
लडाखमध्ये अरोरा बोरेलिस

अलीकडेच लढाखमध्ये हानले गावात अरोरा बोरेलिसची जादू बघायला मिळाली.
हा टॉपिक प्राकृतिक भूगोलच्या सिल्याबसचा भाग आहे. पृथ्वीच्या वातावरणातील थर याअंतर्गत यावर प्रश्न विचारले जातात जसे की तपांबर, स्थितांबर, आयनांबर, स्तपस्तब्धी इत्यादी.
अरोरा म्हणजे काय ?
• अरोरा हे नैसर्गिक लाइट्स आहेत. आकाशात निळ्या, लाल, पिवळ्या, नारंगी, हिरव्या अशा विविध रंगांमध्ये प्रकाश किरणे दिसून येतात यालाच अरोरा असे म्हणतात.
• फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे ही एक निसर्गाची अद्भुत रोषणाई आहे.
• हे प्रकाश किरणे संपूर्ण वर्षभर उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या दोन्ही ध्रुवाजवळ दिसतात परंतु काही वेळा ते कमी अक्षांशापर्यंत विस्तारतात.
• नॉर्दन लाईट्सला (उत्तर ध्रुवाजवळ) अरोरा बोरेलिस असे म्हणतात तर सदर्न लाईट्सला (दक्षिण ध्रुवाजवळ) अरोरा ऑस्ट्रेलिस असे म्हणतात.

अरोराची निर्मिती कशी होते ?
• अरोरा हे सौर वाऱ्यामुळेआणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण होतात.
• सूर्याच्या पृष्ठभागावरील घटनांमुळे सूर्य सतत विद्युत प्रभारीत कण (पार्टिकल्स) मुख्यतः इलेक्ट्रॉन, प्रोटॉन तसेच चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फील्ड) सोडत असतो यालाच सौर वारा (Solar Wind) असे म्हणतात.
• जसजसे सौर वारे पृथ्वीच्या जवळ येऊ लागतात, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे ते कण विचलित (Deflect) होतात.
• काही चार्ज कण पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरील पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्र रेषांच्या खाली पृथ्वीच्या वरच्या वातावरणात म्हणजे आयनांबरात जातात.
• हे कण नंतर तेथे उपलब्ध असलेल्या विविध वायूंबरोबर मिसळल्याने आकाशात विविध रंगांचा प्रकाश दिसतो.
• उदाहरणार्थ सौर वाऱ्यातील कण ऑक्सिजन सोबत मिसळतात तेव्हा हिरव्या रंगाचा प्रकाश दिसतो.
• नायट्रोजन सोबत मिसळल्यास निळ्या आणि जांभळ्या रंगाचा प्रकाश निर्माण होतो.
भारतात कसे दिसले ?
• सूर्याच्या पृष्ठभागावरील घटना तीव्र झाल्यास सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होतो याला सौरस्फोट असे म्हणतात.
• ज्यामुळे या सौर वाऱ्यांची तीव्रता वाढते या तीव्र वाऱ्यांचा परिणाम चुंबकीय वादळात होतो यालाच चुंबकीय वादळे (Magnetic Storm) असे म्हणतात.
• यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात तात्पुरता अडथळा निर्माण होऊन हे अरोरा मध्य अक्षांशमध्ये (भारतात) दिसू शकतात

सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न ) उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर लाल - हिरव्या रंगाचा प्रकाश खालीलपैकी कोणता थरातील उत्सर्जनामुळे (रेडिएशनमुळे) दिसतो ?
1. तपांबर
2. स्थितांबर
3. आयनांबर
4. स्तपस्तब्धी
उत्तर : आयनांबर
प्रश्न ) पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रामुळे नॉर्दन लाइट्स तयार होते यास काय म्हणतात ?
उत्तर : अरोरा बोरेलिस
प्रश्न ) नॉर्वे या ठिकाणी दिसणाऱ्या अरोरा बाबत खालीलपैकी योग्य पर्याय निवडा ?
1. अरोरा सौर वाऱ्यांमुळे आणि भूचुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण होतात.
2. अलीकडेच अरोरा बोरेलिस भारताच्या लडाखमध्ये दिसले होते.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/current-affairs-test-11052024-48
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD)
https://www.tcs9.in/mr/current-affairs/14-va-rasriya-matadara-divasa-nvd
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#Geography
#bhugol
#mpsc
#upsc
#maharashtrapolicebharti
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#policebhartiprashnsanch
#policebhartipreviousyearquestionpapaer
#policebhartijahirat
#policebharticutoff
#policebhartigr
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff