मलाबार बहुपक्षीय सराव
‣ 31 वी मलाबार बहुपक्षीय नौदल सराव सिडनी येथे आयोजित केला गेला.
‣ हा युद्ध अभ्यास 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान होईल.
‣ 1992 मध्ये भारत आणि अमेरिका द्विपक्षीय नौदल सराव म्हणून याची सुरुवात झाली.
‣ पुढे 2015 मध्ये जपान आणि त्यानंतर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियन नौदल मलाबार सरावात सामील झाले.
‣ सरावात सहभागी देश : भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया
‣ उद्दिष्टे : जागतिक समुदायाच्या आर्थिक प्रगतीकरता मुक्त, सर्वसमावेशक, नियमाधारी इंडो- पॅसिफिक क्षेत्र निर्माण करणे.
___________________________________
भारत नेट प्रोजेक्टसाठी 1.39 लाख कोटी रुपये मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतनेट प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी 1,39,579 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
भारतनेट प्रोजेक्टच्या पुढील टप्प्या अंतर्गत देशातील दुर्गम भागात 5G नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा वापर होईल.
काय आहे भारतनेट प्रोजेक्ट ?
ऑक्टोंबर 2011 मध्ये नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क (NOFN) म्हणून लॉन्च केलेला प्रोजेक्ट चे नामकरण 2015 मध्ये भारतनेट प्रोजेक्ट असे करण्यात आले.
मंत्रालय : दूरसंचार विभाग, दळणवळण मंत्रालय
उद्दिष्टे :
‣ भारतातील सर्व 640000 गावांना हाय- स्पीड इंटरनेट सुविधा देणे.
‣ देशभरातील 2.5 लाखाहून अधिक ग्रामपंचायती या मार्फत जोडणे.
‣ ग्रामीण भागात ई - गव्हर्नन्स, ई - आरोग्य, ई - शिक्षण, ई - बँकिंग, इंटरनेट आणि इतर सेवांचे वितरण सुलभतेने करणे.
‣ ग्रामीण आणि शहरी भागातील डिजिटल दरी (विषमता) दूर करून सर्वांसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध करणे.
___________________________________
132 व्या ड्युरंड फुटबॉल चषक स्पर्धेचे उद्घाटन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 132 व्या फुटबॉल चषक स्पर्धेचे उद्घाटन केले.
• यंदाची स्पर्धा आसाम मधील क्रोकोझार येथे आयोजित केली असून कोलकत्ता, गुवाहाटी आणि क्रोकोझार या तीन ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे.
ड्युरंड कपबद्दल माहिती :
• ही आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे.
• 1988 मध्ये शिमला येथे उद्घाटन संस्करण झाले त्यावेळी याला आर्मी चषक म्हणून ओळखले जायचे.
• सर हेनरी मार्टिमर ड्युरंड हे या स्पर्धेचे संस्थापक होते; म्हणून या स्पर्धेस ड्युरंड कप म्हणतात.
• सुरुवातीला स्पर्धा फक्त ब्रिटिश भारतीय सैन्य दलासाठी खुली होती.
• या स्पर्धेत विजेत्या संघाला तीन ट्रॉफीने गौरविण्यात येते.-
‣ ड्युरंड कप
‣ शिमला ट्रॉफी
‣ राष्ट्रपती चषक
SOURCE : PIB - DURAND CUP
___________________________________
गृह मंत्रालयाकडून आयुष व्हिसाची (Ayush Visa) नवीन श्रेणी जाहीर
परदेशी नागरिकांना भारतामध्ये पारंपारिक औषध प्रणालीद्वारे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी या व्हिसाची निर्मिती केली जाणार आहे.
आयुष व्हिसाचे उद्दिष्ट :
‣ भारतामध्ये आयुष चिकित्सा, आरोग्यसेवा आणि योगाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांना आकर्षित करणे.
• आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांसारख्या भारतीय वैद्यकीय प्रणाली अंतर्गत उपचार, आरोग्यसेवा आणि योग अभ्यासाचा लाभ यामार्फत घेता येईल.
• आयुष व्हिसामुळे मेडिकल टुरिझम वाढण्यास मदत होईल.
• आयुष व्हिसा "Heal in India" या उपक्रमाचा एक भाग आहे.
हिल इन इंडिया उपक्रमाचे महत्त्वाचे पॉईंट्स :
‣ जागतिक दर्जाचे, परवडणाऱ्या दर्जेदार आरोग्यसेवा प्रदान करणे.
‣ एकात्मिक आणि सर्वांगीण उपचार पद्धती निर्माण करणे.
आयुष मंत्रालय :
AYUSH Ayurveda, Yoga and Naturopathy, Unani, Sidha and Homoeopathy
स्थापना : 9 नोव्हेंबर 2014 रोजी आयुष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली.
आयुष मंत्रालयाची उद्दिष्टे :
‣ देशाच्या प्राचीन वैद्यकीय सखोल ज्ञानाचे पुनरुज्जीवन करणे.
‣ आयुष आरोग्य सेवांचा विकास आणि प्रचार करणे.
‣ यासाठी संदर्भित महाविद्यालयांचा दर्जा उंचविणे, कार्यरत असलेल्या संशोधन संस्थांना पाठिंबा देणे.
‣ आयुष प्रणालीद्वारे वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींच्या संवर्धन, लागवड आणि पुनर्निमान यासंबंधी योजना आखणे.
Source : Ayush Visa
___________________________________
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
• 2023 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यामध्ये प्रदान करण्यात आला.
• यंदाचा हा 41 वा राष्ट्रीय पुरस्कार आहे.
• पंतप्रधानांनी पुरस्काराची रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला देणगी म्हणून दिली.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराबद्दल माहिती :
‣ स्थापना : टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने 1983 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली.
‣ हा पुरस्कार दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिनी दिला जातो.
‣ राष्ट्राच्या प्रगतीसाठी, विकासासाठी कार्य करणाऱ्या तसेच राष्ट्रासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.
‣ पुरस्काराचे स्वरूप : एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह
• पहिला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांना दिला गेला.
काही पुरस्कार प्राप्त मान्यवर :
‣ 2023 - पंतप्रधान नरेंद्र मोदी
‣ 2022 - डॉ. टेसी थॉमस
‣ 2021 - डॉ. सायरस पूनावाला
Source : PIB - Lokmanya Tilak