संविधान हत्या दिवस
Samvidhan Hatya Diwas
बातम्यांमध्ये : " संविधान हत्या दिवस, भारतीय संविधान पायदळी तुडवले गेलेल्या काळाची आठवण करून देईल," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
Subject : GS - राज्यशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकताच ------- ला संविधान हत्या दिवस म्हणून घोषित करण्यात आले.
1. 14 मार्च
2. 25 जून
3. 18 जुलै
4. 11 सप्टेंबर
उत्तर : 25 जून
• केंद्र सरकार द्वारे 25 जूनला संविधान हत्या दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
• 25 जून हा दिवस आणीबाणीच्या अतिरेकांमुळे सहन केलेल्या सर्व लोकांना श्रद्धांजली अर्पण करेल.
• नागरिकांना त्यांच्या अधिकारांबद्दल आणि लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी, संविधानाचे महत्त्व जागरूकतेसाठी आणि भारताचे लोक तंत्र आणि संविधानावर दृढ विश्वास ठेवण्यासाठी हा दिवस प्रेरणादायी असेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
25 जून हीच तारीख का जाहीर करण्यात आली ?
• 25 जून 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कलम 352 अंतर्गत अशांतता या कारणावरून राष्ट्रीय आणिबाणी लागू करण्यात आली.
• या आणीबाणीद्वारे भारताच्या राज्यघटनेतील आणीबाणी विषयक तरतुदींचा दुरुपयोग केल्याचा दिसून येते.
• या आणीबाणीचा कालावधी 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 असा होता, जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने देशात महत्त्वपूर्ण कार्यकारी आणि कायदेमंडळ बदल करण्यासाठी संविधानातील विशेष तरतुदींचा वापर केला.
आणीबाणीचे प्रकार :
भारतीय राज्यघटनेत आणीबाणीचे 3 प्रकार दिले आहेत:- 1) राष्ट्रीय आणीबाणी 2) राज्य आणीबाणी आणि 3)वित्तीय आणीबाणी
1) राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency) : कलम 352
युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यांमुळे कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते.
2) राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी (State Emergency) : कलम 356
राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्याने कलम 356 अंतर्गत आणीबाणी लावली जाते. या आणीबाणीला राष्ट्रपती राजवट, राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी म्हणूनही ओळखले जाते.
3) वित्तीय आणीबाणी / आर्थिक आणीबाणी (Financial Emergency) : कलम 360
भारताचे वित्तीय स्थैर्य किंवा पत धोक्यात आल्याने कलम 356 अंतर्गत वित्तीय आणीबाणी लावली जाते.
आत्तापर्यंत 3 वेळेस राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
• पहिली राष्ट्रीय आणीबाणी : 1962 ते 1968 : भारत - चीन युद्ध
• दुसरी राष्ट्रीय आणीबाणी : 1971 ते 1977 : भारत- पाकिस्तान युद्ध
• तीसरी राष्ट्रीय आणीबाणी : 1975 ते 1977 : इंदिरा गांधी यांनी अंतर्गत अशांतता या कारणावरून
नोट : आजपर्यंत वित्तीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली नाही.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय राज्यघटनेच्या कलम ----- अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते.
(नवी मुंबई पोलीस भरती: 2023)
1. 352
2. 356
3. 360
4. 370
उत्तर : कलम 360
प्रश्न) भारतातील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी पुढील पर्यायातून निवडा
(महाराष्ट्र पोलीस भरती : मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस चालक 2023)
1. 1975 - 1977
2. 1974 - 1976
3. 1976 - 1978
4. 1975 - 1978
उत्तर : 1975 - 1977
प्रश्न) एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार लावण्यात येते ?
(महाराष्ट्र पोलीस भरती : सोलापूर पोलीस 2023)
- अनुच्छेद 352
- अनुच्छेद 356
- अनुच्छेद 358
- अनुच्छेद 360
उत्तर : अनुच्छेद 356
अमरावती विभागात 6 महिन्यात 557 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अमरावती विभागीय आयुक्तालयाने तयार केलेल्या अहवालानुसार 2024 मध्ये जानेवारी ते जून या 6 महिन्याच्या कालावधीत अमरावती विभागात एकूण 557 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
अहवालातील महत्त्वाचे मुद्दे :
अमरावती विभागात सर्वाधिक 170आत्महत्या एकट्या अमरावती जिल्ह्यात झाल्या.
जिल्ह्यानुसार आत्महत्यांची संख्या :
• अमरावती जिल्हा = 170
• यवतमाळ जिल्हा = 150
• बुलढाणा जिल्हा = 111
• अकोला जिल्हा = 92
• वाशिम जिल्हा = 34
शेतकऱ्यांना आत्महत्या कडे वळण्याची प्रमुख कारणे :
पिकांची नुकसान, पुरेशा पावसाची कमतरता, विद्यमान कर्जाचा बोजा आणि वेळेवर कृषी कर्ज न मिळाल्याने शेतकरी आत्महत्येकडे वळत आहेत.
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशन :
शेतकऱ्यांना मदत करणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करणे हे या मिशनचे उद्दिष्टे आहे.
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशन महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये राबविले जात आहेत.
मिशन मधील प्रमुख उपक्रम :
• सर्व शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्याचा प्रस्ताव
• विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीवर भर देणे
• शिक्षण आणि वैद्यकीय खर्च - मुलांच्या शिक्षणासाठी समर्थन देते आणि कुटुंबातील सदस्यांसाठी वैद्यकीय खर्च कव्हर करते.
जगातील पहिली 'मिस AI'
World's First 'Miss AI'
जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) सौंदर्य स्पर्धा नुकतीच पार पडली.
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) सौंदर्य स्पर्धेतील विजेती केन्झा लायली ही कोणत्या देशाची आहे ?
1. भारत
2. मोरक्को
3. फ्रान्स
4. पोर्तुगीज
उत्तर : मोरक्को
• जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) सौंदर्य स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेत मोरक्कोची केन्झा लायली (Kenza Layli) जगातील पहिली मिस AI ठरली.
• मिस AI सौंदर्य स्पर्धते भारताची झारा श्रीवास्तव ही पहिल्या 10 स्पर्धकांमध्ये होती.
मिस AI सौंदर्य स्पर्धा काय आहे ?
• जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता सौंदर्य स्पर्धा The Fanvue World AI क्रिएटर अवॉर्ड्स (WAICAs) द्वारे लाँच करण्यात आली होती.
• ज्यामध्ये AI- तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या प्रतिमा आणि प्रभावशाली ( ( Image and Influencers) सहभाग नोंदवणार होते.
• स्पर्धेचे पारितोषिक हे अंदाजे रु. 16,70,666 होते.
• उद्दिष्ट : या पुरस्काराचे उद्दिष्ट जगभरातील डिजिटल प्रभावशाली व्यक्तिमत्त्वे (डिजिटल इनफ्लूएनसर) तयार आणि व्यवस्थापित करण्यामागील तांत्रिक कौशल्य (Technical Skills) आणि कार्याचे कौतुक करणे हे होते.
• स्पर्धेसाठी AI मॉडेल्सला अनेक प्रकारच्या चाचण्यांमधून जावे लागले.
• स्पर्धेसाठीच्या जज ने प्रत्येक मॉडेलचे मूल्यमापन वास्तव, तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रभाव या तीन महत्त्वाच्या पॅरामीटर्स वर केले.
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
Comptroller and Auditor General of India (CAG)
महाराष्ट्र विधिमंडळात सादर केलेल्या अहवालात, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाने प्राप्ती आणि खर्च यांच्यातील तफावतमुळे उद्भवलेल्या आर्थिक ताणासाठी राज्य सरकारवर टीका केली.
Subject : GS - राज्यशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताचे वर्तमान नियंत्रक महालेखा परीक्षक कोण आहेत ?
1. निर्मला सितारमन
2. गिरीशचंद्र मुर्मू
3. शक्तिकांता दास
4. राजीव कुमार
उत्तर : गिरीश चंद्र मुरमु
गिरीशचंद्र मुर्मू हे भारताचे वर्तमान नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) आहेत. त्यांनी 8 ऑगस्ट 2020 रोजी पदभार स्वीकारला. ते भारताचे 14 वे CAG आहेत.
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांबद्दल महत्त्वाची माहिती :
Comptroller and Auditor General of India (CAG)
• भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे राष्ट्रीय आणि राज्य सरकारांच्या खर्चाच्या बाह्य आणि अंतर्गत लेखापरीक्षणासाठी जबाबदार सर्वोच्च प्राधिकरण आहे.
• भारताच्या घटनेच्या भाग पाच मधील कलम 148 ते 151 हे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांसंदर्भात आहेत.
• नेमणूक : भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 अंतर्गत भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
• कार्यकाळ : CAG पद ग्रहण केल्यापासून 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी घडेल तिथपर्यंत)
• CAG ची कर्तव्य आणि अधिकार :
• भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या सर्व पावत्या आणि खर्चाचे लेखापरीक्षण करते.
• सरकारद्वारे मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था आणि प्राधिकरणांच्या खात्यांची लेखापरीक्षणही करते.
• कंपनी कायदा 2013 नुसार सरकारी कंपन्यांच्या खात्यांचे ऑडिट करते.
• कर्ज, ठेवी आणि पैसे ठेवण्याची संबंधित केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व व्यवहारांचे ऑडिट करते.
• जनतेचा पैसा म्हणजेच सार्वजनिक निधी कार्यक्षमतेने आणि इच्छित हेतूंसाठी वापरला जातो याची खात्री करते.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कलम 151 अन्वये महालेखा परीक्षक केंद्र सरकारच्या लेखांविषयी अहवाल कोणाला सादर करतात ?
1. राष्ट्रपती
2. पंतप्रधान
3. गृहमंत्री
4. वित्तमंत्री
उत्तर : राष्ट्रपती
कलम 151 (1) अन्वये महालेखा परीक्षक केंद्र सरकारच्या लेखांविषयी अहवाल (Audit Report) राष्ट्रपतींना सादर करतात.
राष्ट्रपती हे अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडण्याची व्यवस्था करतात.
प्रश्न) कलम 151 अन्वये महालेखा परीक्षक राज्यांच्या लेखांविषयीचे अहवाल कोणाला सादर करतात ?
- राज्यपाल
- मुख्यमंत्री
- गृहमंत्री
- वित्तमंत्री
उत्तर : राज्यपाल
कलम 151 (2) अन्वये महालेखा परीक्षक राज्यांच्या लेखांविषयीचे अहवाल (Audit Report) राज्यपालास सादर करतात.
राज्यपाल हे अहवाल राज्य विधान मंडळासमोर मांडण्याची व्यवस्था करतात.
प्रश्न) भारताचे पहिले नियंत्रक महालेखा परीक्षक कोण आहेत ?
उत्तर : व्ही. नरहरी राव (1950 ते 1954)