
ऑस्कर पुरस्कार २०२४

96 वा अकादमी पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार नुकताच कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.
आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींमध्ये आपण 2024 चे ऑस्कर पुरस्कार विजेते , ऑस्कर पुरस्काराचा इतिहास, ऑस्कर पुरस्कार विजेते भारतीय, ऑस्कर पुरस्कारासंबंधी स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न, संभाव्य प्रश्न बघणार आहोत.
2024 चे ऑस्कर पुरस्कार विजेते
2024 ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ओपनहायमर चित्रपटाने तब्बल सात पुरस्कार जिंकले.
1. सर्वोत्कृष्ट चित्रपट - ओपनहायमर
2. सर्वोत्कृष्ट अभिनेता - सिलियन मर्फी ( ओपनहायमर )
3. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - रॉबर्ट डाउनी ज्युनियर ( ओपनहायमर )
4. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - ख्रिस्तोफर नोलन ( ओपनहायमर )
5. सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग - जेनिफर लेम ( ओपनहायमर )
6. सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी /छायाचित्रण - Hoyte van Hoytema ( ओपनहायमर )
7. सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर / पार्श्व संगीत - लुडविग गोरानसन ( ओपनहायमर )
वरील सात पुरस्कार ओपन हायमर या चित्रपटासाठी मिळाले तर
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार एमा स्टोन यांना पुअर थिंग्ज चित्रपटासाठी मिळाला.
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री द वाईन जॉय रेणडॅाल्फ यांना द होल्डोव्हर्स चित्रपटासाठी मिळाला.
ऑस्कर पुरस्काराचा इतिहास / ऑस्कर पुरस्काराविषयी अधिक माहिती
• आंतरराष्ट्रीय फिल्म उद्योगात कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान म्हणून ऑस्कर पुरस्काराची सुरुवात करण्यात आली.
• अकादमी पुरस्कारास ऑस्कर पुरस्कार म्हणूनही ओळखले जाते.
• अकादमी पुरस्काराची स्थापना 1929 मध्ये करण्यात आली.
• ऑस्कर पुरस्कार संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स ( AMPAS ) कडून दरवर्षी देण्यात येतो.
ऑस्कर विजेते भारतीय
आतापर्यंत ( 2024 पर्यंत ) भारताला सात ऑस्कर पुरस्कार मिळालेली आहेत.
ऑस्कर विजेते भारतीयांची यादी पुढीलप्रमाणे :
1. भानू अथैय्या (1983) - भानू अथैय्या यांना 1983 साली सर्वोत्कृष्ट कॅास्च्यूम डिझाईन साठी ऑस्कर पुरस्कार भेटला.
2. सत्यजीत रे (1992) - सत्यजीत रे यांना चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल 1992 ची ॲानरेरी ऑस्कर पुरस्कार भेटला.
3. रेसुल पुक्कुट्टी (2009) - रेसुल पुक्कुट्टी यांना सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग 2009 चा ऑस्कर पुरस्कार भेटला.
4. गुलजार (2009) - गुलजार यांना सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉंग २००९ चा ऑस्कर पुरस्कार भेटला.
5. ए. आर. रेहमान (2009) - ए. आर. रेहमान यांना सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर आणि सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉंग 2009 चा ऑस्कर पुरस्कार जय हो या गाण्यासाठी भेटला.
6. कार्तिकी गोन्साल्विस (2023)- कार्तिकी गोन्साल्विस बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म 2023 चा ऑस्कर पुरस्कार भेटला.हा पुरस्कार त्यांना द एलिफंट विस्परर्स या लघुपटासाठी भेटला.
7. एम. एम. कीरवानी आणि चंद्रबोस (2023)- एम. एम. कीरवानी आणि चंद्रबोस सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉंग २०23 चा ऑस्कर पुरस्कार भेटला. त्यांना हा पुरस्कार RRR फिल्म मधील नाटू- नाटू या गाण्यासाठी भेटला. एम. एम. कीरवानी हे नाटू- नाटू या गाण्याचे संगीतकार आहे तर नाटू- नाटू या गाण्याचे गीतकार चंद्रबोस हे आहेत.
सरळसेवा, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न) 2024 पर्यंत भारताने किती ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत ?
उत्तर : सात
प्रश्न ) भारतातील पहिला ऑस्कर पुरस्कार कोणास मिळाला ?
उत्तर : भानू अथैय्या यांना 1983 साली सर्वोत्कृष्ट कॅास्च्यूम डिझाईन साठी ऑस्कर पुरस्कार भेटला. ऑस्कर पुरस्कार भेटलेल्या त्या पहिल्या भारतीय आहेत.
प्रश्न ) यंदाचा सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ?
उत्तर : ओपनहायमर
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD)
https://www.tcs9.in/mr/current-affairs/14-va-rasriya-matadara-divasa-nvd
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff