
भारताची GDP वाढ 8.4 टक्क्यांवर

भारताची GDP वाढ 8.4 टक्क्यांवर
• अलीकडेच भारताचे सकल देशांतर्गत उत्पादनात म्हणजेच GDP त 2023 - 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत 8.4 टक्क्यांनी वाढ झाली.
• ही वाढ मुख्यत्वे निर्मिती क्षेत्र, खानकाम व उत्खनन क्षेत्र, बांधकाम क्षेत्र यांच्या चांगल्या कामगिरीमुळे वाढलेली दिसते.
• ही आकडेवारी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ( Ministry of Statistics and Programme Implementation ) जारी केली.
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अर्थशास्त्र आणि भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे.
या टॉपिक मध्ये आपण भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP तसेच त्यांवर आधारित सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न बघणार आहोत.
GDP म्हणजे काय ?
• विशिष्ट कालावधीत देशाच्या हद्दीत उत्पादित केलेल्या सर्व तयार वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक किंवा बाजार मूल्य म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपी (GDP - Gross Domestic Product ) होय.
• जीडीपीला स्थूल देशांतर्गत उत्पादन असेही म्हणतात
• देशाच्या जीडीपीमध्ये भारताच्या सीमेअंतर्गत मग ते भारतीय मालकीची असो किंवा परकीय मालकीचे सर्वांचे उत्पन्नाची बेरीज केली जाते.
• देशाच्या GDP मध्ये सर्व खाजगी आणि सार्वजनिक उपभोग गुंतवणूक, सरकारी खर्च, परकीय व्यापार संतुलन इत्यादींचा समावेश होतो.
• GDP मुळे एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती तसेच त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न पुढील प्रमाणे
प्रश्न ) भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते ?
(पोलीस भरती प्रश्न), (MPSC STI 2016)
1. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर
2. 1 ऑक्टोंबर ते ३० सप्टेंबर
3. 1 एप्रिल ते 31 मार्च
4. 1 जुलै ते 30 जून
उत्तर : 1 एप्रिल ते 31 मार्च
प्रश्न) स्थूल देशांतर्गत उत्पादन जीडीपी चा अर्थ काय आहे ?
( सरळसेवा भरती प्रश्न ), (MPSC STI ), (SSC GD)
1. स्थूल राष्ट्रीय उत्पादन (G.N.P.)
2. एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा
3. सरकारी उत्पन्न
4. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन (N.N.P.)
उत्तर : एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD)
https://www.tcs9.in/mr/current-affairs/14-va-rasriya-matadara-divasa-nvd
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff