सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार
• राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) अहवालात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असलेल्या राज्यांची माहिती देण्यात आली.
• सलग तिसऱ्या वर्षी देशात महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या यादीत अव्वल आहे.
• भ्रष्टाचार यादीत महाराष्ट्रनंतर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर तर कर्नाटक तीसऱ्या स्थानावर आहे.
• मसुल विभाग, पोलीस विभाग, महापालिका, मंत्रालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक लाच मागितल्याचे प्रकरणी समोर आली आहे.
• न्यायालयांमध्ये प्रलंबित भ्रष्टाचार प्रकरणे तब्बल 94% आहे. तर दोष सिद्धी दर केवल 8.2% आहे.
परीक्षेच्या दृष्टीने जाणून घेऊया राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाबद्दल
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग | National Crime Record Bureau ( NCRB )
• राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली.
• राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग गृहमंत्रालयाच्या(Ministry of Home Affairs) अंतर्गत काम करते.
• राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
COP-28
अलीकडेच संयुक्त राष्ट्रांची जागतिक हवामान परिषद COP- 28 दुबई येथे पार पडली.
COP- 28 म्हणजे काय ?
• वातावरणीय बदल आणि जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) धोका लक्षात घेता संयुक्त राष्ट्राच्या (UN) पुढाकाराने देशांनी एकत्र येऊन यावर उपाय करण्यासाठी परिषद भरवली यास COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असे नाव देण्यात आले.
• 1995 मध्ये बर्लिन येथे प्रथमच COP -1 चे आयोजन करण्यात आले.
• यंदाची ही 28 वी परिषद होती. COP -28 दुबई येथे आयोजित करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय ?
कोळसा आणि अन्य जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे वातावरणातील बदल तसेच ग्लोबल वॉर्मिंग होते. याला आळा घालण्यासाठी कोळसा आणि इतर जीवाश्म इंधनाचा वापर संपूर्णपणे थांबवावा असे मत प्रगत देशांचे आहे.
यावर भारताचे मत काय ?
• पण भारतासारख्या अनेक विकसनशील देश व अविकसित देशांना ऊर्जेची गरज भागवण्यासाठी सध्या तरी कोळशावर अवलंबून राहण्याखेरीज पर्याय नाही त्यामुळे हे देश या इंधनाचा लगेचच वापर थांबू शकत नाही.
• COP -26 मध्ये भारत आणि चीनच्या दबावामुळे परिषदेच्या मसुद्यातून " कोळशाचे तत्काळ उच्चाटन " या ऐवजी " कोळशाचे कालबद्ध उच्चाटन" असा बदल करण्यात आला.
पॅरिस करार काय आहे?
‣ ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी आणि हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करण्यासाठी 2015 मध्ये पॅरिस येथे करार झाला.
‣ या करारानुसार जागतिक तापमान वाढ 2 डिग्री सेल्सिअस जर शक्य असल्यास 1.5 डिग्री सेल्सिअसने कमी करण्याचा निर्धार देशांनी केला
क्लायमेट फायनान्स म्हणजे काय ?
‣ हवामान बदलांमुळे होणारे नुकसान रोखण्याच्या उपाययोजनासाठी निधी जमा करण्याचे ठरवण्यात आले त्यास क्लायमेट फायनान्स असे नाव देण्यात आले.
‣ प्रगत देशांनी (विकसित देशांनी) 100 कोटी डॉलरचा निधी द्यावा असे अपेक्षित आहे.
चला तर बघूया या भागामधून विचारलेले / संभाव्य काही प्रश्न
प्रश्न) खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते ? (ASO 2012)
A) पेट्रोलियम
B) मेण
C) बायोडिझेल
D) लाकूड
स्पष्टीकरण : उत्तर A) पेट्रोलियम
Frequently Asked Question (FAQ's)
प्रश्न) यंदाची COP -28 परिषद कुठे आयोजित करण्यात आली ?
उत्तर दुबई
प्रश्न) पॅरिस करार कशाच्या संदर्भात आहे?
उत्तर जागतिक तापमान वाढीच्या (ग्लोबल वॉर्मिंग) संदर्भात.
___________________________________
तेलंगणात रेवंत रेड्डी आणि राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री झाले.
श्री रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री
• काँग्रेस नेते श्री रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री बनले.
• त्यांनी श्री चंद्रशेखर राव यांचा पराभव केला.
• तेलंगणाचे राज्यपाल टी. सौंदर राजन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
तुम्हाला माहित आहे का ?
‣ 2014 साली आंध्रप्रदेश राज्यातून तेलंगणा राज्य वेगळे करण्यात आले.
‣ श्री चंद्रशेखरराव हे तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री बनले.
‣ चंद्रशेखरराव यांनी 2014 ते 2023 पर्यंत तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला.
‣ श्री रेवंत रेड्डी यांनी श्री चंद्रशेखर राव यांचा पराभव करून तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
श्री भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री
• अलीकडेच झालेल्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झाला.
• राजस्थान विधानसभेच्या 199 पैकी 115 जागा जिंकून भाजपने एक हाती सत्ता स्थापन केली.
• पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा यांची राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.
भारताची राज्यघटना या विषयांमध्ये संघराज्याच्या कार्यकारी यंत्रणेची तरतूद घटनेत भाग VI मधील कलम 153 ते 167 दरम्यान देण्यात आली आहे.चला तर बघूया या भागामधून विचारलेले / संभाव्य काही प्रश्न
यापूर्वी स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न | Competitive Exam Previous Year Questions
प्रश्न ) -------- हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.
(नवी मुंबई आयुक्तालय पोलीस भरती 2017)
A) मुख्यमंत्री
B) राज्यपाल
C) मुख्य न्यायाधीश
D) मेयर
स्पष्टीकरण : उत्तर B) राज्यपाल
राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात; तर मुख्यमंत्री हे वास्तविक प्रमुख असतात.
प्रश्न ) राज्य के राज्यपाल के रूप मे नियुक्त होने के लिए न्यूनतम आयु कितनी होनी चाहिये ?
(SSC GD 2023)
A) 30 वर्ष
B) 35 वर्ष
C) 25 वर्ष
D) 27 वर्ष
स्पष्टीकरण : उत्तर B) 35 वर्ष
• राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते.
• कलम 157 मध्ये राज्यपाल म्हणून निवडून येण्याच्या काही अटी दिलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे
• ते भारताचा नागरिक असावा.
• त्यांनी वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी.
प्रश्न ) मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ------यांच्यातील दुवा आहे.
(STI 2012)
A) विधानसभा
B) विधान परिषद
C) लोकसभा
D) मंत्रीपरिषद
स्पष्टीकरण : उत्तर D) मंत्रीपरिषद
घटनेच्या कलम 167 मध्ये मुख्यमंत्री यांचे कर्तव्य सांगितली आहे. मुख्यमंत्री हे राज्यपाल व मंत्रीपरिषद यांच्यातील दुवा आहे.
प्रश्न ) भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती.
( ASO 2016)
A) ओरिसा
B) बिहार
C) उत्तर प्रदेश
D) तमिळनाडू
स्पष्टीकरण : उत्तर C) उत्तर प्रदेश
• सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.
• 1963-67 या कार्यकाळात त्यांनी उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले.
प्रश्न ) भारतीय राज्यघटनेत निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे ?
(STI 2016)
A) 100
B) 250
C) 500
D) 550
स्पष्टीकरण : उत्तर C) 500
• राज्यघटनेतील कलम 170 अनुसार विधानसभेतील सदस्य संख्या कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 असते.
• याला अपवाद गोवा (40), मिझोराम (40), सिक्कीम (32) हे राज्य आहेत.
प्रश्न ) खालीलपैकी सर्वाधिक विधानसभा सदस्य संख्या कोणत्या राज्याची आहे ?
A) महाराष्ट्र
B) उत्तर प्रदेश
C) पश्चिम बंगाल
D) बिहार
स्पष्टीकरण : उत्तर B) उत्तर प्रदेश
1) उत्तर प्रदेश = 403
2) पश्चिम बंगाल = 294
3) महाराष्ट्र. = 288
4) बिहार. = 243
(FAQ's) Frequently Asked Question :
प्रश्न ) महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री कोण आहे ?
उत्तर : श्री एकनाथ शिंदे
प्रश्न ) महाराष्ट्राचे वर्तमान (2023) राज्यपाल कोण आहे ?
उत्तर : श्री रमेश बैस
प्रश्न ) महाराष्ट्राची विधानसभा सदस्य संख्या किती आहे ?
उत्तर : 288
___________________________________
‘गुजरातचा गरबा’ युनेस्कोकडून अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित
• अलीकडेच गुजरातचा गरबा डान्स युनेस्को च्या अमृत संस्कृतिक वारशाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला.
• मानवतेच्या अमृत संस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश झालेला गरबा नृत्य हे भारतातील 15 वा घटक आहे.
गरबा नृत्य :
• नवरात्र उत्सवात नऊ दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
• हे एक धार्मिक आणि भक्तीपूर्वक नृत्य आहे.
• हा सण स्त्रीशक्तीच्या उपासनेला समर्पित आहे.
• गरबा नृत्यात समाजातील सर्व स्तरातील लोक सहभागी होतात त्याद्वारे समाजात सामाजिक समता व एकात्मता जोपासली जाते.
काय आहे युनिस्को- मानवतेचा अमृत संस्कृतिक वारसा ?
Intangible Cultural Heritage of Humanity by UNESCO
यात पुढील गोष्टींचा समावेश होतो -
• पूर्वजांकडून वारशाने मिळालेल्या परंपरा किंवा जिवंत अभिव्यक्ती आणि मौखिक परंपरा, सामाजिक प्रथा, विधी, ज्ञान आणि निसर्ग, उत्सवाचे कार्यक्रम पद्धती किंवा पारंपारिक हस्तकला तयार करण्याची कौशल्य इत्यादी.
भारतातील युनेस्को यादीत समावेश असलेले घटक
1) वैदिक जप
2) रामलीला
3) कुट्टीयम संस्कृत थिएटर
4) राममन उत्सव (गढ़वाल)
5) मुदियेट्टू (केरळ)
6) कालबेलिया नृत्य (राजस्थान)
7) छाऊ नृत्य
8) बौद्ध जप (लडाख)
9) संकीर्तना (मणिपूर)
10) जादियाला गुरू (पंजाब)
11) योगा
12) नौरोज
13) कुंभमेळा
14) दूर्गापूजा (कोलकाता)
15) गरबा नृत्य (गुजरात)
Source : PIB
___________________________________
मिचौंग चक्रीवादळ
नुकतेच मिचौंग चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात अतिमुसळधार पाऊस झाला.
चला तर परीक्षेच्या दृष्टीने जाणून घेऊया चक्रीवादळाबद्दल :
• मिचौंग चक्रीवादळ हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ असून याचा उगम बंगालच्या उपसागरात झाला आहे.
• चक्रीवादळाला मिचौंग हे नाव म्यानमार या देशाने दिले आहे. याचा अर्थ सामर्थ्य किंवा लवचिकता असा होतो.
चक्रीवादळ म्हणजे काय ?
• काही कारणामुळे मध्यभागी कमी दाबाचे केंद्र निर्माण होते आणि त्याच्या सभोवती जास्त दाब होत जातो. त्यामुळे वारे चक्रकार गतीने कमी दाबाच्या केंद्राकडे वेगाने आकर्षिले जातात त्यास चक्रीवादळ किंवा आवर्त असे म्हणतात.
• हे वारे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या उलट दिशेने (anticlockwise) आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने (clockwise) फिरतात.
• बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रपेक्षा जास्त चक्रीवादळे निर्माण होतात.
चक्रीवादळाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात :
1) उष्णकटिबंधीय चक्रीवादळ / आवर्त
2) समशीतोष्ण कटिबंधीय चक्रीवादळ / आवर्त
___________________________________
भारतीय निवडणूक आयोग
• स्थापना : भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
• सचिवालय : नवी दिल्ली
• भारतीय संविधानाचा भाग XV निवडणुकांची संबंधित आहे.
• घटनेचे कलम 324 ते 329 भारतीय निवडणूक आयोग आणि सदस्य यांची पात्रता, अधिकार, कार्यकाळ, कार्य इत्यादींशी संबंधित आहे.
भारतीय निवडणूक आयोगाची रचना :
‣ भारतीय निवडणूक आयोगामध्ये एक प्रमुख निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात.
‣ नियुक्ती : त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात.
‣ कालावधी : त्यांचा कार्यालयीन कालावधी 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयापर्यंत, यांपैकी जे आधी असेल ते निश्चित आहे.
‣ दर्जा, पगार आणि भत्ते : त्यांचा दर्जा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समान असतो. आणि त्याप्रमाणेच पगार व भत्ते त्यांना असतात.
‣ संविधानाच्या कलम 324 अनुसार भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुकांची देखरेख, दिशा आणि नियंत्रण याचे अधिकार भारतीय निवडणूक आयोगाकडे असतील.
वर्तमान मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे ?
श्री राजीव कुमार (15 वे)