
ओझोन छिद्र

ओझोन छिद्र
नुकत्याच प्रकाशित एका अहवालानुसार अंटार्टिका ओझोन छिद्राचा आकार गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसून आले.
चला तर, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने जाणून घेऊया ओझोन थर, त्याचे फायदे, ओझोन छिद्र इत्यादीं बाबत
काय आहे ओझोन ?
• ओझोन वायू हा ऑक्सिजनच्या तीन अणूंपासून बनलेला असून त्याचे गुणसूत्र O3 असे आहे.
• ओझोनचा थर वातावरणातील स्थितांबर (स्ट्रेटोस्फिअर) थराच्या खालच्या भागात आढळतो.
ओझोनचे महत्त्व :
• ओझोनचा थर सूर्यापासून येणारी अतिनील किरणांना (Ultraviolet radiation - UV rays) शोषून घेऊन पृथ्वीवरील जीवसृष्टीला सुरक्षित ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो.
• UV किरणांमुळे त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती यांसारखे आजार होऊ शकतात.
ओझोन ऱ्हास म्हणजे काय ?
• ओझोनचा थर कमी होणे याला ओझोन थराचा ऱ्हास असे म्हणतात.
• ओझोन छिद्र हे ओझोन थर अत्यंत कमी झाल्याचे दर्शवतो.
ओझोन ऱ्हासाची कारणे ?
• औद्योगिक रसायनांच्या वापरामुळे तसेच प्रामुख्याने क्लोरोफ्लोरो कार्बन जे की ODS (Ozone Depleting Substances) आहेत यांमुळे
• ओझोनचा थर कमी होत आहे.
• ODS म्हणजे ओझोन कमी करणारे पदार्थ. क्लोरोफ्लोरो कार्बन (CFCs), हॅलोन्स, कार्बन टेट्राक्लोराइड आणि मिथाईल क्लोरोफॉर्म हे वायु वातावरणात सोडले जातात हे वायू वातावरणातील UV किरणोत्सर्गामुळे तुटतात व पुढे ओझोन रेणू नष्ट करतात.
ओझोन ऱ्हास कमी करण्यासाठीचे प्रयत्न :
1985 व्हिएन्ना कन्वेंशन - संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांनी ओझोन थराचे होणारे नुकसान रोखण्यासाठीचे महत्त्व ओळखले.
1987 मॉन्ट्रियल प्रोटोकॉल - यानुसार ओझोन थर कमी करणाऱ्या पदार्थांचा वापर कमी करण्यासंदर्भात करार झाला.
जागतिक ओझोन दिन -
• दरवर्षी 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो.
• उद्देश : लोकांमध्ये ओझोन थराविषयी जागरूकता निर्माण करणे व खराब झालेल्या ओझोन थराविषयी जाणीव करून देऊन त्या संदर्भात उपाययोजनाला प्रोत्साहन देणे.
• 2023 ची थीम : Montreal Protocol : fixing the Ozone layer and reducing climate change
• मॉन्ट्रियल प्रोटोकॉल : ओझोन थर निश्चित करणे आणि हवामान बदल कमी करणे
___________________________________
संविधान दिवस
भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला जातो.
या दिवसाला राष्ट्रीय कायदा दिवस (National Law Day) असेही म्हणतात.
26 नोव्हेंबर च का ?
26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला त्याच्या स्मरणार्थ 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.
का साजरा केला जातो ? आणि केव्हा पासून ?
नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्य वाढवण्यासाठी, 2015 मध्ये सरकारने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
तर मग 26 जानेवारी का साजरी करतात ?
26 जानेवारी 1950 पासून घटना लागू झाली त्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन (गणराज्य दिन) म्हणून साजरा केला जातो.
• भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे.
• मूळ घटना २५१ पृष्ठांची आहे.
• 1949 त्या मूळ घटनेत प्रास्ताविका, 22 भाग, 395 कलमे व 8 अनुसूचीं चा समावेश होता.
संविधान सभेबद्दल परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती :
• 1946 च्या कॅबिनेट मिशनच्या अंतर्गत संविधान सभेची स्थापना करण्यात आली.
• 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली.
• डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
• पुढे 11 डिसेंबर 1946 रोजी :
‣ संविधान सभेचे अध्यक्ष - डॉ. राजेंद्र प्रसाद
‣ संविधान सभेचे उपाध्यक्ष - एच. सी. मुखर्जी
‣ संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार - सर बी. एन. राव
यांची नेमणूक करण्यात आली.
• 26 नोव्हेंबर 1949 रोजी २८४ सदस्यांनी स्वाक्षरी करून घटनेचा स्वीकार करण्यात आला.
___________________________________
इंदिरा गांधी पुरस्कार
इंदिरा गांधी शांतता, नि: शस्त्रिकरण व विकास पुरस्कार : 2022, संयुक्तपणे इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया (TNAI) यांना प्रदान करण्यात आला.
कोविड-19 महामारी दरम्यान केलेल्या त्यांच्या कार्याला सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात आला.
काय आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार ?
भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
कोण पुरस्कार देतात ?
हा प्रतिष्ठित पुरस्कार इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट द्वारे दिला जातो.
स्थापना : 1986 मध्ये
हा पुरस्कार कोणाला आणि का दिला जातो ?
आंतरराष्ट्रीय शांतता, विकास आणि नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था तसेच मानवतेच्या हितासाठी लावलेल्या वैज्ञानिक संशोधनासाठी व्यक्ती किंवा संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
पुरस्काराचे स्वरूप : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्रक
परीक्षेच्या दृष्टीने पुरस्कार प्राप्त काही व्यक्ती / संस्था :
2022 : IMA आणि TNAI
2021 : प्रथम (NGO)
2017 : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह
___________________________________
उत्तराखंडमधील सिल्कयारा बोगद्यामध्ये अडकलेले कामगार सुरक्षित
• उत्तराखंडमध्ये १२ नोव्हेंबर रोजी सिल्कयारा बोगद्याचे काम चालू असताना बोगद्याचा काही भाग कोसळला त्यात 41 कामगार अडकले.
• बचाव कार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती निवारण दल (SDRF),पोलीस तसेच बहू एजन्सी द्वारे बचाव कार्यात शर्थीचे प्रयत्न चालू आहे.
• बचाव कार्यात डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने रिमोट ऑपरेटेड व्हेईकल- दक्ष तैनात केले आहे. जे धोकादायक भूभागापर्यंत पोहोचण्यासाठी डिझाईन केलेले आहे.
• सिल्कीयारा बोगदा हा चारधाम रोड प्रोजेक्टचा एक भाग आहे.
• चार धाम (सर्व हवामान) रस्ता प्रकल्पात हिमालयातील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या प्रमुख देवस्थानांचा समावेश आहे. सिल्कीयारा बोगद्यामुळे उत्तरकाशी ते यमुनोत्रीधाम हा प्रवास 26 किलोमीटरने कमी होईल.