जनजातीय गौरव दिवस
महान आदिवासी नायक आणि स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस देशभरात जनजातीय गौरव दिवस म्हणून उत्साहात साजरा केला जातो.
कोण होते बिरसा मुंडा ?
जन्म : 15 नोव्हेंबर 1875
जन्मस्थळ : खुंटी जिल्हा, झारखंड
गुरू : आनंद पांडे
◦ त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कूलमध्ये झाले
◦ आदिवासी समाजातील लोकांचे बळजबरीने धर्मांतर केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनरी व इंग्रजांवर जननायक बिरसा मुंडा यांचा प्रचंड राग होता, त्यांनी जर्मन मिशनरी स्कूल सोडून दिली.
◦ ब्रिटिश व्यवस्थेत जमीनदार, जहागीरदार, सावकार इत्यादींनी आदिवासींचे प्रचंड शोषण केले होते.
◦ 1 894 साली आदिवासींच्या जमिनी आणि हक्कांसाठी बिरसा मुंडा हे सरदार चळवळीत सहभागी झाले.
◦ बिरसा मुंडा आणि त्यांचे अनुयायांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. त्यांनी अनेक ठिकाणी ब्रिटिशांवर हल्ले केले आणि सरंजामशाही व्यवस्थेला विरोध केला.
◦ त्यांनी लोकांना स्वतःच्या जमिनीसाठी लढण्यास प्रेरित केले. याचे फलित म्हणून 1908 मध्ये छोटा नागपूर भाडेकरू कायदा मंजूर झाला. या कायद्याअंतर्गत आदिवासी लोकांकडून बिगर आदिवासी लोकांना जमीन हस्तांतरित करण्यास बंदी घातली गेली.
बिरसैत धर्म :
◦ बिरसा मुंडा यांनी 1895 मध्ये एक नवीन धर्म - बिरसैत धर्म सुरू केला.
◦ आपल्या आदिवासी लोकांना जुन्या धार्मिक विश्वासांकडे परत जाण्याचे आवाहन तसेच मूळ आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
◦ लोक त्यांना धरती अब्बा म्हणू लागली
9 जून 1900 रोजी जननायक बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला.
___________________________________
पीएम-कुसुम योजनेत महाराष्ट्र प्रथम
पीएम- कुसुम योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत 71,985 सौरपंप स्थापित करून महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम येण्याचा मान मिळवला.
काय आहे पंतप्रधान कुसुम योजना ?
किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान महाभियान (KUSUM)
◦ कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्याच्या प्राथमिक उद्देशाने 2019 साली ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौरपंप दिले जाणार आहे.
◦ कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 30 % , राज्य सरकारकडून 30 % , आणि इतर वित्तीय संस्थांकडून 30 % अनुदान दिले जाणार आहे ; तर उर्वरित 10% शेतकऱ्यांना स्वतः भरावे लागणार आहे.
पंतप्रधान कुसुम योजनेची उद्दिष्टे :
‣ सौर ऊर्जावर आधारित सिंचन प्रकल्पांना चालना देणे.
‣ शेतकऱ्यांचे डिझेल वर अवलंबून राहणे कमी करणे.
‣ सौर पंपाच्या वापराद्वारे शेतकऱ्यांचे सिंचन खर्च कमी करणे.
‣ अतिरिक्त सौरऊर्जा ग्रीडला विकून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे.
‣ सौर ऊर्जेचा अवलंब करून पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांमुळे होणारे पर्यावरण प्रदूषण कमी करणे.
Source : PM - KUSUM YOJANA LOKSATTA
___________________________________
पंडित जवाहरलाल नेहरू
आज भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. त्यानिमित्ताने जाणून घेऊया स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने त्यांचा जीवन प्रवास
जन्म : 14 नोव्हेंबर 1889
जन्मस्थळ : अलाहाबाद
• त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घरी खाजगी शिक्षकांकडून घेतले.
• त्यानंतर केंब्रिज विद्यापीठातून नैसर्गिक विधानात पदवी प्राप्त केली.
• 1912 मध्ये एक प्रतिनिधी म्हणून काँग्रेसच्या अधिवेशनात उपस्थित राहिले.
• 1916 मध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले आणि खूपच प्रभावित झाले.
• पुढे 1920-22 दरम्यान असहकार चळवळीतील सहभागमुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
• 1929 च्या लाहोर येथील काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. याच अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली.
• पुढे सविनय कायदेभंग चळवळ (1940 ), भारत छोडो आंदोलना (१९४२) द्वारे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले.
• स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला.
• शीत युद्धात अमेरिका व सोवियत रशिया यांपैकी कोणाच्याही बाजूने भाग न घेता भारताची अलिप्त भूमिका जगासमोर प्रखरतेने मांडली. याचमुळे त्यांना अलिप्तवादाचे ( Non-aligned Movement ) पुरस्कर्ते म्हणूनही ओळखले जाते.
• 1955 मध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
• त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून गौरविण्यात आले.
• त्यांचा जन्मदिवस देशभरात बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
• 27 मे 1964 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
साहित्य :
‣ लेटर्स फ्रॉम फादर टू हिज डॉटर
‣ ॲन ॲाटोबायोग्राफी
‣ द डिस्कवरी ऑफ इंडिया
___________________________________
क्रांतिगुरू लहुजी साळवे (वस्ताद)
क्रांतिकारकांचे क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची आज जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मनोभावाने मानवंदना करून जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास
जन्म : 14 नोव्हेंबर १७९४
जन्मस्थळ : नारायणपूर, पुरंदर जिल्हा
‣ लहुजी हे राघोजी साळवे आणि विठाबाई साळवे यांचे पुत्र होते.
‣ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज काम करत; त्यांच्या कामगिरीमुळे छत्रपतींनी लहुजींच्या पूर्वजांना राऊत ही पदवी बहाल केली.
‣ पूर्वजांप्रमाने लहुजीही युद्धकलेत निपुण होते.
‣ देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांची सेना त्यांनी निर्माण केली.
‣ त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजाचे युवक तालीम घेत होते.
‣ लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू यांसारखे अनेक स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या तालमीत तयार झाले.
‣ राष्ट्रभक्तीचे ज्वलंत प्रतीक क्रांतीगुरू लहुजी साळवे यांनी तरुणांना संघटन कसे करावे, समाजकार्यात व राष्ट्रकार्यात स्वतःला वाहून कसे घ्यावे याची बोध दिले.
‣ त्यांच्या या शिकवणीतून अनेक क्रांतिकारकांनी तसेच समाजकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले मोलाचे योगदान दिले.
‣ 17 फेब्रुवारी 1881 रोजी पुण्याच्या संगमवाडी या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मावळली.
___________________________________
बाल दिन
सर्वांना बाल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
भारतात दरवर्षी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.
चला तर जाणून घेऊया बाल दिनाचा इतिहास
◦ सुरुवातीला संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या सार्वत्रिक बाल दिनानुसार भारतासह जगभरात २० नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जाई.
◦ 1964 मध्ये पंडित नेहरूंच्या निधनानंतर संसदेत एक ठराव मंजूर करण्यात आला.
◦ पंडित नेहरूंच्या स्मरणार्थ संसदेत सर्वानुमते 14 नोव्हेंबर म्हणजे पंडित नेहरूंचा जन्मदिवस बाल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आणि तेव्हापासून भारतात १४ नोव्हेंबर बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
◦ पंडित नेहरूंनी मुलांच्या कल्याणासाठी आणि शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी ही एक आदरांजली म्हणून बघितली जाते.
◦ मुले ही देशाच्या भविष्याचे शिल्पकार आहे. प्रत्येक मुलाला उज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी अनुकूल असे वातावरण तयार करणे त्यांचे योग्य संगोपन आणि पालनपोषण करणे याची वचन बद्धता तसेच प्रतीक म्हणून बाल दिनाचे विशेष महत्त्व आहे.