर्यावरणास अनुकूल उत्पादन प्रक्रियेद्वारे तयार केले जाते त्यामुळे पर्यावरणाचा संतुलन राहण्यास मदत होते.
◦ युरिया बॅग पेक्षा हे साठवण्यास सोपे आहे.
IFFCO बद्दल थोडक्यात माहिती :
◦ IFFCO- इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड
◦ नॅनो युरिया IFFCO द्वारे विकसित आणि पेटंट आहे.
◦ मुख्यालय : नवी दिल्ली
◦ कार्य : प्रामुख्याने खतांचे उत्पादन आणि वितरण करणे.
___________________________________
विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना
राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेची सुरुवात केली.
काय आहे योजना ?
◦ महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात.
◦ वारकरी वारी करत असताना अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास अशा वारकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे.
◦ योजनेची सुरुवात 21 जून 2023 पासून झाली.
योजनेचे स्वरूप :
मृत्यू झाल्यास 5 लाख
कायमचे अपंगत्व 1 लाख
अंशिक अपंगत्व 50 हजार
वैद्यकीय उपचार 35 हजार
___________________________________
एक्स खान क्वेस्ट 2023
अलीकडेच " एक्स खान क्वेस्ट 2023 " बहुराष्ट्रीय संयुक्त युद्ध सराव मंगोलिया देशामध्ये सुरू झाला.
एक्स खान क्वेस्ट 2023 सराव
उद्देश : यू एन शांती मिशन साठी (UN Peacekeeping Mission) सहभाग आणि सहकार्य वाढवणे.
लष्करी तयारी वाढवण्याबरोबर शांतता ऑपरेशन क्षमता विकसित करणे.
हा सराव मंगोलियन सशस्त्र दल आणि युनायटेड स्टेट आर्मी पॅसिफिक कमांडद्वारे सह प्रायोजित आहे.
भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व गडवाल रायफल्सच्या तुकडीद्वारे केले गेले.
UN शांतता मिशन आणि शांती सेना
जगात कुठेही अशांतता आणि अस्थिरता निर्माण झाली तसेच संबंधित देशांना परिस्थिती नियंत्रित करणे अशक्य झाले असता UN सुरक्षा परिषदेत ठराव करून त्या देशात शांतिसेना पाठवली जाते.
Source : PIB