
चालू घडामोडी 02, ऑगस्ट 2024

54 वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ॲालिम्पियाड 2024
54th International Physics Olympiad 2024
आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ॲालिम्पियाड स्पर्धेत महाराष्ट्राच्या आकर्ष राज सहाय याने रौप्य पदक जिंकले.
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2024 ची 54 वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ॲालिम्पियाड स्पर्धा कोठे पार पडली ?
1. भारत
2. श्रीलंका
3. अमेरिका
4. इराण
उत्तर : इराण

• इराणमधील इस्फाहान येथे 21 जुलै ते 29 जुलै दरम्यान 54 वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा पार पडली.
• या स्पर्धेत भारताकडून पाच विद्यार्थी सहभागी झाले होते आणि या पाचही विद्यार्थ्यांनी पदके जिंकली.
• या स्पर्धेत भारताने 2 सुवर्ण (Gold) तर 3 रौप्य (Silver) पदके जिंकली.
पदक विजेते :
1. ऱ्हिदम केडिया(सुवर्ण) : रायपूर, छत्तीसगड
2. वेद लाहोटी(सुवर्ण) : इंदूर, मध्य प्रदेश
3. आकर्ष राज सहाय(रौप्य): नागपूर, महाराष्ट्र
4. भाव्या तिवारी(रौप्य) : नॉयडा, उत्तर प्रदेश
5. जयवीर सिंह(रौप्य): कोटा, राजस्थान
आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ॲालिम्पियाड स्पर्धा काय आहे ?
• ही हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अपवादात्मक भौतिक क्षमतांचे प्रदर्शन करणारी वार्षिक स्पर्धा आहे
• सखोल समज, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि भौतिकशास्त्र संकल्पना लागू करण्यात सर्जनशीलता अशा बाबींवर ही स्पर्धा पार पडते.
• भविष्यातील शास्त्रज्ञांच्या - भविष्यातील पिढ्यांना उत्कृष्ट, नेटवर्क आणि प्रेरणा देण्यासाठी इच्छुक भौतिकशास्त्रज्ञांसाठी एक व्यासपीठ म्हणून ही स्पर्धा काम करते.
तरंगशक्ती सराव : 2024
Exercise Tarang Shakti : 2024
Subject : GS- युद्ध अभ्यास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) तरंगशक्ती सरावाबद्दल बरोबर असणार पर्याय निवडा
1. 2024 तरंग शक्ति सरावाचे आयोजन भारतामध्ये होणार आहे.
2. हा पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव असणार आहे.
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक
उत्तर : दोन्ही बरोबर

• भारतात आयोजित केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय हवाई सराव असेल.
• भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) आयोजित केलेला या बहुराष्ट्रीय हवाई सरावात ५१ देशांना निमंत्रित करण्यात आले आहे.
• तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये दोन टप्प्यात ‘तरंग शक्ती’ या आंतरराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन भारत करणार आहे.
• सरावाचा पहिला टप्पा 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान तामिळनाडूमधील सुलूर येथे आयोजित केला जाईल.
• दुसरा टप्पा 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत राजस्थानमधील जोधपूर येथे होणार आहे.
सरावाचे उद्दिष्टे :
• आंतरराष्ट्रीय समुदायातील आपल्या मित्र देशांसोबत धोरणात्मक संबंध मजबूत करणे हा आहे हे या सरावाचे उद्दिष्टे असणार आहेत.
• सहभागी देशांसोबत टेक्नॉलॉजीचे देवाण-घेवाण करणे, व्यावसायिक संवाद वाढवणे आणि ऑपरेशन क्षमता वाढवणे
जगातली सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा जलतरणपटू
First Girl with Autism to Swim Across English Channel
Subject : GS- खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) इंग्लिश खाडी यशस्वीरित्या पोहून पार करणारी जगातील सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा-जलतरणपटू खालील पैकी कोण आहे ?
1. सिमरण गौंडळकर
2. जिया राय
3. समीर बर्मन
4. मनू भाकेर
उत्तर : जिया राय

• जिया राय ही 16 वर्षांची मुलगी, इंग्लिश खाडी यशस्वीरित्या पोहून पार करणारी जगातील सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा-जलतरणपटू बनली आहे.
• जिया राय ही स्वमग्नता (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर) या विकाराने पिडीत आहे.
• जिया हिने 17 तास 25 मिनिटांत 34 किलोमीटरचे अंतर कापून एकट्याने पोहण्याची ही कामगिरी केली.
• इंग्लिश खाडी पोहून जाण्याच्या 150 वर्षांच्या इतिहासात, जिया ही ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेली पहिली मुलगी आहे जिने हे यश संपादन केले आहे.
स्वमग्नता (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर) म्हणजे काय ?
• स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो.
• अशी व्यक्ती आपल्याच विश्वात आणि विचारात रममाण असतात. अशा व्यक्ती संवेदनांचे अर्थ लावू शकत नाहीत. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देता येत नाही.
• गर्भ वाढत असताना आणि जन्मल्यावर चेतासंस्थेचा विकास होताना काही अडथळे निर्माण झाले तर हा आजार होतो.
पॅरा-जलतरणपटू म्हणजे काय ?
• पॅरा जलतरणपटू हे अपंग खेळाडूंसाठी पोहण्याच्या खेळाचे रूपांतर आहे .
• स्पर्धेत जलतरणपटूंचे वर्गीकरण त्यांच्या अपंगत्वाच्या प्रकारानुसार व मर्यादेनुसार केले जाते.
रोहन बोपन्ना
Subject : GS- खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) निवृत्तीची घोषणा करणारे रोहन बोपन्ना हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1. टेनिस
2. फुटबॉल
3. हॉकी
4. क्रिकेट
उत्तर : टेनिस

रोहन बोपन्ना बद्दल परीपरीक्षेच्या दृष्टीने थोडक्यात माहिती :
• जन्म : 4 मार्च 1980 रोजी बंगलोर, कर्नाटक येथे झाला.
• रोहन बोपण्णा 11 वर्षांचा असल्यापासून टेनिस खेळत आहे.
• रोहन बोपण्णा ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. बोपन्नानं हा किताब 43 वर्षे 329 दिवसाच्या वयात मिळवला आहे.
पुरस्कार :
• 2019 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च क्रीडा सन्मान अर्जुन पुरस्काराने सन्मानित
• २०२४ साली भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.