
नालंदा विद्यापीठ उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार राज्यातील राजगीर येथिल प्राचीन विद्यापीठाच्या अवशेषांजवळील नवीन नालंदा विद्यापीठ कॅम्पस चे उद्घाटन केले आहे.

Subject : GS- प्राचीन इतिहास, जागतिक वारसा स्थळे
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकत्याच उद्घाटन झालेल्या नालंदा विद्यापीठा संदर्भात बरोबर विधान निवडा.
1. याची स्थापना बिहारमधील गुप्त राजघराण्यातील कुमारगुप्ताने पाचव्या शतकाच्या सुरुवातीस केली होती.
2. 1193 मध्ये तुर्की शासक कुतुबुद्दीन ऐबकाचा सेनापती बख्तियार खिलजीने या विद्यापीठावर आक्रमण करून विद्यापीठ नष्ट केले.
3. नालंदा विद्यापीठाला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे.
4. वरील पैकी सर्व बरोबर
उत्तर : वरील पैकी सर्व बरोबर
नालंदा विद्यापीठाबद्दल थोडक्यात माहिती :
• नालंदा विद्यापीठ भारतीय उपखंडातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.
• याची स्थापना बिहार मधील गुप्त राजघराण्याचे कुमारगुप्ता यांनी 5 व्या शतकाच्या सुरुवातीला केली होती आणि 12 व्या शतकापर्यंत म्हणजे जवळपास 600 वर्ष या विद्यापीठाची भरभराट होत गेली.
• हर्षवर्धन आणि पाल या राजांच्या काळात नालंदा विद्यापीठाची लोकप्रियता शिगेला पोहोचली.
• नालंदा विद्यापीठ हे शिक्षण, संस्कृती आणि बौद्धिक देवाण-घेवाणीचे एक महत्त्वाचे केंद्र होते.
• नालंदा विद्यापीठाचा भारतीय सभ्यतेच्या विकासावर उल्लेखनीय प्रभाव होता.
• नालंदा विद्यापीठ हे मठसंस्था होती येथे पुरुष भिक्षु आणि महिला भिक्षु राहत आणि अभ्यास करत.
• नालंदा येथील विद्यार्थ्यांना कठोर आचारसंहितेचे पालन करणे अपेक्षित होते आणि त्यांना दैनंदिन ध्यान आणि अभ्यास सत्रांमध्ये भाग घेणे आवश्यक होते.
• येथे बौद्ध धर्मातील सर्व प्रमुख तत्त्वज्ञाने शिकवली जात.
• त्याचबरोबर वैद्यकशास्त्र , प्राचीन भारतीय वैद्यकीय प्रणाली, आयुर्वेद, गणित, व्याकरण, खगोलशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान यांसारखे विषयही येथे शिकवले जात.
• त्यामुळे येथे चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलिया, श्रीलंका आणि दक्षिण पूर्व आशियांसारख्या दूरच्या भागातील विद्यार्थी देखील शिक्षणासाठी येत होते.
• 1193 मध्ये तुर्की शासक कुतुबुद्दीन ऐबकाचा सेनापती बख्तियार खिलजीने या विद्यापीठावर आक्रमण करून विद्यापीठ नष्ट केले.
• पुढे 1812 मध्ये स्कॉटिश सर्वेक्षक फ्रान्सिस बुकानन-हॅमिल्टन याने विद्यापीठाचा शोध लावला.
• यानंतर 1861 मध्ये सर अलेक्झांडर कॅनिंग यांनी हे आशिया खंडातील एक महत्वपूर्ण प्राचीन विद्यापीठ आहे असे आपल्या अभ्यासात मांडले.
• चिनी भिक्षू झ्वेन त्सांग यांनी प्राचीन नालंदाजाच्या शैक्षणिक आणि स्थापत्य कलेच्या भव्यतेबद्दल अनमोल माहिती आपल्या प्रवास वर्णनात दिली आहे.
• नालंदा विद्यापीठाला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे.

सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकत्याच उद्घाटन झालेले नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे ?
1. महाराष्ट्र
2. उत्तर प्रदेश
3. बिहार
4. मध्य प्रदेश
उत्तर : बिहार