
श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार

श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार
भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार , राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री लालकृष्ण अडवाणी यांना प्रदान करण्यात आला.
श्री लालकृष्ण अडवाणी यांबद्दल थोडक्यात माहिती :
• श्री लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.
• त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 मध्ये कराची (पाकिस्तान) येथे झाला.
• भारत - पाकिस्तान फाळणी नंतर त्यांचे कुटुंब भारतात आले.
रथयात्रा आणि राम मंदिर :
1990 मध्ये राम मंदिर आंदोलनादरम्यान त्यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली होती.

भारताचे उपपंतप्रधान :
वर्ष 2002 ते 2004 या कार्यकाळात श्री लालकृष्ण अडवाणी हे भारताचे उपपंतप्रधान होते. (यावेळेस अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते.)
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर
भारतरत्न पुरस्कार
• भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे.
• भारताची किर्ती जगभरात वृद्धींगत करणाऱ्या किंवा देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात येते.
• भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 2 जानेवारी 1954 रोजी या पुरस्काराची स्थापना केली होती.
• भारतरत्न पुरस्कार जिवंत व्यक्तींना तसेच मरणोत्तर ही देण्याची तरतूद आहे. पुरस्कार मरणोत्तर देण्याची कल्पना नंतर टाकण्यात आली.

भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहेत :
• पुरस्कारात पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येते.
• पिंपळाच्या पानाच्या आकाराच्या पदकावर मधोमध सूर्य प्रतिमा आणि त्याखाली भारतरत्न असे अक्षर असते.
• मेडलच्या दुसऱ्या बाजूला चौमुखी सिंहाची प्रतिमा म्हणजेच अशोक स्तंभ असून त्याखाली सत्यमेव जयते असे लिहिलेले असते.
भारतरत्न पुरस्काराबद्दल सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न) सर्वप्रथम भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणास दिला गेला ?
1. पंडित जवाहरलाल नेहरू
2. गोविंद वल्लभ पंत
3. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
4. डॉ. राजेंद्र प्रसाद
उत्तर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
सर्वप्रथम भारतरत्न पुरस्कार 1954 मध्ये तीन व्यक्तींना देण्यात आला होता.
• डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण (1954) - भारताचे पहिले उपराष्ट्रपती
• चक्रवर्ती राजगोपालाचारी (1954) - स्वातंत्र्य सैनिक, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल
• डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (1954) - शास्त्रज्ञ , भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार
• पंडित जवाहरलाल नेहरू : 1955 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
• गोविंद वल्लभ पंत : 1957 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
• डॉ. राजेंद्र प्रसाद : 1962 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
प्रश्न ) 2024 चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणास दिला गेला ?
1. लालकृष्ण अडवाणी
2. कर्पूरी ठाकूर
3. एम.एस. स्वामीनाथन
4. वरीलपैकी सर्व
उत्तर : वरीलपैकी सर्व
2024 चे भारतरत्न पुरस्कार 5 व्यक्तींना देण्यात आला.
1. लालकृष्ण अडवाणी : भारताचे माजी उपराष्ट्रपती , भाजपा ज्येष्ठ नेते
2. कर्पूरी ठाकूर : राजकारणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री
3. एम.एस. स्वामीनाथन : शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक
4. चौधरी चरण सिंह : माजी पंतप्रधान
5. पी. व्ही. नरसिंह राव : माजी पंतप्रधान

एम.एस. स्वामीनाथन सरांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
हरित क्रांतीचे जनक : एम. एस. स्वामीनाथन
https://www.tcs9.in/mr/current-affairs/father-of-green-revolution-m-s-swaminathan
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD)
https://www.tcs9.in/mr/current-affairs/14-va-rasriya-matadara-divasa-nvd
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#policebhartiprashnsanch
#policebhartipreviousyearquestionpapaer
#policebhartijahirat
#policebharticutoff
#policebhartigr
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff