
जागतिक वन्यजीव दिन | महाराष्ट्र वन विभागाने केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड | देशातील बिबट्यांच्या संख्येत वाढ

जागतिक वन्यजीव दिन : 3 मार्च
World Wildlife Day
दर वर्षी 3 मार्च रोजी संयुक्त राष्ट्र जागतिक वन्यजीव दिन साजरी केला जातो.
जागतिक वन्यजीव दिन का आणि केव्हा साजरी करतात ?
• अस्तित्व धोक्यात असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 2013 पासून दरवर्षी 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन साजरा करतात.
• 20 डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने आपल्या 68 व्या अधिवेशनात वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशनाचा स्वीकार करण्याचा, आंतरराष्ट्रीय दिवस 3 मार्च घोषित करण्याचा निर्णय घेतला.
• जागतिक वन्यजीव दिन पृथ्वीवरील व वैविध्यपूर्ण आणि भव्य वन्यजीवांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे.
• हा दिवस आपल्याला वन्यजीव संदर्भातील गुन्हेगारी आणि वन्य प्रजाती नष्ट करण्याच्या विरोधात लढा उभारण्याची प्रेरणा व आठवण करून देतो.
जागतिक वन्यजीव दिन 2024 ची संकल्पना ( थीम ) काय आहे ?
" कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट : एक्सप्लोरिंग डिजिटल इनोवेशन इन व वाइल्डलाईफ कन्सर्वेशन "
“Connecting People and Planet: Exploring Digital Innovation in Wildlife Conservation”

जागतिक वन्यजीव दिन 2024 ची थीम डिजिटल इनोव्हेशन वर लक्ष केंद्रित करते डिजिटल इनोवेशनचा म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर वन्यजीव संरक्षणासाठी करणे हा आहे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न ) जागतिक वन्यजीव दिन कधी साजरी करतात ?
1. 25 जून
2. 3 मार्च
3. 13 मार्च
4. 4 डिसेंबर
उत्तर : 3 मार्च
महाराष्ट्र वन विभागाने केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

नुकत्याच झालेल्या ताडोबा महोत्सव 2024 मध्ये महाराष्ट्र वन विभागाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला.
त्यांनी 26 वेगवेगळ्या प्रजातींमधून तब्बल 65, 724 रोपे वापरून ‘ भारतमाता ’ हा शब्द तयार केला.
कुंडीत लावलेल्या रोपांपासून बनवलेला सर्वात मोठा शब्द ही पदवी मिळवून महाराष्ट्र वन विभागाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न) नुकत्याच झालेल्या ताडोबा महोत्सव 2024 मध्ये कोणत्या राज्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला ?
1. उत्तर प्रदेश
2. मध्य प्रदेश
3. महाराष्ट्र
4. छत्तीसगड
उत्तर : महाराष्ट्र
देशातील बिबट्यांच्या संख्येत वाढ

अलीकडेच केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतातील बिबट्यांच्या सध्या स्थितीबाबत अहवाल जाहीर केला.
या अहवालात 2018 च्या तुलनेत 2022 मध्ये बिबट्यांच्या संख्येत 1.08 टक्क्यांनी वाढ झाल्याची दिसते.
देशात बिबट्यांची संख्या आता 13874 वर पोहोचलेली दिसते.
सर्वेक्षण कोणी केली ?
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी वनविभागाच्या सहाय्याने 18 राज्यांमध्ये हे सर्वेक्षण केले.
बिबट्यांची संख्या सर्वाधिक असणारे राज्ये पुढीलप्रमाणे :
• मध्य प्रदेश 3907
• महाराष्ट्र 1985
• कर्नाटक 1789
सरळसेवा, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
भारतीय वन्यजीव संस्था
भारतीय वन्यजीव संस्थेची स्थापना केव्हा केली गेली ?
भारतीय वन्यजीव संस्थेची स्थापना 1982 मध्ये केली गेली.
भारतीय वन्यजीव संस्था कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते ?
पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय वन्यजीव संस्था येते.
भारतीय वन्यजीव संस्था कोठे आहे ?
• भारतीय वन्यजीव संस्था देहरादून येथे आहे.
• भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांच्या थेट भरतीचे तसेच राज्य वन अधिकारी म्हणून निवड झालेल्या व्यक्तींचे प्रशिक्षण देहरादून येथे होते.
• येथील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी भारतातील वन्यजीवांचा अभ्यास व संरक्षणात मोलाचे योगदान दिले आहे.
भारतीय वन्यजीव संस्था काय काम करते ?
जैवविविधता, लुप्त प्रजाती, वन्यजीव धोरण व व्यवस्थापन, निवासस्थान, पर्यावरणशास्त्र, हवामान बदल इत्यादी क्षेत्रांचा अभ्यास तसेच वन्यजीव संबंधित संशोधन करणे.
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD)
https://www.tcs9.in/mr/current-affairs/14-va-rasriya-matadara-divasa-nvd
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff