
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती

न्यायस्वरूप, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
• पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने परीक्षेच्या दृष्टीने आपण त्यांबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत, तसेच लेखाच्या शेवटी सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या संदर्भात विचारलेले / संभाव्य प्रश्नही बघणार आहोत.
जन्म :
• पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील, जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला.
• 2024 मध्ये त्यांची 299 वी जयंती साजरी होत आहे.
विवाह :
सरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव मल्हाराव होळकरांशी अहिल्यादेवी यांचा विवाह १७३३ मध्ये वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी झाला. मल्हारराव होळकर हे मावळ प्रांताचे जहागीरदार होते.
• 1754 मध्ये कुम्हेरच्या लढाईत अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर धारातीर्थी पडले.
• पतीच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी सती जाण्यास निघाली परंतु सासरे मल्हारराव होळकर आणि त्यांना सती जाऊ दिले नाही.
• 11 डिसेंबर 1767 मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मावळाच्या सिंहासनावर बसल्या.
सामाजिक आणि राजकीय कारकीर्द :
1767 ते 1795 पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी मावळाचा राज्यभार सांभाळला.,त्यांनी अनेक सुधारणाही केल्या त्या पुढील प्रमाणे -
पायाभूत सुविधांचा विकास:
• प्रजेचे जीवनमान उंचावण्यासाठी मंदिरे, घाट, विहिरी, रस्ते यांचे बांधकाम व नूतनीकरण करण्यात आले.
• लोकांना रोजगार निर्माण करण्यासाठी औद्योगिक धोरण राबविण्यात आले.
सामाजिक विकास
• विधवा, अनाथ, सामाजिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांना त्यांनी आधार दिला.
न्यायिक सुधारणा :
• पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या उचित न्यायाधनासाठी प्रसिद्ध होत्या.
• न्यायला प्राधान्य देणारी आणि व्यक्ती हक्कांचे संरक्षण करणारी निष्पक्ष न्यायव्यवस्था त्यांनी स्थापन केली.
मंदिरांचे जीर्णोद्धार व कला आणि संस्कृतीचे संरक्षण :
• पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केला.
• त्यांनी अनेक तीर्थस्थानी धर्मशाळांचे बांधकाम केले.
• त्यांनी महेश्वर, इंदौर अशा गावांचा विकास करून कला आणि संस्कृतीचे संरक्षण केले.
मृत्यू :
13 ऑगस्ट 1795 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी इंदोर (मध्य प्रदेश) येथे त्यांचे निधन झाले.
पदव्या :
ब्रिटिश इतिहासकार जॉन की यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना द फिलॉसॉफर क्वीन असे म्हटले आहे.
इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना भारताच्या कॅथिन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट असे म्हटले आहे.
(कॅथिन द ग्रेट - रशियाची राणी
एलिझाबेथ- इंग्लंडची राणी
मार्गारेट - डेन्मार्कची राणी)


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला ?
1. पुणे
2. मुंबई
3. अहमदनगर
4. छत्रपती संभाजीनगर
उत्तर : अहमदनगर
प्रश्न) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांबद्दल खालील विधानांवर विचार करा
1. यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात झाला.
2. 1867 मध्ये त्या इंदोरच्या शासक बनल्या.
3. त्यांना द फिलॉसॉफर क्वीन असे म्हटले जाते.
वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहे
1. फक्त एक
2. फक्त दोन फक्त
3. एक आणि तीन
4. वरीलपैकी सर्व
उत्तर : वरीलपैकी सर्व
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD)
https://www.tcs9.in/mr/current-affairs/14-va-rasriya-matadara-divasa-nvd
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#ahilybaiholkar
#maharashtrachaitihas
#punyashlokahilyabaiholkarjayantimahiti
#mpsc
#upsc
#maharashtrapolicebharti
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#policebhartiprashnsanch
#policebhartipreviousyearquestionpapaer
#policebhartijahirat
#policebharticutoff
#policebhartigr
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff