वज्र प्रहार युद्ध अभ्यास : 2023
‣ वज्र प्रहार भारतीय आर्मी आणि अमेरिकन आर्मीच्या स्पेशल फॉर्सेसमध्ये आयोजित संयुक्त युद्ध सराव आहे.
‣ यंदाची 14 वी आवृत्ती 21 नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२३ या कालावधीत मेघालयातील उमरोही छावणी येथे आयोजित केली जात आहे.
‣ भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व इस्टर्न कमांड मधील स्पेशल फॉर्सेसचे जवान करत आहे; तर अमेरिकेकडून यूएस फर्स्ट स्पेशल फॉर्सेस ग्रुप प्रतिनिधित्व करत आहे.
उद्दिष्टे :
‣ भारत आणि अमेरिकेच्या लष्करांमधील परस्पर कार्यक्षमता वाढवणे व संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करणे.
‣ दोन्ही सैन्यांमध्ये विचारांची देवाण-घेवाण करणेआणि सर्वोत्तम कार्यपद्धती विकसित करणे.
Source : PIB - Exercise Vajra Prahar
___________________________________
10 वी आसियान संरक्षण मीटिंग
• 10 व्या आसियान आणि सहभागी देशांच्या (ADMM-Plus) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
• 10 वी बैठक इंडोनेशियातील जकार्ता येथे पार पडली.
• आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात जलवाहतूक, उड्डाण आणि विनाअडथळा कायदेशीर व्यवसाय स्वातंत्र्यासाठी भारत वचनबद्ध आहे असे त्यांनी बैठकीत प्रतिपादन केले.
• दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे. प्रदेशातील शांतता समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी सर्वांनी सक्रिय सहकार्याचे आवाहनही त्यांनी या वेळेस केले.
ADMM-Plus काय आहे ?
‣ हे ASEAN आणि त्यांचे 8 संवाद भागीदार देशांचा एक मंच आहे.
‣ ASEAN मध्ये ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश होतो.
‣ तर 8 संवाद भागीदार - ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपान, न्यूझीलंड, कोरिया प्रजासत्ताक, रशिया आणि संयुक्त राष्ट्र अमेरिका या देशांचा समावेश होतो.
‣ स्थापना : 2010 रोजी हनोइ, व्हिएतनाम
‣ उद्देश : संबंधित प्रदेशात शांतता, स्थिरता आणि विकासासाठी सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य मजबूत करणे.
___________________________________
श्रीमती इंदिरा गांधी : आयर्न लेडी ऑफ इंडिया
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात त्यांना मानवंदना देण्यात आली.
परीक्षेच्या दृष्टिकोनातून चला तर जाणून घेऊया भारताच्या आयर्न लेडी बद्दल
जन्म : 19 नोव्हेंबर 1917
जन्मस्थळ : प्रयागराज
• श्रीमती इंदिरा गांधी बालपणापासूनच स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होत्या.
• त्यांनी बालपणी असहकार चळवळी दरम्यान वानर सेना उभी केली.
• सप्टेंबर 1942 साली स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या योगदानाबद्दल त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.
• तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची धुरा सांभाळली.
• लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर 1966 मध्ये भारताच्या पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.
पंतप्रधान म्हणून कारकिर्दीत असताना घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना :
‣ 1959 मध्ये त्यांनी 14 बँकेचे राष्ट्रीयीकरण केले.
‣ 1971 मध्ये भारत - पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा पराभव करून बांग्लादेशाची निर्मिती.
‣ 18 मे 1974 पहिली पोखरण अणुचाचणी (कोड नेम -स्मायलींग बुद्धा )
‣ 1975 राष्ट्रीय आणिबाणी
‣ 1981 ऑपरेशन ब्लू स्टार -
• खालाीस्तानची मागणी करणाऱ्या दहशतवादी गटांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात प्रवेश केला त्याला उत्तर देण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन ब्लू स्टार लॉन्च केले.
‣ याचबरोबर इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत भारत कृषी क्षेत्राबरोबरच आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात एक सक्षम राष्ट्र बनले.
• ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या घालून श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या केली.
महत्वाचे पुरस्कार :
‣ भारतरत्न (1971)
‣ मेक्सिकन पुरस्कार (1972)
‣ साहित्य वाचस्पती (1976)
‣ मदर्स अवॉर्ड
‣ इसबेला डीएस्टे इत्यादी.
___________________________________
क्रिकेट वर्ल्ड कप 2023 विजेता - ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाने 6 विकेटने भारताचा पराभव करत वर्ल्डकपवर 6 व्यांदा आपले नाव कोरले.
चला तर बघूया परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट
वर्ल्ड कप २०२३ :
‣ यजमान : भारत
‣ अंतिम सामना : भारत V/S ऑस्ट्रेलिया
‣ विजेता संघ : ऑस्ट्रेलिया
‣ उपविजेता संघ : भारत
‣ फायनल मॅच क्रिकेट स्टेडियम : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, गुजरात
‣ सर्वोत्कृष्ट खेळाडू : विराट कोहली
‣ उत्कृष्ट गोलंदाज : मोहम्मद शमी
वर्ल्ड कप दर 4 वर्षांनी येतो.
मागील वर्ल्ड कप विजेता संघ :
‣ 2015 : ऑस्ट्रेलिया
‣ 2019 : इंग्लंड
‣ 2023 : ऑस्ट्रेलिया
2027 वर्ल्ड कप यजमान देश दक्षिण आफ्रिका, नामिबिया, झिंबाब्वे हे आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियम बद्दल थोडक्यात माहिती :
‣ साबरमती नदीच्या काठावर अहमदाबाद, गुजरात येथे हे स्टेडियम वसलेले आहे.
‣ पूर्वीचे नाव : सरदार पटेल स्टेडियम
‣ 132000 प्रेक्षक संख्या असलेले जगातील सर्वात मोठे स्टेडियम.
‣ स्टेडियम गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे आहे.
___________________________________
भारत आटा - केंद्र सरकार
• केंद्र सरकारकडून रुपये 27.50 प्रति किलोग्रॅम MRP वर भारत ब्रँड अंतर्गत भारत आटा नावाच्या गव्हाच्या पिठाची विक्री सुरू करण्यात आली आहे.
• शेतकऱ्यांना रास्त भाव देण्याची खातरजमा करताना अत्यावश्यक अन्नधान्याच्या किमती स्थिर ठेवण्यासाठीच्या दृष्टीने केंद्र सरकारचे हे एक पाऊल आहे.
मंत्रालय : ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution
भारत आटाचे महत्त्व :
‣ परवडणारी किंमत - बाजारभावापेक्षा कमी किमतीत म्हणजेच 27.50 रुपये प्रति किलोग्राम या दराने हे पीठ विकले जाईल.
‣ उच्च दर्जाचे गहू - शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उच्च दर्जाच्या गव्हापासून हे पीठ बनवले जाईल.
‣ ही योजना गहू उत्पादक शेतकऱ्यांना एक स्थिर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल.
भारत आटा कुठून खरेदी करता येईल ?
‣ केंद्रीय भंडार
‣ भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ मर्यादित (NAFED)
‣ भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ मर्यादित ( NCCF)
‣ तसेच सहकारी/ किरकोळ विक्री केंद्रामध्ये