मित्र शक्ती सराव - 2023
भारत - श्रीलंका संयुक्त सराव मित्र शक्ती - 2023, 16 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2023 दरम्यान पुण्यातील औंध येथे होणार आहे.
चला तर जाणून घेऊया मित्रशक्ती सरावाबद्दल
• "मित्र शक्ती 2023 सराव" यंदाचा 9 वा भारत - श्रीलंका संयुक्त लष्करी सराव आहे.
• भारताकडून 120 जवानांच्या तुकडीचे प्रतिनिधित्व मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या तुकड्या करत आहे तर श्रीलंकेचे प्रतिनिधित्व 53 पायदळ तुकडीचे जवान करत आहे.
उद्दिष्टे :
‣ संयुक्त राष्ट्र संघ VII अंतर्गत उप-पारंपारिक मोहिमेचे संयुक्तपणे सराव करणे.
‣ शांतता मोहिमा दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे हित आणि अजेंडा अग्रस्थानी ठेवून सैन्यांमध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवणे.
‣ या सरावात छापा घालणे, शोध मोहीम, शत्रूच्या कारवाया हाणून पाडणे, दहशतवाद विरोधी कारव्यांमधील पीडितांना बाहेर काढणे, जीवन व मालमत्ता हानीचा धोका कमी करणे असे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांवर भर दिला जाणार आहे.
• या सरावामुळे भारतीय आणि श्रीलंकन लष्करी संरक्षण सहकार्याची पातळी वाढेल.
• दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.
Source : PIB - EX MITRA SHAKTI - IX
___________________________________
एक स्थानक एक उत्पादन योजना
वन स्टेशन वन प्रॉडक्ट अंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रेल्वे स्थानकांवर विक्री केंद्र उभारण्यात आली.
काय आहे एक स्थानक एक उत्पादन योजना ?
• या योजनेअंतर्गत संबंधित ठिकाणाची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध केली जातात.
• यात आदिवासी तसेच स्थानिक लोकांनी बनवलेल्या पुढील गोष्टींचा समावेश होतो :
‣ हस्तकला / कलाकुसरीच्या वस्तू
‣ कापड आणि हातमाग वस्त्रे
‣ पारंपारिक वस्त्रे
‣ स्थानिक कृषी उत्पादन / प्रक्रिया केलेले अन्न इत्यादी.
• योजनेची सुरुवात 25 मार्च 2022 रोजी प्रायोगिक तत्त्वावर केली गेली.
• ही योजना भारतीय रेल्वे मंत्रालयाचा एक उपक्रम आहे.
• अहमदाबादच्या नॅशनल डिझाईन इन्स्टिट्यूटने योजनेची डिझाईन केली असून यात OSOP केंद्रांची एक समान रचना करण्यात आली आहे.
• योजनेची उद्दिष्टे :
‣ भारत सरकारच्या वोकल फॅार लोकल या दृष्टिकोनाला चालना देणे.
‣ स्थानिक/ स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
‣ समाजाच्या वंचित घटकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे.
Source : OSOPS
___________________________________
राष्ट्रीय पत्रकार दिन : 2023
स्वतंत्र आणि नि:ष्पक्ष पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो.
चला तर जाणून घेऊया भारतीय पत्रकारिता दिनाबद्दल
• 16 नोव्हेंबर 1966 मध्ये भारतीय प्रेस परिषदेने ( प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने) काम करण्यास सुरुवात केली.
• ही संस्था भारतातील माध्यमांसाठी नैतिक निरीक्षक ( वॅाचडॅाग ) म्हणून काम बघते.
• जेणेकरून माध्यमांचा दर्जा उच्च राहील तसेच माध्यमे कोणत्याही प्रभावांना किंवा धमकावन्यांना बाधित होणार नाही.
• भारतीय प्रेस कौन्सिलच्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो.
2023 ची थीम
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील माध्यमे (Media in the era of Artificial Intelligence )
राष्ट्रीय पत्रकार दिनाचे महत्त्व :
‣ देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि लोकशाही राष्ट्र म्हणून त्यानंतरच्या प्रवासात माध्यमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
‣ लोकांवर होणारा कोणताही अन्याय उघड करणे तसेच व्यवस्थेतील त्रुटी उघड करण्यासाठी.
‣ एक मुक्त आणि निष्पक्षपाती माध्यमे कोणत्याही लोकशाही व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून काम करते त्यामुळे नागरिकांना योग्य माहितीपर्यंत पोहोचता येते.
___________________________________
झिका विषाणू
झिका विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली.
परीक्षेच्या दृष्टीने जाणून घेऊया या झिका व्हायरसबद्दल
• 1947 मध्ये युगांडाच्या झिका जंगलात सर्वप्रथम हा विषाणू ओळखला गेला.
• हा रोग प्रामुख्याने एडिस डासांच्या विशेषतः एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बेपिक्टस यांच्या चावण्याद्वारे माणसांमध्ये पसरतो.
संक्रमण :
‣ झिका विषाणू हा आजार असलेल्या व्यक्तीमार्फत डासांमध्ये प्रवेश करतो. जेव्हा हा संक्रमित डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा विषाणू त्या व्यक्तीच्या रक्तप्रवाह प्रवेश करतो.
‣ लैंगिक संपर्क, रक्त संक्रमण आणि संक्रमित आई पासून तिच्या बाळाला देखील याचा प्रसार होऊ शकतो.
लक्षणे :
‣ या विषाणूची लागण झालेल्या बऱ्याच लोकांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाही.
‣ ज्या लोकांमध्ये लक्षणे आढळतात तेव्हा ती सहसा सौम्य असतात; ताप, पुरळ, सांधेदुखी, डोकेदुखी इत्यादी.
‣ गर्भधारणे दरम्यान आईला संसर्ग झाल्यास बाळांवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ बाळांना न्यूरोलॉजिकल विकार किंवा मायक्रोसेफलीसारखे विकार होऊ शकतात.
उपचार :
‣ यासाठी कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत.
Source : ZIIKA VIRUS
___________________________________
भारताची वर्ल्डकप फायनल मध्ये रॉयल एन्ट्री
वर्ल्ड कप २०२३ च्या सेमी फायनल मध्ये न्युझीलंड वर ७० धावांनी विजय मिळवून भारताने वर्ल्डकप 2023 च्या फायनल मध्ये दिमाखात प्रवेश केला.
परीक्षेच्या दृष्टीने जाणून घेऊया काही महत्त्वाचे पॉईंट्स
क्रिकेट विश्वचषक :
• 1975 साली सर्वप्रथम एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन इंग्लंड मध्ये करण्यात आले.
• क्रिकेट विश्वचषक दर 4 वर्षांनी येतो.
भारताने जिंकलेले विश्व चषक :
1983
विजेता -भारत (कॅप्टन- कपिल देव)
उपविजेता -वेस्टइंडीज
2011
विजेता - भारत (कॅप्टन- महेंद्रसिंग धोनी)
उपविजेता - श्रीलंका
2023 वर्ल्ड कप सेमी फायनल बद्दल :
‣ वर्ल्ड कप 2023 ची सेमी फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वरती रंगली.
‣ विराट कोहलीने क्रिकेटमध्ये पन्नासावे शतक करताना आपले आदर्श सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडीत काढला.
‣ श्रेयस अय्यरणे अवघ्या 70 चेंडू १०५ धावा काढल्या तर मोहम्मदच्या शम्मीने 7 विकेट घेऊन सामनाविराचा मान पटकावला.
एक्झाम पॉइंटर्स :
साल विजेता संघ
2015 ऑस्ट्रेलिया
2019 इंग्लंड
2023 We are Waiting