
75 वा प्रजासत्ताक दिन

75 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
दरवर्षी आपण 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा करतो आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी मध्ये आपण बघणार आहोत
• प्रजासत्ताक दिन 2024 ची थीम ( संकल्पना ) काय आहे ?
• 75 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहे ?
• 2024 महिला केंद्रित प्रजासत्ताक दिन
• फ्रेंच तुकडीचा सहभाग
• महाराष्ट्राचा चित्ररथ
• प्रजासत्ताक म्हणजे काय ?
• प्रजासत्ताक दिनाचा इतिहास
• 26 जानेवारी हाच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून का निवडला गेला ?
• सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रजासत्ताक दिन 2024 ची थीम ( संकल्पना ) काय आहे ?
यंदाची प्रजासत्ताक दिनाची थीम ‘ विकसित भारत ’- भारत लोकतंत्र की मातृका म्हणजेच भारत लोकशाहीची जननी ही आहे.
75 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहे ?
2024 च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॅान हे आहे.
75 व्या प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून सुमारे 1500 शेतकरी आणि त्यांच्या पत्नी यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

2024 महिला केंद्रित प्रजासत्ताक दिन
• 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या या ऐतिहासिक पर्वानिमित्त पारंपारिक वाद्य वाजवणाऱ्या 100 महिला कलाकारांचा सहभाग असेल.
• महिलांची त्री- सेवा दल प्रथमच कर्तव्य पथावर परेड करणार आहे. त्याचबरोबर ( CAPF )निमलष्करी दलातील महिला, दिल्ली पोलीस महिला तुकडीचा समावेशही परेडमध्ये असणार आहे.

फ्रेंच तुकडीचा सहभाग
प्रजासत्ताक दिनी फ्रान्सच्या 33 सदस्यीय बँड तुकडी आणि 95 सदस्यीय मार्चिंग तुकडीचा सहभाग असणार आहे.

महाराष्ट्राचा चित्ररथ
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळासह शिवशाही मध्यवर्ती ही महाराष्ट्राच्या चित्ररथाची थीम ( संकल्पना ) असणार आहे.

प्रजासत्ताक म्हणजे काय ?
• देशाचा प्रमुख म्हणजे राष्ट्रपती हा तेथील जनतेकडून निवडला जातो त्या राष्ट्रास प्रजासत्ताक राष्ट्र असे म्हणतात.
• प्रजासत्ताक राष्ट्रांमध्ये राजकीय सत्ता नागरिकांकडे असते म्हणजेच तेथील राष्ट्र प्रमुख हे पद (भारतासाठी राष्ट्रपती) वंशपरंपरागत नसते तर ते लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडून दिले जाते.
प्रजासत्ताक दिनाचा इतिहास
• भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 द्वारे भारत स्वतंत्र झाला परंतु भारत एक घटनात्मक राजेशाही बनले. यात जॉर्ज सहावा राज्य प्रमुख आणि लॉर्ड माऊंटबॅटन गव्हर्नर जनरल बनले.
• भारत राष्ट्राच्या कारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना बनवण्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली.
• डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
• तब्बल 2 वर्षे 11 महिने 17 दिवसांच्या चर्चेनंतर 4 नोव्हेंबर 1947 रोजी संविधानाचा मसुदा संविधान सभेत मांडला गेला.
• 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले ; म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो.
• 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान लागू झाले.
• भारतीय राज्यघटनेने भारत सरकार कायदा,1935 ची जागा घेतली आणि भारत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून उद्यास आले.
26 जानेवारी हाच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून का निवडला गेला ?
1929 च्या लाहोर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 26 जानेवारी 1930 हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून घोषित केला या दिवसाच्या स्मरणार्थ 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निवडला गेला.


• सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न) नुकताच भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
उत्तर : बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले थोर समाजवादी नेते तसेच स्वातंत्र्यसैनिक दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
प्रश्न) राष्ट्रीय बालिका दिन भारतात कधी साजरी केला जातो ?
• उत्तर : दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी रोजी साजरी केला जातो.
• मुलींना घट्ट लिंग गुणोत्तर बाबत जागृत निर्माण करणे स्त्री भ्रूणहत्या कमी करणे मुलींच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.
प्रश्न) राष्ट्रीय पर्यटन दिन केव्हा साजरी केला जातो ?
उत्तर : 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जातो.
भारतातील नैसर्गिक सौंदर्य ओळखण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिन महत्त्वाचा आहे.
प्रश्न) आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस कधी साजरा केला जातो ?
उत्तर : दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
हेही वाचा
भारतीय संविधान दिन
संविधान दिवस
https://www.tcs9.in/mr/current-affairs/constitution-day
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स