अलीकडेच पंतप्रधानांनी अखिल भारतीय शिक्षा समागमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी त्यांनी पंतप्रधान श्री योजनेअंतर्गत निधीचा पहिला हप्ता जारी केला.
काय आहे पंतप्रधान श्री योजना ?
PM - SHRI Yojana: Pradhan Mantri School for Rising Yojana
योजनेचा उद्देश :
• केंद्र सरकार/ राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश सरकार/ स्थानिक संस्थाद्वारे व्यवस्थापित केलेल्या निवडक विद्यमान शाळांना बळकट करून देशभरातील 14500 हून अधिक शाळांचा विकास करणे.
• योजनेअंतर्गत निवडलेल्या शाळा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ( NEP -2020) चे सर्व घटक दाखवणाऱ्या आणि त्यांच्या परिसरातील इतर शाळांना मार्गदर्शन देणाऱ्या शाळा म्हणून काम करतील.
• या शाळा विद्यार्थ्यांच्या वैचारिक विकासासाठी दर्जेदार शिक्षण देतील आणि 21व्या शतकातील आवश्यक असलेल्या प्रमुख कौशल्याने सुसज्ज, सर्वांगीण आणि उत्तम नागरिक तयार करण्यासाठी प्रयत्न करेल.
• पर्यावरण पूरक बाबींचा समावेश करून पीएम श्रीशाळा ग्रीन स्कूल म्हणून विकसित केल्या जातील.
Source : PIB - PM SHRI Yojana
___________________________________
देशभरात कंजक्टिव्हायटिस या डोळ्यांच्या आजाराचा प्रसार
सध्या महाराष्ट्रसह देशाच्या अनेक भागात डोळ्यांच्या आजाराची साथ पसरल्याचे समोर आले आहे.
काय आहे हा कंजक्टिव्हायटिस आजार ?
‣ या आजारास पिंक आय असेही संबोधतात.
‣ यात पापणी आणि डोळ्यांच्या बुबुळांना झाकणाऱ्या पारदर्शक पडद्याची जळजळ होते. या पारदर्शक पडद्यालाच कंजक्टिव्हायटिस असे म्हणतात.
‣ डोळ्यांच्या पांढऱ्या भागातील रक्तवाहिन्यांना सूज आल्यामुळे डोळे लाल किंवा गुलाबी झालेली दिसतात.
‣ हा आजार जिवाणू, विषाणू किंवा एलर्जीमुळेही होऊ शकतो.
‣ हा आजार संसर्गजन्य आहे.
• पावसाळ्यात व्हायरसच्या वाढीसाठी आणि पसरण्यासाठी पोषक वातावरण असते; त्यामुळे या आजाराची साथ पावसाळ्यात जास्त पसरताना दिसते.
आजाराची लक्षणे :
‣ डोळे लाल होणे.
‣ डोळ्यांना वारंवार खाज येणे.
‣ डोळ्यांतून पाणी येणे.
उपाय :
‣ डोळे आल्यास साधारणतः दहा ते बारा दिवसात आजार बरा होतो.
‣ डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप वापरता येईल.
___________________________________
कारगिल विजय दिवस
• कारगिल युद्धातील वीरांच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
• लडाख येथील कारगिल जिल्ह्यात 1999 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले.
• पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करून महत्त्वाच्या ठिकाणावर कब्जा केला.
• याला प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन विजय लॉन्च केले.
• ऑपरेशन विजय अंतर्गत प्रसिद्ध टायगर हिल आणि आजूबाजूच्या इतर महत्त्वाच्या चौकांवर पुन्हा ताबा मिळवण्यात भारताला यश आले.
• हे युद्ध जवळपास तीन महिने चालले अखेर 26 जुलै 1999 रोजी भारताने पाकिस्तानचा पराभव करून युद्ध जिंकले.
___________________________________
PM- मित्रा मेगा टेक्स्टाईल पार्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम मित्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये दोन मेगा टेक्स्टाईल पार्कच्या पायाभरणीचे कौतुक केले.
पीएम मित्रा योजना :
PM - MITRA (Prime Minister Mega Integrated Textile Region and Apparel)
उद्देश : देशातील वस्त्रोद्योगाचा सर्वांगीण विकास साधने
मंत्रालय : वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार
योजनेबद्दल अधिक माहिती :
• पीएम मित्रा पार्कद्वारे केंद्र आणि राज्य सरकार गुंतवणूक वाढवण्यासाठी, नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न करेल.
• भारताला कापड उत्पादन आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवणे हे ध्येय साधने.
• पीएम मित्र पार्क जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करेल ज्यामुळे थेट परदेशी गुंतवणुकीसह (FDI- Foreign Direct Investment) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होईल.
• या पार्कच्या माध्यमातून जवळपास 70 हजार कोटींची गुंतवणूक आणि 20 लाख रोजगार निर्मितीची कल्पना केली गेली आहे.
• भारत सरकार 7 पीएम मित्र पार्क स्थापित करणार आहे.
• महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात ही पार्क उभारण्यात येतील.
Source : PIB - MITRA MEGA TEXTILE PARK
___________________________________
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मार्फत महाराष्ट्राला 1420.80 कोटी रुपये जाहीर
• देशभरात अतिवृष्टी आणि संबंधित नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आपत्ती निवारण्यासाठी राज्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी ( SDRF) 7532 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
• महाराष्ट्राला यापैकी 1420 कोटी ८० लाख रुपये SDRF जारी करण्यात आला.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी :
State Disaster Relief Fund (SDRF)
‣ आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 48 (1) अ अंतर्गत प्रत्येक राज्यात SDRF ची स्थापना करण्यात आली आहे.
‣ केंद्र सरकार सर्वसाधारण राज्यांमध्ये SDRF मध्ये 75% योगदान देते. तर हेच योगदान
‣ ईशान्य प्रदेश आणि हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेल्या राज्यांमध्ये 90% देते.
‣ राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा वापर केवळ चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूकंप, त्सुनामी, गारपीट, आग, भूस्खलन, ढगफुटी, कीटकांचा हल्ला, शीतलहरी आणि हिमवृष्टी यांसारख्या अधिसूचित आपत्तीतील पीडितांना त्वरित मदत पुरवण्यासाठी खर्च केला जातो.
Source : PIB - SDRF