
नोबेल पुरस्कार 2023

वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल
2023 चे मेडिसिन (वैद्यकीय) क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यांना त्यांच्या mRNA च्या संशोधन कार्याच्या सन्मानार्थ देण्यात आला.
महत्वपूर्ण का ?
Covid-19 च्या महामारी विरुद्ध प्रभावशाली mRNA वॅक्सिन विकसित करण्यासाठी या शास्त्रज्ञांचा शोध महत्त्वाचा आहे.
mRNA लस आणि त्याचे कार्य :
• mRNA चा फुल फॉर्म मेसेंजर रायबो न्यूक्लिक ऍसिड असा आहे.
• mRNA हा एक मेसेंजर आहे जो डीएनए पासून कोशिकाच्या (सेलच्या) प्रथिने उत्पादन यंत्रणेपर्यंत अनुवंशिक माहिती घेऊन जातो.
• या माहितीद्वारे शरीर रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच अँटीबोडीज आणि मेमरी सेल उत्पादन करण्याचे काम करते जे की covid-19 या विषाणू सोबत लढू शकेल.
___________________________________
नोबेल शांतता पुरस्कार : 2023
- इराणी कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना इराण मधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धच्या लढा आणि सर्वांसाठी मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी केलेल्या लढ्याबद्दल 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- अकादमीच्या म्हणण्यानुसार यावर्षीचा शांतता पुरस्कार अशा लाखो लोकांचा देखील सन्मान करतो ज्यांनी स्त्रियांना लक्ष करणाऱ्या भेदभावपूर्ण अत्याचारी असलेल्या शासनाच्या धार्मिक धोरणांविरुद्ध लढा दिला.
- नर्गीस मोहम्मदी या इराणी मानवाधिकार वकील आणि स्वातंत्र्यसैनिक आहे. त्यांनी 31 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे.
भारत आणि शांतता नोबेल पुरस्कार :
2014 चा शांतता नोबेल पुरस्कार कैलास सत्यार्थी यांना "मुले आणि तरुण लोकांच्या दडपशाहीविरूद्ध आणि सर्व मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी केलेल्या संघर्ष साठी" देण्यात आला होता.
___________________________________
साहित्याचा नोबेल पुरस्कार : 2023
2023 चा साहित्य क्षेत्रातील (Literature) नोबेल पुरस्कार जॉन फॉसे यांना त्यांच्या नावीन्यपूर्ण नाटके आणि गद्यासाठी देण्यात आला.
- जॉन फॉसे हे नॉर्वेचे लेखक आणि नाटककार आहेत.
- जॉन फॉसे मानवी भावना साध्या आणि सरळ शब्दात व्यक्त करण्यासाठी ओळखले जातात.
साहित्यातील नोबेल आणि भारत
- 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या संवेदशील आणि सुंदर कवितांसाठी प्रदान करण्यात आला होता.
2023 चा साहित्य क्षेत्रातील (Literature) नोबेल पुरस्कार जॉन फॉसे यांना त्यांच्या नावीन्यपूर्ण नाटके आणि गद्यासाठी देण्यात आला.
- जॉन फॉसे हे नॉर्वेचे लेखक आणि नाटककार आहेत.
- जॉन फॉसे मानवी भावना साध्या आणि सरळ शब्दात व्यक्त करण्यासाठी ओळखले जातात.
साहित्यातील नोबेल आणि भारत
- 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या संवेदशील आणि सुंदर कवितांसाठी प्रदान करण्यात आला होता.
___________________________________
रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार : 2023
2023 चा रसायनशास्त्रातील (Chemistry) नोबेल पुरस्कार मौंगी बावेंडी , लुई ब्रुस आणि ॲलेक्सी एकिमोव्ह ( Moungi Bawendi, Louis Brus and Alexei Ekimov) यांना संयुक्तरीत्या प्रदान करण्यात आला.
संशोधन :
क्वांटम डॉट्सच्या शोध आणि संश्लेषणासाठी
क्वांटम डॉट्स म्हणजे काय ?
क्वांटम डॉट्स हे नॅनोस्केल कण असतात. त्यांचा आकार सामान्यतः 1 ते 100 नॅनो मीटर असतो.
या टेक्नॉलॉजी चा उपयोग कुठे होईल ?
मेडिकल इमेजिंग मध्ये; डिस्प्ले टेक्नॉलॉजी जसे की LED स्क्रीनची गुणवत्ता वाढवण्यासाठी ; सोलर सेलमध्ये छोटे आणि प्रभावशाली सोलर सेल बनवण्यासाठी इत्यादी.
___________________________________
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार : 2023
यंदाचा भौतिकशास्त्रातील (Physics) नोबेल पुरस्कार पियरे अगोस्टिनी , फेरेंक क्रौझ आणि ॲन ल'हुलियर ( Pierre Agostini, Ferenc Krausz, and Anne L’Huillier) यांना ॲटोसेकंद पल्स च्या विकासासाठी देण्यात आला.
संशोधन :
पदार्थातील इलेक्ट्रॉनच्या गतीचा अभ्यास करण्यासाठी ॲटोसेकंद पल्सचा विकास शास्त्रज्ञांनी केला. या संशोधनामुळे शास्त्रज्ञांना पदार्थातील इलेक्ट्रॉनच्या वेगवान गतिशीलतेचा थेट निरीक्षण आणि अभ्यास करता येईल.