
ट्रक चालक संप । महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन । 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या घडामोडी मध्ये आपण बघणार आहोत
• वाहन चालकांचा संप, त्या संबंधित कारणे, परिणाम आणि IPC section
• महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आणि त्या संबंधित प्रश्न
• 16 वा वित्त आयोग, आयोगाचे नवीन अध्यक्ष, वित्त आयोग म्हणजेच फायनान्स कमिशन बद्दल संविधानात्मक माहिती आणि त्या संबंधी स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आणि इतर संभाव्य प्रश्न
• इतर महत्त्वाच्या बातम्या आणि चालू घडामोडी ,
• सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर
का करत आहेत ट्रक चालक संप ?
केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याच्या तरतुदींच्या निषेधार्थ महाराष्ट्रातच नव्हेच तर देशभरात वाहतूकदारांचं (ड्रायव्हरांच) आंदोलन सुरू आहे.
ट्रक व टँकर चालकांच्या संपामुळे इंधनाच्या गाड्या शहरात येणार नाही ! या भीतीने इंधन भरण्यासाठी लोकांची तारांबळ उडाली. त्यामुळे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी रांगाच रांग लागलेल्या दिसताहेत.
नेमका काय आहे नवीन कायदा ?
• केंद्र सरकारने नुकताच संसदेत भारतीय न्याय संहिता विधेयक (Indian Penal Code) पारित केले.
• वाहन कायद्याच्या या तरतुदीनुसार हिट अँड रन प्रकरणी म्हणजे अपघात केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या ड्रायव्हरला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 7 लाख रुपये एवढा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
• याआधी IPC सेक्शन ३०४ A अंतर्गत दोन वर्षांचीच शिक्षा होती.
• आयपीसी सेक्शन 302 हा हत्या (Murder) केस संदर्भात विधाने देतो.
ट्रक ड्रायव्हरांचे म्हणणे काय आहे ?
• अपघात झाल्यास जर ड्रायव्हर तेथेच सापडल्यास लोक ड्रायव्हरला मारहाण करतात; त्यामुळे त्यांना पळ काढावा लागतो.
• जर एखादा अपघात दुसऱ्याच्या चुकीमुळे झाल्यास त्यात ड्रायव्हर जबाबदार नाही याची शहानिशा कशी होईल ?
• जर एखाद्या व्यक्तीने ट्राफिक नियम पाळले नाही आणि व्यक्तीच्या चुकीमुळे अपघात झाल्यास त्याची शहानिशा कोण करील ?
• रोजंदारी करणाऱ्या ड्रायव्हर कडे सात लाख रुपये कोठून येणार ?
• जुन्या IPC सेक्शन मध्ये 304 A अन्वये शिक्षा दोन वर्षांचीच होती. आता ती 10 वर्षांपर्यंत वाढवली आहे त्यामुळे नवीन ड्रायव्हर म्हणून काम करणारे होतकरू व्यक्ती अशी नोकरी करतील का ? असे सर्व प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सध्या स्थिती काय आहे ?
पेट्रोल आणि डिझेल टॅंकर चालकांच्या संपामुळे देशभरात पेट्रोल पंपावर इंधन मुबलक प्रमाणात नाही त्यामुळे इतर दैनंदिनी कामकाजावर याचा परिणाम झालेला दिसतो उदाहरणार्थ काही ठिकाणी स्कूल बसेस बंद असल्याचे दिसतात. बहुतेक मालवाहतूक गाड्यांच्या चालकांचा संपाला पाठिंबा असल्याने जनजीवन थोडेफार डिस्टर्ब झालेले दिसते.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन
• दरवर्षी 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करतात.
• गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या(SRPF) मैदानावर महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस,पोलीस महासंचालक (अतिरिक्त कार्यभार) श्री विवेक फणसळकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा केला गेला.
• राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने सदैव तत्पर राहून नागरिकांना सुरक्षितता देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी यावेळी केले.
2 जानेवारी हाच दिवस का निवडला गेला ?
भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो.
स्पर्धा परीक्षांसाठी वनलाइनर प्रश्न पुढील प्रमाणे
प्रश्न) महाराष्ट्राचे वर्तमान राज्यपाल कोण आहेत ?
उत्तर : महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस
प्रश्न) महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन केव्हा साजरा करतात ?
उत्तर : 2 जानेवारी
16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष : डॉ. अरविंद पनगरिया
16 Finance Commission Chairman : Dr. Arvind Pangariya
केंद्र सरकारने 16 व्यास वित्त आयोगाची स्थापना केली आहे. त्याचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगरिया असतील.
UPSC, MPSC, SSC(GD) , सरळ सेवा, तलाठी, महाराष्ट्र पोलीस भरती या स्पर्धा परीक्षांमध्ये वित्त आयोगा संदर्भात प्रश्न विचारले गेले आहेत जसे की - पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? वित्त आयोगाचे कार्य काय असतील? त्यांची नियुक्ती कोण करतो ?
हे सगळं आपण टॉपिकच्या शेवटी बघू.
चला तर जाणून घेऊया,
वित्त आयोग म्हणजे काय ?
• भारतीय संघराज्यात केंद्र आणि राज्यांना विकास साधण्यासाठी आर्थिक विभागणी योग्य रीतीने करण्यासाठी वित्त आयोग महत्वाची भूमिका बजावते.
• भारतीय संघराज्यामध्ये प्रत्येक राज्याची भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती भिन्न आहे. काही राज्यांची महसूल क्षमता खूप जास्त आहे तर काही राज्यांची कमी. उदाहरणार्थ- महाराष्ट्राची महसूल क्षमता ही मिझोराम पेक्षा जास्त आहे. तर काही राज्यांची लोकसंख्या जास्त आहे पण महसूल क्षमता कमी उदाहरणार्थ बिहार
• अशा परिस्थितीत केंद्र सरकारने महसुलातील वाटा,राज्यांना किती अनुदाने द्यावीत, राज्या-राज्यांमध्ये ही अनुदाने कशी वाटावी हे सुचवण्यासाठी वित्त आयोगाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
वित्त आयोगाची निर्मिती कोण करतं ?
भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार दर 5 वर्षांनी किंवा गरज असल्यास त्या आधी भारताचे राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करता.
वित्त आयोगाची कार्य काय असतात ?
कलम 280 (3) अनुसार वित्त आयोग खालील बाबींविषयी राष्ट्रपतींना सल्ला देतात.
1. केंद्रीय कर उत्पन्नापैकी ज्या करांची विभागणी होऊ शकते अशी विभागणी सुचवणे.
2. भारताच्या संचित निधीतून राज्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाची तत्वे/ निकष ठरविणे.
3. केंद्र व राज्यांमधील वित्त विषयक बाबी संबंधित मार्गदर्शन करणे.
4. राज्यांच्या संचित निधीमध्ये वाढ करण्यासाठी उपाय योजना सुचविणे.
5. राष्ट्रपतींनी सुचविलेल्या इतर कोणत्याही वित्त विषयक बाबीसंबंधी सल्ला देणे.
6. पंचायत राज व्यवस्थेकडे वित्तीय स्त्रोत उपलब्ध करण्यासाठी राज्यांच्या संचित निधीत वाढ करण्याच्या उपाययोजना सुचविणे.
7. नागरिक पंचायत राज व्यवस्थेकडे वित्तीय स्त्रोत उपलब्ध करण्यासाठी राज्यांच्या संचित निधीत वाढ करण्याच्या उपाययोजना सुचविणे.
वित्त आयोगाबद्दल विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न पुढील प्रमाणे आहे.
प्रश्न) 15 वे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर : श्री एन.के. सिंग
प्रश्न) वित्त आयोगाची नेमणूक कोण करतात ?
उत्तर : राष्ट्रपती
प्रश्न) राष्ट्रपती कलम ----अनुसार वित्त आयोगाचे गठन करतात.
उत्तर : कलम 280
प्रश्न) भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामुग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो ?
(संयुक्त गट- क 2019)
1) नियोजन आयोग
2) वित्त आयोग
3) केंद्रीय लोकसेवा आयोग
4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर : 2) वित्त आयोग
प्रश्न) 16 वे वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर : डॉ. अरविंद पनगरिया
Source : PIB
सरळसेवा, पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे वनलाइनर तसेच इतर महत्त्वाच्या बातम्या आणि चालू घडामोडी :
‣ इस्रो ने आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरीकोटा येथून कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी XPosat या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
‣ या उपग्रहाचे प्रक्षेपण PSLV 58 रॉकेटच्या साहाय्याने करण्यात आले.
‣ श्री रजनीश सेठ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली.
‣ मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेली प्रभू श्रीरामाची मूर्ती अयोध्येत राम मंदिरात स्थापन होणार.
‣ केतकी राऊत यांनी मिस महाराष्ट्र 2023 चा किताब जिंकला.
‣ श्री अनिस दयाल सिंग यांची CRPF च्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
‣ अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ब्रेकिंग द मोल्ड या पुस्तकाचे लेखक श्री रघुराम राजन आहे.