
भारताचे नवीन लोकपाल न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांनी नुकताच भारताच्या लोकपाल पदाचा पदभार स्वीकारला.
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने भारताची राज्यघटना आणि प्रशासन या विषयाच्या अंतर्गत लोकपाल आणि लोकायुक्त हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे.
या टॉपिक मध्ये आपण लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती, काम, अधिकार तसेच त्यांवर आधारित सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न बघणार आहोत.
लोकपाल म्हणजे काय ?
• भ्रष्टाचाराच्या आरोपांची तसेच संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी लोकपाल व लोक आयुक्त संस्था स्थापन करण्यात आले.
• लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, 2013 मध्ये केंद्रातील चौकशीसाठी लोकपाल तर राज्यातील चौकशींसाठी लोकायुक्त पद स्थापन करण्याची तरतूद यात करण्यात आली.
• लोकपाल आणि लोकायुक्त संस्था कोणत्याही घटनात्मक दर्जा शिवाय वैधानिक संस्था आहेत.
लोकपाल संस्थेमध्ये किती सदस्य असतात ?
• लोकपाल ही बहुसदस्यीय संस्था आहे. यामध्ये एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 8 सदस्य असतात.
• या आठ सदस्यांपैकी निम्मे न्यायिक सदस्य असतील आणि किमान 50% सदस्य SC/ST/OBC/ अल्पसंख्यांक आणि महिला असतील.
लोकपालांची नियुक्ती कोण करतात ?
राष्ट्रपती निवड समितीच्या शिफारशीनुसार लोकपालांची नियुक्ती करतात.
लोकपाल निवड समितीमध्ये कोण कोण असतात ?
• लोकपाल निवड समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, लोकसभेचे अध्यक्ष, भारताचे सरन्यायाधीश किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले न्यायाधीश आणि एक प्रख्यात कायदे तज्ञ यांचा समावेश असतो.
लोकायुक्त यांची नियुक्ती कोण करतात ?
राज्यपाल निवड समितीच्या शिफारशीनुसार लोकायुक्तांची नियुक्ती करतात.
लोकपाल अध्यक्ष किंवा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
लोकपाल अध्यक्ष किंवा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाच्या 70 वर्षांपर्यंत असतो.
लोकपाल किंवा लोकायुक्त संस्थेचे कार्य काय असते ?
• लोकपाल या शब्दाचा अर्थ लोकांचे संरक्षण करणे असा होतो.
• लोकपाल आणि लोकायुक्त लोकसेवकांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी करतात.
लोकपालाच्या अधिकार क्षेत्रात कोण कोण येतात ?
लोकपालाच्या अधिकार क्षेत्रात पंतप्रधान, मंत्री, संसद सदस्य, गट अ, ब, क आणि ड अधिकारी तसेच केंद्र सरकारचे अधिकारी यांचा समावेश होतो.
लोकपाल आणि लोकायुक्त साठी कोणते आंदोलन झाले ?
अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली " इंडिया अगेन्स करप्शन "आंदोलनाने सरकारवर दबाव आणला आणि लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक 2013 संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले.
प्रश्न) भारताचे पहिले लोकपाल कोण आहेत ?
(MPSC 2020 )
1. न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर
2. न्यायमूर्ती दीपक मिश्रा
3. न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष
4. न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर
उत्तर : न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष
प्रश्न) खालीलपैकी कोणते राज्य भारतात लोकायुक्त संस्था स्थापन करणारे पहिले राज्य आहेत ?
1. महाराष्ट्र
2. राजस्थान
3. उत्तर प्रदेश
4. केरळ
उत्तर : महाराष्ट्र
1971 मध्ये लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायद्याची स्थापना करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहेत.
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD)
https://www.tcs9.in/mr/current-affairs/14-va-rasriya-matadara-divasa-nvd
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C