
भगवान श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

भगवान श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
22 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे. जगभरातील भक्तांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भव्य आणि दिव्य अशा अवलौकिक श्री राम मंदिराबद्दल आजचा लेख आहे. या लेखात आपण बघणार आहोत.
- श्रीराम मंदिर वास्तु विशारद कोण आहे ?
- कसे असेल श्रीराम मंदिर ?
- भारतीय वास्तुकलेच्या मुख्य तीन शैली
- नागर वास्तूशैली कला म्हणजे काय ?
- नागरशैली कोठे आढळते ?
- नागर शैलीचे स्वरूप कसे असते ?
- मंदिर स्थापत्यशास्त्राच्या नागरशैलीतील उपशैली
- सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
भूमिपूजन
5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन झाले. मंदिराची पायाभरणी 40 किलो वजनाच्या चांदीच्या विटेने केली गेली.
प्राणप्रतिष्ठान
प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठान आणि उद्घाटन सोहळा 22 जानेवारी 2024

श्रीराम मंदिर वास्तु विशारद कोण आहे ?
• श्रीराम मंदिराचे वास्तुविशारद अहमदाबादचे सोमपूरा कुटुंब आहे. श्रीराम मंदिराचे नवीन डिझाईन वास्तु शिल्पकार चंद्रकांत सोमपूरा आणि त्यांचे दोन पुत्र निखिल आणि आशिष यांनी तयार केले आहे.
• मंदिर निर्माण करण्याची जबाबदारी लार्सन एंड टुब्रो कंपनी पार पडणार आहे.
कसे असेल श्रीराम मंदिर ?
• श्रीराम मंदिर पारंपरिक नागरशैलीत बांधले आहे.
• मुख्य मंदिर 2.7 एकर मध्ये आहे. मंदिराची लांबी 360 फूट, रुंदी 235 फूट आणि उंची १६१ फूट आहे.
• मंदिर 3 मजली असणार आहे आणि प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असणार आहे.
• मंदिराला एकूण 366 खांब आणि 12 गेट आहेत.
• मंदिरासाठी लागणारा लाल आणि पांढरा रंगाचा दगड राजस्थान मधून आणला जाणार आहे. हा दगड हजारो वर्ष टिकतो.
• प्रभू श्रीरामांची बालमूर्ती भूतल गर्भगृहात स्थित आहे. प्रथम गृहात श्रीराम दरबार आहे.
• नृत्य मंडप, रंग मंडप, सभामंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे 5 मंडप आहेत.

प्रभू श्रीरामाची मूर्ती
मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेली प्रभू श्रीरामाची मूर्ती अयोध्येत राम मंदिरात स्थापन होणार.

भारतीय वास्तुकलेच्या मुख्य तीन शैली आहेत.
1. नागर किंवा उत्तर भारतीय मंदिर वास्तुशैली
2. द्रविड किंवा दक्षिण भारतीय मंदिर वास्तुशैली
3. वेसर वास्तुशैली

नागर वास्तूशैली कला म्हणजे काय ?
" नागर " शब्द नगर पासून बनलेला आहे. ही वास्तुशाली सर्वप्रथम नगरामध्ये म्हणजेच शहरांमध्ये निर्माण झाली त्यामुळे या शैलीला नागरशैली असे म्हणतात.
नागरशैली कोठे आढळते ?
नागरशैली हिमालयापासून विंध्य पर्वतरांगेपर्यंत प्रचलित आहे. 8 व्या ते 13 व्या शतका दरम्यान उत्तर भारतातील अनेक राजांनी या शैलीला आश्रय दिला आणि या शैलीचे संरक्षण केले.
नागर शैलीचे स्वरूप कसे असते ?
नागरशैलीच्या शिल्प शास्त्र नुसार मंदिराचे आठ प्रमुख आहे. पाया, मसूरक, भिंती, कपोत, शिखर, ग्रीवा (शिखरावरचा भाग), वर्तुळाकार आमलक आणि कळस होता.
• पाया : ज्यावर संपूर्ण मंदिर बांधले जाते.
• गर्भगृह : येथे मुख्य देवाचे स्थान असते. मुख्य शिखराच्या खाली गर्भगृह असते.
• मंडप : मंदिराचे प्रवेशद्वार आणि गर्भगृहाच्या दरम्यानचा भाग मंडप असतो.
• वाहन : हे मुख्य देवतांचे वाहन असते ते गर्भगृहाच्या समोर असते.
• शिखर : गर्भगृहाच्या वरचा पर्वतासारखा आकार
• आमलक : शिखरावरील गोलाकार भाग
• कळस : शिखरावरचा भाग

नागरशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे या शैलीत विस्तृत सीमा भिंती किंवा प्रवेशद्वार नसते.
नागरशैली मंदिराचे काही उदाहरणे :
कोणार्क सूर्य मंदिर (ओडिशा), जगन्नाथ पुरी मंदिर (ओडिशा), खजुराहो मंदिर (मध्य प्रदेश), सोमनाथ मंदिर (गुजरात)
मंदिर स्थापत्यशास्त्राच्या नागरशैलीतील उपशैली पुढील प्रमाणे आहेत-
• पाल उपशैली
• ओडिशा उपशैली
• खजुराहो उपशैली
• सोळंकी उपशैली
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , NDA, SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नागर शैली मंदिरामध्ये सामान्यतः ----- प्रकारची स्थापत्यशैली असते.
(SSC MTS 2021)
1. दक्षिण भारतीय स्थापत्यशैली
2. उत्तर भारतीय स्थापत्यशैली
3. पूर्व भारतीय स्थापत्यशैली
4. मिश्र स्थापत्यशैली
उत्तर : 2 ) उत्तर भारतीय स्थापत्यशैली
प्रश्न) मंदिर स्थापत्य शैलीच्या नागरशैली बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) या शैलीचे मंदिरे सामान्यतः हिमालय आणि विंध्य पर्वता दरम्यानच्या भागात आढळतात.
2) या शैलीचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पिरॅमिड शिखर आहे.
वरीलपैकी कोणती विधान/ विधाने बरोबर आहे/ आहेत.
(NDA SEPTEMBER 2017)
1. फक्त 1
2. फक्त 2
3. दोन्ही 1 व 2 योग्य
4. दोन्ही 1 व 2 अयोग्य
उत्तर : 1) फक्त 1
पिरॅमिड शिखर हे द्रविड वास्तुशैलीचे वैशिष्ट्य आहे.
प्रश्न) खालीलपैकी कोणते मंदिर हे नागर मंदिर शैलीतील आहे ?
1. खजुराहो मंदिर
2. जगन्नाथ पुरी मंदिर
3. सोमनाथ मंदिर
4. वरीलपैकी सर्व
उत्तर : 4) वरीलपैकी सर्व
प्रश्न ) अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे वास्तु विशारद कोण आहे ?
1. अरुण योगीराज
2. बिमल पटेल
3. चंद्रकांत सोमपुरा
4. राम सुतार
Explanation - उत्तर : चंद्रकांत सोमपुरा
• अरुण योगीराज - प्रभु श्रीरामांची (रामलल्ला) मूर्तीकार
• बिमल पटेल - नवीन संसद भवनाचे वास्तू शिल्पकार
• चंद्रकांत सोमपुरा - अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिराचे वास्तू विशारद
• राम सुतार - स्टॅच्यू ऑफ युनिटीचे (सरदार पटेल ) मूर्तीकार
प्रश्न) अयोध्येतील प्रभू श्रीरामांची मूर्ती खालीलपैकी कोणी साकारली ?
1. राम सुतार
2. बिमल पटेल
3. अरूण योगीराज
4. रामकिंकर बैज
Explanation - उत्तर : अरूण योगीराज
• अरुण योगीराज - प्रभु श्रीरामांची (रामलल्ला) मूर्तीकार
• बिमल पटेल - नवीन संसद भवनाचे वास्तू शिल्पकार
• चंद्रकांत सोमपुरा - अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिराचे वास्तू विशारद
• राम सुतार - स्टॅच्यू ऑफ युनिटीचे (सरदार पटेल ) मूर्तीकार
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://www.tcs9.in/mr
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://www.tcs9.in/mr
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स https://t.me/tcs9team
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C