
देशात CAA कायदा लागू

देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू
• सोमवार, दिनांक ११ मार्च 2024 पासून देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा,2019 केंद्र सरकारने लागू केला.
• नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 अर्थात Citizenship Amendment Act 2019 (CAA ) या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व कायदा,1955 यात सुधारणा करण्यात आली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 म्हणजे काय ?
• नागरिकत्व दुरुस्ती कायद्या अंतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील गैर मुस्लिम नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते.
• धर्मामुळे छळ झाल्याने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमधून हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी, आणि ख्रिश्चन अल्पसंख्यांक समुदाय भारतात स्थलांतरित झाला.
• या वरील देशांतील स्थलांतरित अल्पसंख्यांक समुदायाच्या व्यक्तींचे पुनर्वसनासाठी, त्यांना सन्मानाने जीवन जगता येण्यासाठी त्यांना भारतीय नागरिकत्व या सुधारित कायद्यामुळे मिळेल.
• 31 डिसेंबर २०१४ पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमधून आलेल्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी, आणि ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समुदायाला नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात येईल यासाठी त्यांना ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल.
• याआधी भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षे राहणे आवश्यक होते. परंतु भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा,2019 मुळे आता ही अट शिथिल करून 5 वर्षे करण्यात आली आहे.
सरळसेवा, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न ) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला राष्ट्रपतींनी कधी मंजुरी दिली ?
उत्तर : 12 डिसेंबर 2019 रोजी तत्कालीन राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला मंजुरी दिली.
प्रश्न ) भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 अंतर्गत व्यक्तीस भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतात राहण्यासाठीची मुदत किती वर्ष करण्यात आली ?
उत्तर : 5 वर्षे
प्रश्न) भारतीय नागरिकत्व संविधानाच्या कितव्या भागात आहे ?
उत्तर : भारतीय नागरिकत्व संविधानाच्या दुसऱ्या भागात आहे. भारतीय संविधानाच्या कलम 5 ते 11 दरम्यान भारतीय नागरिकत्वाबद्दल माहिती मिळते.
प्रश्न ) भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला ?
(MPSC STI 2012 )
1. 1935
2. 1951
3. 1955
4. 1956
उत्तर : 1955
प्रश्न ) भारतीय नागरिकत्व कायदा, 1955 च्या अनुसार भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या किती तरतुदी आहेत आणि कोणत्या ?
उत्तर : 1955 च्या नागरिकत्व कायद्यामध्ये भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या पाच मार्गांची तरतूद करण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे 1)जन्मतत्वाद्वारे 2) वंशतत्त्वाद्वारे 3) नोंदणी तत्त्वाद्वारे 4) स्वीकृतीकरण तत्त्वाद्वारे 5) प्रदेशाचे भारतात समिलीकरणाद्वारे
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD)
https://www.tcs9.in/mr/current-affairs/14-va-rasriya-matadara-divasa-nvd
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#policebhartiprashnsanch
#policebhartipreviousyearquestionpapaer
#policebhartijahirat
#policebharticutoff
#policebhartigr
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff