
भारतीय सेना दिवस | मकर संक्रांती

भारतीय सेना दिवस
दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस साजरा केला जातो.
देशाचे रक्षण करण्यासाठी, देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी आपली सेना सदैव तत्पर असते. लष्करी कर्मचाऱ्यांच्या या त्यागाला tcs9 टीमकडून विनम्र अभिवादन.
आज आपण महत्त्वाच्या चालू घडामोडींमध्ये, भारतीय सेना दिवस का साजरा केला जातो ? कधी पासून साजरा केला जातो ? जनरल के. एम. करियप्पा कोण होते ? यांविषयी या टॉपिक मध्ये जाणून घेणार आहोत.
टॉपिकच्या शेवटी भारतीय सैन्य दिवस यावर आधारित प्रश्न बघणार आहोत.
चला तर बघूया,
भारतीय सेना दिवस का साजरी केला जातो ?
• 15 जानेवारी 1949 रोजी फिल्ड मार्शल के. एम. करियप्पा हे भारतीय लष्कराचे पहिले कमांडर - इन - चीफ बनले.
• 15 जानेवारी या दिवशी फिल्ड मार्शल के. एम. करियप्पा हे भारतीय लष्कराला कमांड देणारे पहिले भारतीय बनले.
• त्यांनी ब्रिटिश कमांडर- इन- चीफ जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून अधिकार स्वीकारले.
• या दिवशी " अमर जवान ज्योती " येथे शहिदांना मानवंदना आणि श्रद्धांजली दिली जाते.
भारतीय सैन्य दिन : 2024
• यंदाचा हा 76 वा भारतीय लष्करी म्हणजेच सैन्य दिवस आहे.
• 2024 ची परेड लखनऊ येथील मुख्यालयाच्या सेंट्रल कमांडच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
• भारतीय लष्कर दिन 2024 ची थीम " राष्ट्राच्या सेवेत " In Service of the Nation ही आहे.
भारतीय सेना
• 1 एप्रिल 1895 मध्ये ब्रिटिशांनी ब्रिटिश भारतीय सेनेची स्थापना केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती भारतीय सेना म्हणून ओळखली जाऊ लागली.
• भारतीय लष्कराचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
• भारतीय सेनेत 6 ऑपरेशन कमांड आणि 1 प्रशिक्षण कमांड आहे.
• ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2021 च्या अनुसार भारतीय सेना जगामध्ये 4 थी सामर्थ्यवान सेना मानली जाते.
• जनरल मनोज पांडे सध्याचे सेना प्रमुख (आर्मी चीफ) आहे.
कोण आहेत फिल्ड मार्शल के. एम. करियप्पा ?
• के.एम. करिअरप्पा यांचा जन्म 28 जानेवारी 1899 मध्ये शनिवारसंधे, कर्नाटक येथे झाला.
• पहिले विश्वयुद्ध संपल्यानंतर लगेचच ते ब्रिटिश भारतीय सेनेमध्ये सामील झाले.
• फिल्ड मार्शल के. एम. करियप्पा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय कमांडर होते.
स्पर्धा परीक्षांसाठी वनलाइनर प्रश्न पुढील प्रमाणे
प्रश्न) खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
A) दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन साजरा केला जातो.
B)फिल्ड मार्शल सैम मानेक शॉ स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय कमांडर होते.
C) दोन्ही योग्य
D) दोन्ही अयोग्य
उत्तर - A) दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन साजरा केला जातो.

मकर संक्रांती
tcs9 टीम कडून सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.
भारतात विविध सण उत्साहात साजरी केली जातात. सण आणि विज्ञान यांचा अतूट संबंधित आपणास बघावयास मिळतो. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचेही काही विशेष पैलू आहेत जसे की, मकर संक्रांत का साजरी केली जाते ? केव्हा साजरी केली जाते ? मकर संक्रांत जानेवारीतच का येते ? वेगवेगळ्या राज्यांमध्ये मकर संक्रातीस काय म्हणतात ? या दिवसाचे महत्त्व काय आहे ? असे अनेक प्रश्न आपण आजच्या चालू घडामोडीमध्ये बघणार आहोत.
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक महत्वाचा आहे. याआधी यावर प्रश्न विचारले गेले आहेत जसे की, पोंगल हा सण कोठे साजरा केला जातो ?
ते आपण टॉपिकच्या शेवटी बघू,
मकर संक्रांत का आणि केव्हा साजरी केली जाते ?
• मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आपल्या उत्तरेकडे सरकत असतो या दिवसात उत्तरायण असेही म्हणतात.
• हा सण सूर्याचे मकर राशीतील संक्रमण आणि मोठ्या दिवसांची सुरुवात दर्शवतो.
• शेतकऱ्यांसाठी मकर संक्रांत अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या पिकाची कापणी करण्यास सुरुवात करतात म्हणून मकर संक्रांतीला पीक कापणी किंवा सुगीचा सण, हार्वेस्ट फेस्टिवल (Harvest festival) म्हणूनही ओळखले जाते.
• मकर संक्रांती साधारणपणे 14 जानेवारी रोजी किंवा एक दिवस आधी किंवा एक दिवस नंतर बघावयास मिळते. यंदा 15 जानेवारी रोजी मकर संक्रांति साजरी केली जात आहे.
• या दिवशी लोक पतंग उडवतात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. महाराष्ट्रात तिळगुळ वाटतात.
पौराणिक कथा
• हिंदू पौराणिक कथांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवता आपला पुत्र शनि देवास भेटण्यासाठी जातात. शनिदेव हे मकर राशीचे प्रतीक मानले जातात. अशी मान्यता आहे की आई-वडील-मुलगा यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी वडील आपल्या मुलास त्या दिवशी भेटतात व आनंद आणि गोडवा पसरवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देतात.
• मकरसंक्रातीचा महाभारतातील सिद्धांत असे सांगतो की, भीष्म पितामह यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या शरीराचा त्याग केला.
वेगवेगळ्या राज्यात मकर संक्रांतीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
( स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यांची नावे आणि तिथे सणाला काय म्हणतात अशी योग्य जोडी ओळखण्यासाठी प्रश्न विचारले आहेत ते आपण शेवटी बघू )
तामिळनाडू :
• मकर संक्रांति हा सण तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो.
• पोंगल सण राज्यातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण एकूण चार दिवस चालतो. या सणादरम्यान लोक कापणी केलेल्या नवीन तांदूळ, मसूर, गूळ आणि दुधापासून बनवला जाणारा पोंगल नावाचा एक खास पदार्थ तयार करतात.
आंध्र प्रदेश :
मकर संक्रांती आंध्र प्रदेशमध्ये पेड्डा पांडूगा म्हणून साजरा केला जातो.
आंध्र प्रदेश राज्यात विशेषता राज्याच्या ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी लोक बैलगाड्याची शर्यत तसेच कोंबड्यांची झुंज अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात.
केरळ :
केरळमध्ये मकर संक्रांति मकरविल्लक्कू म्हणून साजरी केली जाते. या दिवशी साबरीमाला मंदिरात प्रकट होणाऱ्या दिव्य प्रकाशाचे दर्शन घेण्यासाठी भक्त मंदिरात मोठ्या प्रमाणात जमा होतात.
• मकर संक्रांती - महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड
• उत्तरायण - गुजरात, राजस्थान
• मकर संक्रमणा - कर्नाटक
• मकर विलाक्कू - केरळ
• पेड्डा पांडुगा - आंध्र प्रदेश
• पोंगल - तमिळनाडू
• लोहरी - पंजाब, हरियाणा, जम्मू
• माघी - हरियाणा, हिमाचल प्रदेश
• माघबिहू - आसाम, मेघालय ( ईशान्य भारतातील राज्य)
• पौष संक्रांती - पश्चिम बंगाल
(वरील राज्यांचा नकाशा दिलेला आहे. नकाशा मधून लक्षात ठेवण्यास सोपे जाईल. नकाशा ( Map) डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तेथून डाऊनलोड करून घ्या.)
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न) मकर संक्रांत हा भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. हा सण मुख्यतः -----सण आहे.
(महाराष्ट्र पोलीस भरती, एमपीएससी )
1. रंगांचा
2. दिव्यांचा
3. संगीतांचा
4. पीक कापणीचा
उत्तर : 4. पीक कापणीचा
प्रश्न) खालीलपैकी कोणत्या राज्यात मकर संक्रांति हा सण पेड्डा पांडुरंगा म्हणून साजरा केला जातो ? ( SSC GD 2022)
1. तामिळनाडू
2. आंध्र प्रदेश
3. कर्नाटक
4. केरळ
उत्तर : 2. आंध्र प्रदेश