
महात्मा ज्योतीबा फुले जयंती

महात्मा ज्योतीबा फुले
लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन
आजच्या या लेखात आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल माहिती बघणार आहोत तसेच त्यांच्याबद्दल विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्नही बघणार आहोत ते लेखाच्या शेवटी असणार आहे.
महात्मा ज्योतीबा फुले
- जन्म : 11 एप्रिल 1827 रोजी कटगुण, जिल्हा सातारा येथे झाला.
- पूर्ण नाव : ज्योतिराव गोविंदराव फुले
- मूळ आडनाव : ज्योतिबांचे आजोबा शेवटच्या पेशव्यांच्या काळात फुलांचा व्यवसाय करीत त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे असे होते परंतु व्यवसायावरून फुले हेच आडनाव पडले.
- आईचे आणि वडिलांचे नाव : महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले होते तर आईचे नाव चिमनाबाई असे होते.
महात्मा ज्योतीबा फुले यांचे कार्य :
देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा फुले यांनी रोवली.
• त्यांनी 3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली.
• 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा काढली
• तर 15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेत तिसरी शाळा काढली.
• 1863 मध्ये पुण्याच्या स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली.
• 24 सप्टेंबर 1873 पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
• 1865 मध्ये केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी नाव्ह्यांचा संप तळेगाव ढमढेरे व ओतूर या गावी केला.
• 1882 मध्ये शिक्षणा संदर्भातील आलेल्या हंटर कमिशन पुढे साक्ष महात्मा ज्योतीबा फुले यांनी दिली. जनतेसाठी शिक्षणाची मागणी केली आणि हंटर कमिशनला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे ही विनंती केली.
• 11 मे 1888 रोजी कोळीवाडा, मुंबई येथील जनतेने रावबहादुर वड्डेदार यांच्या हस्ते महात्मा ही पदवी बहाल करून त्यांच्या कार्याचा गौरव केला
• महात्मा ज्योतीबा फुले यांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ : तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, शिवाजी महाराजांचा पोवाडा, गुलामगिरी, शेतकऱ्याचे असुड, सार्वजनिक सत्यधर्म, अस्पृश्याची कैफियत इत्यादी.
• छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असेल संबोधले.
• संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, मार्टिन विद्यार्थी यांच्या विचारांचा महात्मा फुलेंवर मोठा प्रभाव होता.
• राईट्स ऑफ मॅन या थॉमस पेन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचाही महात्मा फुलेंवर मोठा प्रभाव पडला.
• 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.
सत्यशोधक समाज :
स्थापना : 24 सप्टेंबर 1873 पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
घोषवाक्य : सर्व साक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी
मूळ उद्दिष्ट : बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे सत्यशोधक समाजाचे मूळ उद्दिष्ट होते.
मानवता, बुद्धीप्रामाण्यवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे सत्यशोधक समाजाचे मूळ आधार स्तंभ आहेत.
‣ सत्यशोधक समाजाची प्रार्थना रविवारी होत असे.
‣ सत्यशोधक समाजातर्फे अंबालहरी हे वृत्तपत्र चालविली जात असे.
‣ सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह सीताराम अल्हाट आणि राधाबाई निंबकर यांचा झाला.
महात्मा ज्योतीबा फुले यांवर सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न ) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते ?
( MPSC ASO -2014 )
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2. छत्रपती शाहू महाराज
3. महात्मा ज्योतिबा फुले
4. वी.रा. शिंदे
उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले
छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असेल संबोधले.
प्रश्न ) खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारात सुरुवात केली ?
( MPSC - PSI 2016 )
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2. महात्मा ज्योतिबा फुले
3. श्रीमंत जयसिंगराव
4. गोदूताई कर्वे
उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले
प्रश्न ) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
( सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC )
1. आचार्य बाळशास्त्री जांभेकर
2. गोपाळ गणेश आगरकर
3. महात्मा ज्योतिबा फुले
4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले
प्रश्न) ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी -------यांनी दिली.
( MPSC -PSI 2013, महाराष्ट्र पोलीस भरती )
1. सरकार
2. पुणेकर जनता
3. सातारकर जनता
4. मुंबईचे नागरिक
उत्तर : मुंबईचे नागरिक
11 मे 1888 रोजी कोळीवाडा, मुंबई येथील जनतेने रावबहादुर वड्डेदार यांच्या हस्ते महात्मा ही पदवी बहाल करून ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव केला.
प्रश्न ) सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी----- येथे मुलींची पहिली शाळा काढली.
(MPSC गट क , महाराष्ट्र पोलीस भरती नांदेड 2023 )
1. जेजुरी गड
2. शनिवार वाडा
3. भिडे वाडा
4. रायगड किल्ला
उत्तर : भिडे वाडा
3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला ?
( महाराष्ट्र पोलीस भरती 2023, 2021, 2017.....)
1. 14 एप्रिल 1827
2. 14 एप्रिल 1828
3. 11 एप्रिल 1827
4. 18 एप्रिल 1827
उत्तर : 11 एप्रिल 1827
11 एप्रिल 1827 रोजी कटगुण, जिल्हा सातारा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला.
महाराष्ट्र पोलीस भरती फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
https://www.tcs9.in/mr/test-series/maharashtra-police
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD)
https://www.tcs9.in/mr/current-affairs/14-va-rasriya-matadara-divasa-nvd
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff
#mahatmaPhulemahiti
#mahatmaphulemarathinibandh
#mpscmaharashtrachesamajsudharaknotes
#mpscmaharashtrachaitihas