नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या घडामोडी मध्ये आपण बघणार आहोत
• वारली चित्रकला आणि त्यावर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेली प्रश्न
• भारत आणि रशियामध्ये झालेली द्विपक्षीय बैठक आणि त्या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे. त्या अनुषंगाने भारत आणि रशियाचा संबंध, रशिया निगडित स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आणि इतर संभाव्य प्रश्न
• केंद्र सरकारचे " एक राष्ट्र एक परवाना " आणि त्यावरील संभाव्य प्रश्न
• इतर महत्त्वाच्या बातम्या आणि चालू घडामोडी ,
• सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर
पालघर जिल्ह्यातील म्हशे कुटुंबाने जपली वारली चित्रकला
अलीकडेच, इन हेरिटेज आर्ट्स फोरमच्या (IAF) दिल्ली येथील प्रदर्शनात महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गंजाड गावातील म्हशे कुटुंबाचा वारली चित्रकलेच्या वारसाचा मागोवा घेण्यात आला.
चला तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जाणून घेऊया वारली चित्रकलेबद्दल आणि जीव्हा सोमा म्हशे याबद्दल
याआधी वारली चित्रकलेबद्दल महाराष्ट्र पोलीस, SSC GD, MPSC, UPSC परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहे ते आपण टॅापीकच्या शेवटी बघू.
वारली चित्रकला
वारली वस्ती कोठे आढळते ?
महाराष्ट्रातील उत्तर सह्याद्री पर्वत रांगेतील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू, तलासरी, नाशिक जिल्ह्याचा काही भाग तसेच गुजरातचा डांग, वलसाड, सुरत चा भाग, दादर - नगर हवेली, दिव आणि दमणचा काही भाग येथे वारली आदिवासींची वस्ती आहे.
वारली चित्रकला कशी असते ? आणि तिचा शोध केव्हा लागला ?
• वारली चित्रकला ही मुख्यत्वे स्त्रियांची चित्रकला आहे.
• विवाहाच्या वेळी चित्र काढणाऱ्या चित्रकर्तीस धवरलेली असे म्हणतात.
• वारली चित्रकलेचा इतिहास इसवी सन 10 व्या शतकाचा आढळतो. परंतु वारली चित्रकलेच्या विशिष्ट शैलीचा शोध प्रथमतः 1970 च्या दशकात दिसतो.
• वारली चित्रांतील रचना गोल,त्रिकोण, चौकोन इत्यादी भौमितिक आकारांचा वापर करून केली जाते.
चित्र काढण्याची पद्धत अथवा स्वरूप कसे असते? त्यासाठी कोणत्या रंगांचा वापर केला जातो ?
चित्र काढण्यापूर्वी भिंत माती अथवा शेणाने सारवली जाते. चित्रासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो; जसे की तांदळापासून पांढरा विटांपासून लाल झाडांच्या पानांपासून हिरवा इत्यादी. भौमितिक आकारांचा वापर करून चित्र रेखाटले जाते.
वारली चित्रकलेची थीम काय असते ?
वारली जमातीचे ग्रामीण जीवनाची दैनंदिन दिनचर्या, आदिवासी लोकांचे निसर्गाशी असलेले नाते, त्यांचे देव,पुराण, परंपरा, चालीरीती, सण- उत्सव ही वारली चित्रकलेची थीम असते.
कोण आहे जीव्हा सोमा म्हशे ?
• पालघर जिल्ह्यातील गंजाड गावातील जीव्हा सोमा म्हशे यांनी वारली चित्रकलेचा प्रसार देश - विदेशात केला.
• त्यांनी वारली चित्रकलेला जागतिक व्यासपीठ मिळवून दिले. फ्रान्स, जपान, लंडन, वॉशिंग्टन येथेही वारली चित्रकलेचा इतिहास वेगवेगळ्या स्वरूपात पोहोचवला.
• त्यांना वारली चित्रकलेचा राजदूत म्हणूनही ओळखले जाते.
• जीव्हा सोमा म्हशे यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
वारली चित्रकलेबद्दल विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न पुढील प्रमाणे आहे.
प्रश्न) वारली चित्रकला भारत के ---- राज्य की लोक चित्रकला है ? (SSC CHSL 2023)
पर्याय - A) मणिपूर
B) महाराष्ट्र
C) कर्नाटक
D)मिझोरम
उत्तर : महाराष्ट्र
प्रश्न ) खालीलपैकी कोणती चित्रकला महाराष्ट्राची आहे ? ( तलाठी भरती 2019)
A) कलाम
B) वारली
C) लघुचित्र
D) मधुबनी
उत्तर : वारली
प्रश्न) वारली चित्रकलेमध्ये कोणत्या रंगांचा वापर होतो ? ( महाराष्ट्र पोलीस )
उत्तर : नैसर्गिक रंगांचा
भारत आणि रशियामध्ये द्विपक्षीय बैठक
India Russia Bilateral Meeting
भारत आणि रशिया या दोन्ही देशांच्या आर्थिक सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री श्री जयशंकर सर आणि रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मॅंतुरोव यांची द्विपक्षीय बैठक नुकतीच पार पडली.
भारताचे मित्रदेश, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध ( India's International Relation) या संदर्भातून हा टॉपिक महत्त्वाचा आहे.
याआधी स्पर्धा परीक्षांमध्ये यासंबंधी प्रश्न आलेले आहेत जसे की
• भारताने नुकताच कोणत्या देशासोबत करार केला ?
• तो करार कशासंबंधीचा होता ?
• रशियाची राजधानी कोणती ? असे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण टॉपिकच्या शेवटी बघू.
चला तर जाणून घेऊया या,
द्विपक्षीय बैठकीचे प्रमुख मुद्दे कोणते आहेत ?
आर्थिक सहकार्य :
संरक्षण, अणुऊर्जा आणि तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन यातील धोरणात्मक सहकार्यावर भर देणे. दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन सहकार्य, दृढता यांसाठीच्या विविध मार्गांचा विचार या बैठकीत करण्यात आला.
अणुऊर्जा प्रकल्प :
• रशियाच्या मदतीने तामिळनाडू येथील कुडनकुलम येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला.
• मार्च २००२ मध्ये बांधकामाला सुरुवात झाली. 2016 पासून 1000 मेगाब्लॉक क्षमतेचे युनिट कार्यरत आहे.
• 2017 पर्यंत प्लांट पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील अशी अपेक्षा वर्तवली गेली.
Source : The Hindu
सरळसेवा, पोलीस भरती MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे वन लाइनर
• इंद्रा (INDRA) : भारत आणि रशिया मधील युद्ध अभ्यासाला इंद्रा नावाने ओळखले जाते.
• ब्रह्मोस मिसाइल (BRAHMOS missile) हे मिसाइल भारत आणि रशियाने मिळून बनवलेले आहे. हे एक सुपरसोनिक मिसाईल आहे. भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कोवा (Moskva) नदी यांपासून हे नाव ठेवण्यात आले आहे.
रशिया संदर्भात स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले / संभाव्य प्रश्न पुढील प्रमाणे :
प्रश्न) अलीकडेच झालेला इंद्रा हा युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये झाला ?
(UPSC, MPSC, SSC GD, NDA)
उत्तर : भारत आणि रशियामध्ये
प्रश्न)तमिळनाडूतील अणुऊर्जा प्रकल्प भारताने कोणत्या देशाच्या मदतीने स्थापित केला ?
( सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती)
उत्तर : रशिया
प्रश्न) रशिया ची राजधानी कोणती ?
उत्तर : मॉस्को
प्रश्न) ब्लादिमीर पुतीन हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे ?
उत्तर : रशिया
प्रश्न) रशिया या देशाचे चलन कोणते आहे ?
उत्तर : रुबल
एक राष्ट्र - एक परवाना
One Nation One Pass
नुकतात केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी संपूर्ण देशासाठी एक राष्ट्र एक परवाना अंतर्गत " राष्ट्रीय मालवाहतूक परवाना " National Transit Pass System ( NTPS ) प्रणालीचा प्रारंभ केला.
सरकारी योजना या अंतर्गत हा टॉपिक महत्त्वाचा आहे.
केंद्र सरकार योजना , त्यांचा फायदा आणि त्या योजना कशा संदर्भात आहे ? यासंबंधीचे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेले आहे; जसे की UPSC, MPSC, SSC (GD), महाराष्ट्र पोलीस भरती, सरळ सेवा भरती इत्यादी.
चला तर बघूया,
काय आहे एक राष्ट्र - एक परवाना आणि राष्ट्रीय मालवाहतूक परवाना प्रणाली ?
देशभरात लाकूड,बांबू आणि इतर वनोपजांची विना अडथळा वाहतूक सुलभ करण्यासाठी हा परवाना आहे.
याचा फायदा काय ?
• खाजगी जमीन मालकीचे, सरकारी मालकीचे वने, खाजगी डेपो यांसारख्या विविध स्त्रोतांकडून मिळवलेले लाकूड, बांबू आणि इतर वन उत्पादकांच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय वाहतूक व्यवसाय सुलभ करण्यासाठी.
• याअंतर्गत QR कोडेड ट्रान्झिट परवाने विविध राज्यांमध्ये चेक गेट्सना परवान्याची वैधता तपासण्यासाठी अनुमती देईल.
• यामुळे संपूर्ण देशात संबंधित उत्पादनांच्या वाहतुकीसाठी एक परवाना राहील आणि याद्वारे एक राष्ट्र एक - परवाना हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल.
• सध्या 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी एक राष्ट्र एक परवाना पद्धत स्वीकारली आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी वनलाइनर प्रश्न पुढील प्रमाणे
प्रश्न) एक राष्ट्र एक परवाना योजना कशा संबंधित आहे ?
एक राष्ट्र एक - परवाना या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
उत्तर : वने, बांबू आणि इतर वन उत्पादने यांची राज्य आणि आंतरराज्यीय वाहतूक सुलभ होण्यासाठी.
प्रश्न) एक राष्ट्र एक परवाना ही योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू केलेली आहे ?
उत्तर : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय
Source : PIB
सरळसेवा, पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे वनलाइनर तसेच इतर महत्त्वाच्या बातम्या आणि चालू घडामोडी :
• अयोध्या येथील विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात आले.
• मध्य रेल्वेने महिलांसाठी प्लॅनिंग बटन सुरक्षा सुविधा सुरू केली.
• आसाम राज्याच्या उल्फा या संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करा केला आहे.
• महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते महाराष्ट्र राज्याचे 47 वे मुख्य सचिव असणार आहेत.
• 16 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पनगारीया यांची नियुक्ती करण्यात आली.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले.