माहूरच्या रेणुका देवी मंदिरातील विडा तांबूलला GI टॅग
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात नैवेद्य म्हणून दाखवल्या जाणाऱ्या विडा तांबुलला GI टॅग मिळाला आहे.
विडा तांबूल म्हणजे काय ?
विडा तांबूल रेणुका मातेचा मुख्य प्रसाद असून पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबूल विडा देवीला दिला जातो.
आई रेणुका मातेने श्री विष्णू कवी महाराज यांच्या स्वप्नात येऊन तांबूलाचा प्रसाद करून देण्यास सांगितले होते तेव्हापासून ही प्रथा चालू आहे असे सांगितले जाते.
या तांबुलामध्ये नागवेलीची पाने ,जायफळ, जायपत्री, सोप, सुपारी, लवंग, कात, चुना, विलायची, ओवा, धनीयादाळ, आस्मनतारा, ज्येष्ठमध, चमनप्राश यांचा समावेश असतो.
यातील घटक आरोग्यास उपयुक्त आहे.
देशभरातील आलेले भाविक विडा तांबूलचा प्रसाद आवर्जून घेतात.
GI Tag (Geographical Indication)
भौगोलिक संकेतांक
◦ एखाद्या भागातील वस्तू किंवा पदार्थ ही त्या भागाचं वैशिष्ट्य असल्यास त्यास जीआय टॅग देण्यात येतो.
◦ Geographical Indication of goods (Registration and Protection) Act, 1999 हा कायदा भारतातील वस्तूंची संबंधित भौगोलिक संकेतांची नोंदणी आणि उत्तम संरक्षण करण्यास प्रयत्न करतो.
◦ 2004 मध्ये दार्जिलिंग टी जी आय टॅग मिळवणारा पहिले भारतीय उत्पादन होते.
‣ GI टॅग असणारे महाराष्ट्रातील काही उत्पादक :
‣ सोलापुरी चादर, पुणेरी पगडी, कोल्हापुरी चप्पल, मराठवाडा केसर आंबा, नाशिकचे द्राक्ष, नाशिक व्हॅली वाईन, वारली चित्रकला इत्यादी.
___________________________________
जागतिक पर्यावरण दिन
दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी जगभरात साजरा केला जातो.
जागतिक पर्यावरण दिन :
स्थापना : 1973 पासून दरवर्षी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमा (UNEP) अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
उद्देश :
पर्यावरण समस्यांचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम याबाबत जागरूकता निर्माण करणे.
2023 थीम : #बीट_प्लास्टिक_पॉल्युशन ( #Beat_Plastic_Pollution)
प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे यासंदर्भात जनजागृती करणे आणि प्लास्टिकचा वापर थांबवण्यास भर देणे.
आयोजक : कोट डी ' आयव्होर आणि नेदरलँड यांच्या संयुक्त विद्यमानाने
___________________________________
आदि कैलास 180 यात्रेकरूंना वाचवण्यात यश
◦ आदि कैलास वरून परतणाऱ्या 180 गुण अधिक यात्रेकरूंना राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), महसूल पोलीस आणि सीमा सुरक्षा बल (SSB) यांच्या संयुक्त पथकाने वाचवले.
◦ यात्रेकरू भूस्खलनामुळे (landslide) येथे अडकले होते.
◦ आदि कैलास उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यात कुमाऊँ हिमालय पर्वत रांगेत वसलेले आहे.
◦ हे पाच कैलास पर्वतरांगांपैकी एक असून भगवान शिवांचे निवासस्थान आहे.
◦ यास शिव कैलास, छोटा कैलास, बाबा कैलास असेही म्हणतात.
___________________________________
अग्नी -1 मिसाइल
अलीकडेच ए. पी. जे. अब्दुल कलाम बेट, ओडिशा येथून अग्नी -1 या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
अग्नी -1 मिसाइल
रेंज : 700 ते 900 किमी
इंधन : सिंगल स्टेज, धनइंधन (Solid fuel) क्षेपणास्त्र
उत्पादक :
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
DRDO - Defense Research and Development Organization
• अंदाजे १००० किलोग्रॅम पेलोड असलेली अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे.
• अपग्रेडेड सिस्टम क्षेपणास्त्रास अधिक अचूक बनवते व त्याची विनाशकारी शक्ती देखील वाढवते.
• भारतीय लष्कराच्या स्ट्रॅटर्जीक फोर्सेस कमांडने 2007 मध्ये पहिल्यांदा हे क्षेपणास्त्र तैण्यात केले होते.