
18, जून 2024 चालू घडामोडी

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार : अजित डोवाल
Subject : GS - नियुक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा
1. अलिकडेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल सरांची पुनर्नियुक्ती करण्यात आली.
2. भारताचे प्रथम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा हे होते.
3. भारतात आत्तापर्यंत 3 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाले आहेत.
पर्याय :
1. 1 आणि 2 बरोबर
2. 1 आणि 3 बरोबर
3. 2 आणि 3 बरोबर
4. 1, 2 आणि 3 बरोबर
उत्तर : 1 आणि 2 बरोबर

• राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल सरांची पुनर्नियुक्ती करण्यात आली.
• अजित डोवाल सर हे केरळ कॅडरचे माजी IPS अधिकारी आहेत.
• त्यांनी 30 मे 2014 पासून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला.
• राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे.
• अजित डोवाल हे भारताचे 5 वे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार :
• 1998 मध्ये भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसह (National Security Council), राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे पद निर्माण केले.
• भारताचे प्रथम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा हे होते.
• राष्ट्रीय सुरक्षा संबंधित मुद्द्यांवर पंतप्रधानांना सल्ला देणे पंतप्रधानांच्या वतीने धोरणात्मक आणि संवेदनशील समस्यांचे व्यवस्थापन करणे हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे काम आहे.
• भारतात आत्तापर्यंत 5 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाले आहेत :
1. ब्रजेश मिश्रा (1998-2004)
2. जे. एन. दिक्षित (2004-2005)
3. एम. के. नारायणन (2005-2010)
4. शिवशंकर मेनन (2010-2014)
5. अजित डोवाल (2014- वर्तमान)

तरंगशक्ती सराव : 2024
Exercise Tarang Shakti : 2024
Subject : GS- युद्ध अभ्यास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) तरंगशक्ती सरावाबद्दल बरोबर असणार पर्याय निवडा
1. 2024 तरंग शक्ति सरावाचे आयोजन भारतामध्ये होणार आहे.
2. हा पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव असणार आहे.
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक
उत्तर : दोन्ही बरोबर
• भारतीय हवाई तरंग शक्ती 2024 या हवाई सरावाचे ऑगस्ट मध्ये आयोजन करणार आहे.
• भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) आयोजित केलेला हा पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव आहे.
• ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्पेन, युनायटेड किंगडम, संयुक्त अमेरिका, संयुक्त अरब अमिराती (USE) हे देश या सरावात सहभागी होणार आहेत.
• सरावाचे उद्दिष्टे : सहभागी देशांसोबत टेक्नॉलॉजीचे देवाण-घेवाण करणे, व्यावसायिक संवाद वाढवणे आणि ऑपरेशन क्षमता वाढवणे हे या सर्वाचे मुख्य उद्दिष्टे असणार आहेत.

मुख्यमंत्री मन्नुयिर काथू मन्नुयर कप्पोम योजना
Subject : GS - योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) खालीलपैकी कोणत्या राज्याने मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी " मुख्यमंत्री मन्नुयिर काथू मन्नुयर कप्पोम " योजना सुरू केली ?
1. आंध्र प्रदेश
2. तमिळनाडू
3. केरळ
4. कर्नाटक
उत्तर : तमिळनाडू

• तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शेतीला चालना देण्यासाठी " मुख्यमंत्री मन्नुयिर काथू मन्नुयर कप्पोम " ही योजना सुरू केली.
• मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन या योजनेसाठी 206 कोटी रुपये खर्च करणार आहेत.
नेमकं कसं ?
• या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात हिरव्या खतांच्या बियांचे वाटप केले जाईल.
• हिरवळीच्या खताच्या वापराद्वारे जमिनीची सुपीकता जतन केली जाईल.
• मातीचे संवर्धन आणि सूक्ष्मजीवांचे संरक्षण केल्यास जमिनीतील पोषक घटकांचे प्रमाण वाढेल.