
रवींद्रनाथ टागोर जयंती

• विश्व कवी, शिक्षणतज्ञ, चित्रकार, कादंबरीकार, समाजसुधारक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची आज जयंती त्यांना विनम्र अभिवादन.
• गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती निमित्ताने परीक्षेच्या दृष्टीने आपण त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात बघणार आहोत, तसेच लेखाच्या शेवटी सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या संदर्भात विचारलेले / संभाव्य प्रश्नही बघणार आहोत.
• जन्म : रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कलकत्ता येथे झाला.
• इंग्लंड येथून भारतात परतल्यावर त्यांनी ग्रंथालये, शाळा, पूजा स्थळांचे निर्माण केले.
• विद्यार्थ्यांनी शाळेच्या चार भिंतीच्या बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण घ्यावे असे त्यांचे मत होते यासाठी त्यांनी शांतीनिकेतनची सुरुवात केली.
• रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधींना महात्मा ही पदवी दिली.
साहित्य आणि पुरस्कार
• रवींद्रनाथ टागोरांना बंगाली गद्य आणि कवितांच्या आधुनिकीकरणांसाठी ओळखले जाते.
• त्यांनी 2000 राहून अधिक गीतांची रचना केली.
• त्यांनी लिहिलेल्या गीतांजली या ग्रंथासाठी 1913 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
• नोबेल पुरस्कार मिळणारे ते पहिले गैर युरोपियन होते.
• त्यांनी भारताचे राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’ आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत ‘आमार सोनार बांगला’ या गीतांची रचना केली.
• ‘एकला चलो रे’ या प्रसिद्ध गाण्याची रचनाही रवींद्रनाथ टागोरांनी केली.


नाईटहूड किताब
• 1915 मध्ये इंग्लंडचा राजा जॉर्ज पंचम यांनी रविंद्रनाथ टागोर यांना नाईटहूड पदवी दिली. या पदवीलाच सर ही पदवी म्हणूनही ओळखले जाते.
• परंतु 1919 साली जालियनवाला बाग येथे ब्रिटिश सैन्याने केलेल्या गोळीबारात अनेक निशस्त्र नागरिकांचा मृत्यू झाला याच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या नाईटहूड (सर) या पदवीचा त्याग केला.
भारतरत्न पुरस्कार
1955 साली मरणोत्तर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
रवींद्रनाथ टागोर यांचा दीर्घ आजाराने 7 ऑगस्ट 1941 रोजी मृत्यू झाला.

सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न) 1919 साली झालेल्या जालियनवाला बागेतील हत्या कांड च्या निषेधार्थ ----- यांनी आपला नाईट हूड हा किताब सरकारला परत केला.
(MPSC ; महाराष्ट्र पोलीस भरती; SSC GD....)
1. महात्मा गांधी
2. रवींद्रनाथ टागोर
3. सरदार वल्लभाई पटेल
4. साने गुरूजी
उत्तर : रवींद्रनाथ टागोर
प्रश्न) महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली ?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर
प्रश्न ) नोबेल पुरस्कार प्राप्त पहिले भारतीय कोण आहे ?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार प्राप्त पहिले आशियाई (आणि भारतीय) आहे.
प्रश्न ) भारताचे राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’ या गीताची रचना कोणी केली ?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD)
https://www.tcs9.in/mr/current-affairs/14-va-rasriya-matadara-divasa-nvd
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#rabindranathtagore
#maharashtrapolicebharti
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#policebhartiprashnsanch
#policebhartipreviousyearquestionpapaer
#policebhartijahirat
#policebharticutoff
#policebhartigr
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff