
चालू घडामोडी 1 ऑगस्ट 2024

जागतिक निसर्ग संवर्धन दिवस : 2024
World Nature Conservation Day : 2024
Subject : GS- पर्यावरण, दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिन केव्हा साजरी केला जातो ?
1. 14 जुलै
2. 28 जुलै
3. 5 ऑगस्ट
4. 5 जून
उत्तर : 28 जुलै
• जागतिक निसर्ग संवर्धन दिन, दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो.
जागतिक निसर्ग संवर्धन दिन का साजरी करतात ?
• जागतिक निसर्ग संवर्धन दिन पृथ्वीच्या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जगभरात साजरा केला जातो.
• जंगलतोड, प्रदूषण, हवामान बदल, जैवविविधता नष्ट होणे, आणि अधिवासाचा नाश यांसारख्या वाढत्या पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
उद्दिष्टे :
• शाश्वत विकास, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जबाबदारीने वापर करणे.
• नैसर्गिक इंधन - साधनसंपत्ती तयार होण्यास लाखो वर्ष लागतात. आजच्या पिढीला आपल्या गरजा भागवत असताना पुढील पिढ्यांचाही विचार करणे आवश्यक आहे.
• त्यामुळे शाश्वत विकास आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
जागतिक निसर्ग संवर्धन दिन 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
"लोक आणि वनस्पती जोडणे, वन्यजीव संवर्धनात डिजिटल इनोव्हेशन एक्सप्लोअर करणे" ही 2024 ची जागतिक निसर्ग संवर्धन दिनाची थीम आहे.
"Connecting People and Plants, Exploring Digital Innovation in Wildlife Conservation"
Mettur Dam
मेत्तूर धरण
बातम्यांमध्ये : मेत्तूर धरणात जास्त प्रमाणात पाणी वाढल्याने मेत्तूर धरणाच्या सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Subject : GS- भारताचा भूगोल - नदी
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मेत्तूर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे ?
1. गोदावरी
2. गंगा
3. कावेरी
4. कृष्णा
उत्तर : कावेरी
मेत्तूर धरणबाबत महत्त्वाची माहिती :
• मेत्तूर धरण तामिळनाडू राज्यातील सेलम जिल्ह्यात 1934 मध्ये बांधण्यात आले आहे.
• हे धरण कावेरी नदीवर बांधण्यात आले.
• मेत्तूर धरणाचे बांधकाम दगडी असून हे एक गुरुत्वाकर्षण धरण आहे.
• धरणाची लांबी 1700 मीटर असून कमाल पातळी 120 फूट आणि धरणाची क्षमता 93.4 TMC फूट आहे.
• मेत्तूर प्रकल्प हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे.
• धरण, उद्यान, प्रमुख जलविद्युत केंद्रे आणि सर्व बाजूंच्या टेकड्या यामुळे मेत्तूर एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे.
• मेत्तूर प्रकल्प तामिळनाडूच्या 12 हून अधिक जिल्ह्यांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवते.
• धरण स्टॅनले जलाशय तयार करते.
• धरणाच्या पायथ्याशी मेत्तूर जलविद्युत आणि थर्मल पॉवर प्लांट आहे.
कावेरी नदीबद्दल महत्त्वाची माहिती:
• कावेरी नदी ही दक्षिण भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे.
• कावेरी नदी नैऋत्य कर्नाटकातील पश्चिम घाटाच्या ब्रह्मगिरी टेकडीवर उगम पावते.
• नदी कर्नाटक आणि तामिळनाडु मधून वाहते आणि शेवटी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.
• कावेरी नदीची एकूण लांबी ८०० किमी आहे.
• कावेरी नदीचे खोरे तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये पसरलेले आहे.
कावेरी नदीच्या उपनद्या :
• डावीकडील उपनद्या : हरंगी, हेमावती, शिमशा आणि अर्कावती या कावेरी नदीच्या डावीकडील महत्त्वाच्या उपनद्या आहेत.
• उजवीकडील उपनद्या : लक्ष्मीतीर्थ, कब्बानी, सुवर्णवती, भवानी, नोय्यल आणि अमरावती या कावेरी नदीच्या उजवीकडील महत्त्वाच्या उपनद्या आहेत.
कावेरी नदी वरील महत्त्वाची धरणे :
कृष्ण राजा सागरा धरण, आणि मेत्तूर धरण
कावेरी नदी काठावरील महत्वाचे शहरे :
म्हैसूर, इरोड, सेलम, तिरुचिरापली, तंजावर आणि मायिलादुथुराई ही काही प्रमुख ठिकाणे आहेत ज्यामधून कावेरी नदी जाते.
कावेरी नदीवर वसलेले महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान :
• कावेरी वन्यजीव अभयारण्य
• मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान
केरळ भूस्खलनात आत्तापर्यंत 143 जणांचा मृत्यू
Kerala Landslide
Subject : GS- भूगोल
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पश्चिम घाट पर्यावरण जैवविविधता समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
1. एल. एम. सिंघवी
2. माधव गाडगीळ
3. डॉ. सी. रंगराजन
4. यांपैकी नाही
उत्तर : माधव गाडगीळ
• एल. एम. सिंघवी समिती - पंचायती राज संस्था संदर्भात
• माधव गाडगीळ समिती - पश्चिम घाट पर्यावरण जैवविविधता संदर्भात
• डॉ. सी. रंगराजन समिती - दारिद्र्य निर्मूलन संदर्भात
बातम्यांमध्ये :
• केरळच्या डोंगराळ भागातील वायानाड जिल्ह्यातील व्याथरी तालुक्यात 3 गावांमध्ये भूस्खलन झाले.
• 30 जुलै रोजी पहाटे झालेल्या या भूस्खलनात (Landslide) आत्तापर्यंत 144 जणांचा मृत्यू झाला आणि 197 जखमी आहे.
• ही दुर्घटना रात्री एकच्या सुमारास पहिला भूस्खलन झाला आणि त्यानंतर पहाटे साडेचार वाजता दुसरा भूस्खलन झाला.
• लोक झोपेत असताना झालेल्या या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.
भूस्खलन म्हणजे काय ?
• डोंगर कड्यावरून दरड किंवा खडक कोसळणं, जमीन खचणे अशा घटनांना आपण भूस्खलन म्हणतो.
• भूस्खलन प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात होतात जेथे माती, खडक, डोंगर उताराची अनुकूल परिस्थिती असते.
भूस्खलनची कारणे :
• भूस्खलन नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन्ही कारणांमुळे होते.
• नैसर्गिक कारणांमध्ये अतिवृष्टी, भूकंप, बर्फ वितळणे आणि पुरामुळे उतार कमी होणे यांचा समावेश होतो.
• मानवनिर्मित कारणांमध्ये उत्खनन, टेकड्या आणि झाडे तोडणे, पायाभूत सुविधांचा अत्याधिक विकास (उदाहरणार्थ - रस्ते बांधणे , धरण बांधणे इत्यादी.)आणि गुरेढोरे जास्त चरणे यांसारख्या कारणांचा समावेश आहे.
• भारतात, पावसामुळे भूस्खलनाच्या घटना अधिक सामान्य आहेत.
• जुलै 2023 मध्ये रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली होती.
• 30 जुलै 2014 ला पुण्यातील आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावात तर अख्खा डोंगर कोसळला. रात्रीत हे गाव होत्याचं नव्हतं झालं.
• अशा अनेक घटना आपल्याला दरवर्षी पावसाळ्यात ऐकू येतात.
माधव गाडगीळ आयोग -
• पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली सरकारने स्थापन केलेल्या "पश्चिम घाट इकोलॉजी एक्स्पर्ट पॅनेल" ने वायनाड पर्वतरांगांना पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील घोषित करण्याची शिफारस केली आहे.
• माधव गाडगीळ आयोगाने ऑगस्ट 2011 साली आपला अहवाल सादर केला.
• या समितीने केलेल्या शिफारशी बहुतांश राज्यांनी नाकारल्या.