विधानसभा निवडणुक
नुकत्याच झालेल्या 4 राज्यांच्या निवडणुकीमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय झाला तर तेलंगणामध्ये काँग्रेसला यश मिळाले.
राज्य एकूण जागा निवडूण आलेल्या जागा
मध्य प्रदेश 230 भाजप 164
राजस्थान 119 भाजप 112
छत्तीसगड 90 भाजप 54
तेलंगणा 119 काँग्रेस 64
सरकार स्थापनेसाठी किती जागा हव्या असतात ?
• सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला एकूण जागेच्या 50% म्हणजेच निम्म्या किंवा त्याहून अधिक जागा जिंकणे आवश्यक असते. त्याला स्पष्ट बहुमत असे म्हणतात.
• जर एकाद्या पक्षाला बहुमत मिळाले नाही तर दोन किंवा अनेक पक्ष किंवा अपक्ष उमेदवार मिळून सत्ता स्थापन करू शकतात.
• उदाहरणार्थ महाराष्ट्रात सध्या शिंदे गट,अजित दादा पवार गट व भाजप गटांनी मिळून सरकार स्थापन केली आहे.
___________________________________
भारतीय नौदल दिन
भारतीय नौदलाच्या उल्लेखनीय योगदानाचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो.
4 डिसेंबरच का ?
• 1971 मध्ये भारत - पाकिस्तान युद्धा दरम्यान भारतीय नौदलाने भारताच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली.
• ऑपरेशन ट्रायडेंट दरम्यान भारतीय नौदलाने जहाजांविरोधी क्षेपणास्त्राचा वापर केला.
• याद्वारे भारतीय नौदलाने भारताचे तांत्रिक वर्चस्व आणि प्रगती जगाला दाखवून दिली.
• भारतीय नौदलाच्या या शौर्याचे प्रतीक म्हणून 4 डिसेंबर हा दिन भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.
परीक्षेच्या दृष्टीने,
भारतीय नौदला बद्दल अधिक माहिती :
‣ छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते.
‣ भारतीय नौदलाची स्थापना 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी द्वारे केली गेली नंतर त्याला रॉयल इंडियन नेव्ही असे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यानंतर 1950 मध्ये भारतीय नौदल म्हणून त्याची पुनर्रचना करण्यात आली.
‣ भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च कमांडर म्हणून नौदलाचे नेतृत्व करतात.
‣ सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार हे आहेत .
‣ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारापासून प्रेरित होऊन भारतीय नौदलाचे नवीन बोधचिन्ह तयार करण्यात आले.
‣ ब्रीदवाक्य : शं नो वरूण:
वरूण देवता (पावसाची देवता )आमचं रक्षण करो
___________________________________
नागार्जुन सागर धरण
अलीकडेच आंध्र प्रदेशने कृष्णा नदीवरील नागार्जुन सागर धरणाचा अर्धा भाग ताब्यात घेतल्याने तेलंगणा सोबतच्या वादात ठिणगी पडली.
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे काय ?
नागार्जुन सागर धरण :
‣ हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आले आहे.
‣ हे धरण तेलंगणातील नलगोंडा जिल्हा आणि आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्याच्या दरम्यान आहे.
‣ धरणाचे नाव नागार्जुन नावाच्या बेटावरून आणि तेथे राहत असलेल्या प्राचीन बौद्ध वसाहतीवरून पडले आहे.
‣ धरण 1955 ते 1967 दरम्यान बांधले गेले.
‣ हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात उंच दगडी बांध असलेले धरण आहे.
‣ धरण 150 मीटर उंच आणि 1600 मीटर लांब आहे.
‣ धरण देशातील महत्त्वाच्या बहुउद्देशीय सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांपैकी एक आहे.
‣ आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा,2014, च्या तरतुदीनुसार नागार्जुन सागर धरणाचे नियंत्रण आणि देखरेख तेलंगणाकडून केली जाते.
___________________________________
41 कामगार, 17 दिवस आणि थक्क करणार बचाव ऑपरेशन
उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तब्बल 17 दिवसांनी या बचाव कार्याला यश आले.
चला तर जाणून घेऊया हे चित्त थरारक ऑपरेशन,
बोगदा नेमका कशासाठी ?
• बोगद्यामुळे उत्तरकाशी ते यमुनोत्रीधाम हा प्रवास 26 किलोमीटरने कमी होईल.
• या प्रकल्पामुळे कोणत्याही ऋतूमध्ये, कोणत्याही वातावरणात रस्ते वाहतूक करता येणार आहे.
• हा चारधाम रोड प्रोजेक्टचा एक भाग आहे.
बोगद्यात अडकलेल्या मजुरांची स्थिती कशी होती ?
• 12 नोव्हेंबर रोजी बोगद्याचा काही भाग कोसळल्याने मजूर आत मध्ये अडकून पडले.
• बोगद्याचा 2340 मीटरचा भाग तयार झाला होता.
• भूस्खलनात कोसळलेल्या डोंगराचा मलबा 60 मीटरचा होता.
• 50 फूट रुंदीचा रोड आणि 2 किलोमीटर पर्यंतच्या भागात मजूर हालचाल करू शकत होते.
बचाव कार्य :
• अवघड मशीनच्या साह्याने खोदकाम सुरू केले.
• अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी रुंद स्टीलचा पाईप बसवला.
• 15 नोव्हेंबर ला दिगारा खाली पडल्याने बचाव कार्यास अडथळा आला.
• बचाव कार्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली, परंतु या वेळेस पाईपला अडथळा आल्याने काम पुन्हा थांबले गेले.
• 21 नोव्हेंबरला नवीन पाईपलाईन द्वारे बोगद्यात कॅमेरा पाठवल्यानंतर 41 कामगारांचा पहिला व्हिडिओ जारी केला.
• तब्बल 9 दिवसानंतर पहिल्यांदा मजुरांना खिचडी देण्यास प्रशासनाला यश आले.
• पाईपलाईनद्वारे औषधे, संत्री ज्यूस पाठवण्यात आले.
• ड्रिल करणारी ॲागर मशीन तुटल्याने पुन्हा काम थांबले गेले. दरम्यान टेकडीच्या माथ्यावरून उभी ड्रिलिंग करत असताना पाणी आल्याने तिथेही काम थांबले गेले.
शेवटी रॅट मायनिंगचा वापर
उंदराप्रमाणे एका छोट्या जागेत वेगाने खोदणारी मजुरांचे एक पथक बचाव कार्यास आले.
हातोडा, फावडा आणि इतर पारंपारिक खोदकामाच्या अवजाराच्या सहाय्याने बचाव कार्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली.
रॅट मायनिंग
दोन लोक पाईपलाईनमध्ये जातील; एक पुढे मार्ग तयार करेल तर दुसरा ढिकाऱ्याचा मलबा ट्रॉलीमध्ये लोड करेल.
बाहेर उभे असलेले चार लोक दोरीच्या सहाय्याने ही भरलेली ट्रॉली पाईपच्या आतून बाहेर काढतील.
खोदकाम करणारे आत गेलेले माणसे थकली की ते बाहेर येतील व दुसरे दोन आत जातील.
अशा पद्धतीने या 6 जणांनी यशस्वीपणे 41 मजुरांना बाहेर काढले.
___________________________________
अवकाळग्रस्तांना महाराष्ट्र सरकारची मदत
• राज्यात तीन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी , गारपीट यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
• आपत्तीमुळे 22 जिल्ह्यांतील तब्बल 4 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे वर्तवण्यात आले.
• काही ठिकाणी गारांसहित पाऊस झाला त्यामुळे हातात आलेले पीक तसेच द्राक्ष बाग शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
• राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तीन हेक्टर च्या मर्यादेत तातडीने मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काय आहे मदत ?
• जिरायत शेतीसाठी हेक्टरी 8500 रुपये
• आश्वासित सिंचनाखालील शेतीसाठी हेक्टरी 17,000 रुपये
• बागायती पिकांसाठी हेक्टरी 22,500 रुपये
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजे नेमकं काय ?
State Disaster Relief Fund (SDRF)
‣ आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 48 (1) अ अंतर्गत प्रत्येक राज्यात SDRF ची स्थापना करण्यात आली आहे.
‣ केंद्र सरकार सर्वसाधारण राज्यांमध्ये SDRF मध्ये 75% योगदान देते. तर हेच योगदान
‣ ईशान्य प्रदेश आणि हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेल्या राज्यांमध्ये 90% देते.
‣ राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा वापर केवळ चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूकंप, त्सुनामी, गारपीट, आग, भूस्खलन, ढगफुटी, कीटकांचा हल्ला, शीतलहरी आणि हिमवृष्टी यांसारख्या अधिसूचित आपत्तीतील पीडितांना त्वरित मदत पुरवण्यासाठी खर्च केला जातो.