
शिवराज्याभिषेक सोहळा : 2024

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
• स्वराजाची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक सोहळा पार पडला.
• यंदाच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 350 वर्ष पूर्ण होत आहे; या निमित्ताने राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धा परीक्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि त्यांच्या अष्टप्रधान मंडळाबद्दल प्रश्न विचारला आहे त्याबाबत आपण थोडक्यात आढावा घेऊ,
छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा :
• मुख्य पुरोहित गागाभट्ट यांनी महाराजांचा शिवछत्रपती म्हणून उच्चार करत महाराजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवली आणि स्वराज्याच्या धन्याचा मोठ्या दिमाखात राज्याभिषेक सोहळा पार पडला.
• छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेका प्रसंगी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजी राजे यांचा देखील अभिषेक करण्यात आला.
• राज्याभिषेकामुळे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून "राज्याभिषेक्षक शक" सुरू करण्यात आले. राज्याभिषेकाप्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरली गेली.
• स्वराज्याची नाणी छापण्यात आली यांमध्ये सोन्याचा हून तर तांब्याची शिवराई ही खास नाणी होती.
• तत्कालीन राजमुद्रेवर संस्कृत भाषेत
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता।
शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥
याचा अर्थ "शहाजींचा पुत्र शिवाजी याचे प्रतिपदेच्या चंद्रकोर प्रमाणे वाढत जाणारे हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे." असं होतो.
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्सिडेन हा इंग्रज वकील उपस्थित होता. त्यांनी संपूर्ण सोहळ्याची अतिशय विस्तृत व सखोल माहिती आपल्या डायरीत नमूद केली आहे हा इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण पुरावा मानला जातो.
• स्वराज्याच्या केंद्रीय प्रशासनातील महत्त्वाचे अंग म्हणून अष्टप्रधान मंडळ ओळखले जाते, हे अष्टप्रधान मंडळ शिवराज्याभिषेकाच्या वेळी अस्तित्वात आले.

• सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक सोहळा -----रोजी झाला.
(महाराष्ट्र पोलीस भरती पोलीस 2023, SRPF 2018,....)
1. 6 जून 1674
2. 6 जानेवारी 1874
3. 6 जून 1774
4. 6 जानेवारी 1574
उत्तर : 6 जून 1674
प्रश्न) छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात ?
(महाराष्ट्र पोलीस भरती : भंडारा 2023)
1. पेशवा
2. अमात्य
3. सचिव
4. मंत्री
उत्तर : पेशवा
प्रश्न) 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला ?
(महाराष्ट्र पोलीस भरती : अहमदनगर 2023)
1. शिवनेरी
2. प्रतापगड
3. रायगड
4. राजगड
उत्तर : रायगड
प्रश्न) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ------ हा इंग्रज वकील उपस्थित होता.
(महाराष्ट्र पोलीस भरती : ठाणे ग्रामीण पोलीस 2023)
1. फिलीप गिफर्ड
2. रिचर्ड टेलर
3. हेन्री ॲाक्सिडेन
4. हेन्री रिवेन्दन
उत्तर : हेन्री ॲाक्सिडेन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्सिडेन हा इंग्रज वकील उपस्थित होता. त्यांनी संपूर्ण सोहळ्याची अतिशय विस्तृत व सखोल माहिती आपल्या डायरीत नमूद केली आहे. हा इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण पुरावा मानला जातो.
{Key Words : UPSC, MPSC, Maharashtra police Bharti, GS, history, Chhatrapati Shivaji Maharaja, shivrajyabhishek2024, shivrajyabhishek350, Asthapradhanmandal, policebhartiprashn, current Affair, chalu Ghadamodi}
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇👇
2024 : फ्री टेस्ट
https://www.tcs9.in/mr/test-series/maharashtra-police/free-test-no-1-47
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
जागतिक वन्य दिनाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
जागतिक वन्यजीव दिन | महाराष्ट्र वन विभागाने केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड | देशातील बिबट्यांच्या संख्येत वाढ
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#polity
#chhatrapatishivajimaharajasthapradhanmandal
#Swarajya
#shivrajyabhishek2024
#history
#maharashtrachaetihas
#mpsc
#upsc
#maharashtrapolicebharti
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#policebhartiprashnsanch
#policebhartipreviousyearquestionpapaer
#policebhartijahirat
#policebharticutoff
#policebhartigr
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff