
इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन (Tulip Garden) वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दाखल

इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन (Tulip Garden) वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दाखल
• श्रीनगर मधील इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन नुकतेच आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप उद्यान म्हणून लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दाखल झाले.
• हे झाबरवान पर्वतरांगेच्या पायथ्याशी तसेच दल सरोवरच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
• गार्डन 50 हेक्टर क्षेत्रात पसरलेले असून या गार्डनमध्ये 48 प्रकारची ट्युलिप फुलं आहेत.
• काश्मीरमधील फुलशेती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हे गार्डन २००७ मध्ये उघडण्यात आले होते.
• हे गार्डन पूर्वी सिराज बाग या नावाने ओळखले जात असे.
ट्युलिप उत्सव(Tulip Festival) :
‣ काश्मीर खोऱ्यात वसंत ऋतू सुरू होण्याच्या काळात हा उत्सव आयोजित केला जातो.
‣ बागेतील विविध प्रकारच्या फुलांच्या श्रेणींचे प्रदर्शन पर्यटकांसाठी खास मेजवानी आहे.
‣ हा उत्सव जम्मू आणि काश्मीर सरकारच्या पर्यटन प्रयत्नांचा एक भाग आहे.
___________________________________
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांच्या स्मरणार्थ स्मृती नाण्याचे अनावरण केले.
N.T. RamaRao
एन. टी. रामराव - नंदामुरी तारक रामाराव
• जन्म : 28 मे 1923
• मृत्यू : 18 जानेवारी 1996
‣ तेलगू चित्रपट सृष्टीमधील लोकप्रिय कलावंत.
‣ त्यांनी 200 पेक्षाही अधिक तेलगू चित्रपटांमध्ये काम केले.
‣ त्यांनी आपल्या " मानुशुलान्ता ओक्कते " म्हणजेच सर्व माणसे समान आहेत या आपल्या चित्रपटातून सामाजिक न्याय आणि समानतेचा संदेश दिला.
‣ एक लोकसेवक आणि नेता म्हणून NTR यांची लोकप्रियताही व्यापक होती.
‣ 1982 मध्ये त्यांनी तेलुगु देसम या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली आणि पुढच्याच वर्षी 1983 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले.
‣ त्यांनी 1883 ते 1984 ; 1984 ते एकूण 1989 ; 1994 ते 1995 या काळात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले.
Source : PIB
___________________________________
तेजस ने केली अस्त्र मिसाईलची यशस्वी चाचणी
‣ भारतीय हवाई दलाच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमान तेजसने 23 ऑगस्ट 2023 रोजी गोवा किनारपट्टी जवळ अस्त्र या क्षेपणास्त्राचे ( मिसाईलचे ) यशस्वीपणे प्रक्षेपण केले.
‣ अस्त्र मिसाईल हे स्वदेशी बनावटीचे बीऑन्ड विज्युअल रेंज (हवेतून हवेत मारा करणारे) मिसाईल आहे.
‣ संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL), संशोधन केंद्र इमरात (RCI) आणि DRDO च्या प्रयोगशाळा यांनी एकत्रितपणे त्याची निर्मिती आणि विकास केला आहे.
‣ तेजस लढाऊ विमानावरून स्वदेशी बनावटीच्या ASTRA मिसाईलचे प्रक्षेपण हे आत्मनिर्भरक भारत लक्ष्यपूर्तीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Source : PIB
___________________________________
मदनलाल धिंग्रा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
" माझ्या मातृभूमीसाठी मी माझे जीवन समर्पित करत आहे याचा मला अभिमान आहे. भारत मातेचे रक्षण करण्यासाठी मला अनेक वेळा भारतीय म्हणून जन्म घ्यायचा आहे." अशा उद्गारांनी हसत भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांची आज 114 वी पुण्यतिथी.
चला तर जाणून घेऊया क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जीवन प्रवास :
जन्म : 18 फेब्रुवारी 1883
जन्मस्थळ : अमृतसर
मृत्यू : 17 ऑगस्ट 1909
‣ सुरुवातीचे शिक्षण अमृतसर येथे केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले.
‣ तिथे त्यांचा संपर्क स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, श्यामजी कृष्ण वर्मा आणि अन्य क्रांतीवीरांची झाला.
‣ द नॅशनल इंडियन असोसिएशनच्या वार्षिक कार्यक्रमात कर्झन वायली देखील उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर कर्झन वायली हॉलच्या बाहेर येत असताना मदनलाल धिंग्रा यांनी अगदी जवळूनच त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांची हत्या केली.
‣ कर्झन वायलीच्या हत्येप्रकरणी मदनलाल धिंग्रा यांना 17 ऑगस्ट 1909 रोजी लंडन येथे फाशी देण्यात आली.
‣ पुढे डिसेंबर 1976 रोजी अमृतसर येथे तत्कालीन मुख्यमंत्री ग्यानी झैलसिंग यांच्या उपस्थितीत शहीद मदनलाल धिंग्रा यांच्या अस्थिंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.
‣ थेट इंग्लंडमध्येच जाऊन कर्झन वायली या अधिकाऱ्यास समोरून निधड्या छातीने गोळ्या घालून हत्या करणाऱ्या या क्रांतिवीरास पुन्हा एकदा मानवंदना.
___________________________________
मेरी माटी मेरा देश अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 103 व्या मन की बात कार्यक्रमादरम्यान या मोहिमेची घोषणा केली होती.
काय आहे मेरी माटी मेरा देश अभियान ?
देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांना नमन करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे.
• 9 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2023 दरम्यान चालेल.
• गाव, पंचायत, तालुका, शहरी स्थानिक संस्था, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पंचसूत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल.
• या कार्यक्रमांतर्गत पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरांचे वंदन, मिट्टी कलश आणि राष्ट्रीय ध्वजारोहण यांचा समावेश आहे.
• अभियानांतर्गत देशाच्या विविध भागातून गोळा केलेली माती (मिट्टी कलश) दिल्लीतील कर्तव्यपथ मार्गावर उद्यान विकसित करण्यासाठी वापरली जाईल.
• मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत तसेच नगरपंचायत इत्यादी. ठिकाणी स्मारके उभारण्यात येतील व त्यावर देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर पुरुषांची नावे कोरली जातील.
• वसुधा वंदन कार्यक्रमांतर्गत पृथ्वीमातेचे नूतनीकरण करण्याची कल्पना आहे. त्यासाठी देशी प्रजातींच्या 75 रोपे लावून प्रत्येक ग्रामपंचायत अमृत वाटिका विकसित करेल.
• वीरो का वंदन कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्य सैनिक तसेच दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या गौरव करण्यात येईल.