
चालू घडामोडी 12 जुलै 2024

अभिजात भाषा म्हणजे काय ?
Classical Language
अनेक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या होत असलेल्या वारंवार मागणीमुळे केंद्र सरकारने अभिजात भाषेतील दर्जाच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Subject : GS- इतिहास - कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालीलपैकी अभिजात भाषा दर्जा नसलेली भाषा कोणती ?
1. तमिळ
2. तेलगू
3. मराठी
4. ओडिया
उत्तर : मराठी
अभिजात भाषा म्हणजे काय ?
एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्राचीन सांस्कृतिक इतिहास असलेल्या भाषेला भारत सरकारकडून विशेष दर्जा दिला जातो भाषांना अभिजात भाषा म्हणून ओळखले जाते.
एखादी भाषा अभिजात कशी ठरते ? आणि ती कोण ठरवते ?
कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत.
एखाद्या भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्यासाठी सरकारने विकसित केलेले सध्याचे निकष पुढीलप्रमाणे आहेत :
• भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अती प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.
• प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.
• भाषेला स्वतःचे स्वयंभूपणा असावा, ती भाषा दुसर्या भाषासमूहाकडून उसनी घेतलेली नसावीत.
• अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
भारतातील अभिजात भाषा :
आजपर्यंत, भारतात 6 भाषांना 'अभिजात भाषेचा' दर्जा देण्यात आला आहे.
1. तमिळ : 2004 मध्ये तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. तमिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा आहे.
2. संस्कृत
3. तेलुगू
4. कन्नड
5. मल्याळम
6. ओडिया : 2014 मध्ये या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला.
प्रश्न) मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी गठन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर : प्रा. रंगनाथ पठारे
मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळण्यासाठी 2014 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक : गौतम गंभीर
New India head coach : Gautam Gambhir
भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Subject : GS- खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेल्या गौतम गंभीर बाबत खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा.
1. गौतम गंभीर यांना अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहे.
2. गौतम गंभीर हे दिल्लीचे आमदार राहिलेले आहे.
3. गौतम गंभीर हे आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळलेले आहे
4. वरीलपैकी सर्व बरोबर
उत्तर : गौतम गंभीर यांना अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहे. हे विधान बरोबर आहे.
• नुकतीच BCCI ने भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी गौतम गंभीर यांची नियुक्ती केली आहे.
• गौतम गंभीर यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असून त्यांनी राहुल द्रविड यांची जागा घेतली आहे.
• गौतम गंभीर यांचा भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ 31 डिसेंबर 2027 पर्यंत असेल.
परीक्षेच्या दृष्टीने गौतम गंभीर यांच्या बद्दल महत्वाची माहिती :
• जन्म : गौतम गंभीर यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1981 रोजी नवी दिल्ली येथे झाला.
• वन-डे पदार्पण : 2003 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातून एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय (वनडे) पदार्पण केले.
• टेस्ट क्रिकेट पदार्पण : 2004 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
• IPL टीम : दिल्ली डेअरडेव्हील्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून त्यांनी IPL मध्ये सामना खेळला आहे.
• राजकीय वाटचाल : 2019 ते 2024 या काळात गौतम गंभीर लोकसभेचे सदस्य (खासदार) होते.
पुरस्कार :
• 2008 मध्ये अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
• आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गंभीरला 2009 साठी वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू पुरस्कार दिला.
• 2019 मध्ये पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौतम गंभीर यांना सन्मानित करण्यात आले.
कोलंबो सुरक्षा परिषद
Colombo Security Conclave
Subject : GS- आंतरराष्ट्रीय संघटना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच कोणता देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा 5 वा सदस्य देश बनला ?
1. भारत
2. बांगलादेश
3. म्यानमार
4. सिंगापूर
उत्तर : बांगलादेश
मॉरिशसने आयोजित केलेल्या 8 व्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठकीदरम्यान कोलंबो सुरक्षा परिषदेचा 5 वा सदस्य देश म्हणून बांगलादेश चे स्वागत केले.
कोलंबो सुरक्षा परिषदेबद्दल थोडक्यात माहिती :
• स्थापना : कोलंबो सुरक्षा परिषदेची स्थापना 2011 मध्ये भारत, श्रीलंका आणि मालदीव या तीन देशांनी सागरी सुरक्षा गट म्हणून करण्यात आली होती.
• पुढे मॉरिशस हा चौथा देश या सुरक्षा परिषदेचा सदस्य बनला.
• सदस्य देश : नुकताच बांगलादेश हा सदस्य देश बनल्यामुळे आता कोलंबो सुरक्षा परिषदेत एकूण 5 सदस्य देश आहे - भारत, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस आणि बांगलादेश.
कोलंबो सुरक्षा संवाद हा हिंदी महासागरातील देशांचा सुरक्षा संदर्भासाठीचा गट आहे.
प्रादेशिक सुरक्षा वाढविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी एकमेकांना सहकार्याची प्रमुख क्षेत्रे ओळखली गेली ती पुढीलप्रमाणे :
1. सागरी सुरक्षा आणि संरक्षण
2. दहशतवाद आणि कट्टरतावादाचा सामना करणे.
3. तस्करी आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीचा सामना करणे.
4. सायबर सुरक्षा, गंभीर पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचे संरक्षण करणे.
5. मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कार्य करणे.
पिच ब्लॅक : 2024
Pitch Black : 2024
Subject : GS- आंतरराष्ट्रीय संघटना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये चर्चेत असणारा पीच ब्लॅक 2024 हा युद्धसराव कोणत्या देशात होणार आहे ?
1. भारत
2. श्रीलंका
3. अमेरिका
4. ऑस्ट्रेलिया
उत्तर : ऑस्ट्रेलिया
भारतीय वायुसेनेची (IAF) तुकडी 12 जुलै 2024 ते 02 ऑगस्ट 2024 या कालावधीत ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या पिच ब्लॅक या युद्ध सरावात सहभागी होत आहे.
पिच ब्लॅक युद्ध सरावाबद्दल महत्त्वाची माहिती :
• या युद्ध सरावात मोठ्या लोकवस्ती नसलेल्या भागात रात्रीच्या वेळी उड्डाण करण्यावर भर देण्यात आल्यामुळे या युद्ध सरावाला पिच ब्लॅक हे नाव पडले.
• हा युद्ध सराव ऑस्ट्रेलियाच्या रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स (RAAF) द्वारे आयोजित केलेला आहे.
• हा युद्धसराव द्विवार्षिक (म्हणजे दर 2 वर्षांनी होतो.) आणि बहु-राष्ट्रीय आहे.
• एक्स पिच ब्लॅकची 2024 ची ही आवृत्ती सरावाच्या 43 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी असेल, ज्यामध्ये 140 हून अधिक विमाने आणि विविध हवाई दलांचे 4400 लष्करी कर्मचारी यांच्यासह 20 देशांचा सहभाग आहे.
पिच ब्लॅक युद्ध सरावाचे महत्व काय आहे ?
• हा युद्ध सराव सहभागी देशांना मोठ्या अंतरावर लढाकू विमान तैनात करण्याची क्षमता मजबूत करण्यासाठी
• इंडो-पॅसिफिक प्रदेशात एकात्मिक ऑपरेशनला समर्थन देण्यासाठी
• अत्यंत आव्हानात्मक वातावरणात देशांमधील मजबूत विमान वाहतूक संघटना निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट संधी प्रदान करतो.