
चालू घडामोडी 22, ऑक्टोबर 2024 | राष्ट्रीय जल पुरस्कार | National Water Awards

राष्ट्रीय जल पुरस्कार
National Water Awards
बातमी काय आहे ?
• राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (22 ऑक्टोबर 2024) नवी दिल्ली येथे पाचवे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान केले.
• हे पुरस्कार पाचवा राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 साठी देण्यात आले.
Subject : GS - पुरस्कार, पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 5 वा राष्ट्रीय जल पुरस्कार, सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये खालील पैकी कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला ?
1. महाराष्ट्र
2. उत्तर प्रदेश
3. गुजरात
4. ओडिशा
उत्तर : ओडिशा
5 वा राष्ट्रीय जल पुरस्कार : सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमधील प्रथम तीन विजेते पुढीलप्रमाणे :-
1. सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये, प्रथम पारितोषिक ओडिशाला प्रदान करण्यात आले आहे,
2. उत्तर प्रदेशने 2 रे,
3. तर गुजरात आणि पुद्दुचेरीने संयुक्तपणे 3 रे स्थान मिळवले आहे.
• प्रत्येक पुरस्कार विजेत्याला प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी तसेच काही श्रेणींमध्ये रोख पारितोषिके दिली गेली.
राष्ट्रीय जल पुरस्कारांचे उद्दिष्ट काय आहे ?
• पाण्याच्या महत्त्वाविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्यांना सर्वोत्तम पाणी वापर पद्धती अवलंबण्यास प्रवृत्त करणे हे राष्ट्रीय जल पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.
• सरकारचे ‘जल समृद्ध भारत’ हे ध्येय साध्य करण्यासाठी देशभरातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेले चांगले काम आणि प्रयत्न यावर हा पुरस्कार लक्ष केंद्रित करतो.
राष्ट्रीय जल पुरस्कार किती श्रेणींमध्ये देण्यात येतो ?
राष्ट्रीय जल पुरस्कार 9 श्रेणींमध्ये प्रदान करण्यात येतो.
1. सर्वोत्कृष्ट राज्य
2. सर्वोत्कृष्ट जिल्हा
3. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत
4. सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था
5. सर्वोत्कृष्ट शाळा किंवा महाविद्यालय
6. सर्वोत्कृष्ट उद्योग
7. सर्वोत्कृष्ट जल वापरकर्ता संघ
8. सर्वोत्कृष्ट संस्था (शाळा किंवा महाविद्यालयाव्यतिरिक्त)
9. सर्वोत्कृष्ट नागरी समाज
पहिला राष्ट्रीय जल पुरस्कार केव्हा देण्यात आला ?
• राष्ट्रीय जल पुरस्कार जलशक्ती मंत्रालय (Ministry of Jal Shakti) च्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाद्वारे देण्यात येतो.
• पहिला राष्ट्रीय जल पुरस्कार 2018 मध्ये देण्यात आला.
• 2019 मध्ये 2रा, 2020 मध्ये 3रा आणि 2022 मध्ये 4 था राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात आला.
• कोविड महामारीमुळे 2021 मध्ये हा पुरस्कार दिला गेला नाही.