
चालू घडामोडी 01, जुलै 2024

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) म्हणजे काय ?
• बातम्यांमध्ये : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) वार्षिक शिखर परिषदेत भारताचे नेतृत्व भारताचे परराष्ट्र मंत्री श्री जयशंकर सर करतील.
• या वार्षिक शिखर परिषदेत प्रादेशिक सुरक्षा परिस्थिती, कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराला चालना देण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे.
Subject : GS- आंतरराष्ट्रीय संघटना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) 2024 ची शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली झाली ?
1. भारत
2. उझबेकिस्तान
3. चीन
4. कझाकस्तान
उत्तर : कझाकस्तान
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) 2024 ची शिखर परिषद कझाकस्तानच्या अस्ताना येथे होणार आहे.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) म्हणजे काय ?
• SCO ही एक राजकीय आर्थिक आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण संस्था आहे.
• स्थापना : 15 जून 2001 मध्ये शांघाय, चीन येथे SCO ची स्थापना झाली.
• मुख्यालय (Headquarters) : बिजिंग (चीन)
• संस्थापक देश: चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गीस्तान, ताजकिस्तान आणि उझबेकिस्तान हे SCO चे सं संस्थापक देश होते.
• 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तानचा समावेश करण्यात आला तर 2023 मध्ये इराणचा समावेश या संघटनेत करण्यात आला.
• उद्दिष्टे : सदस्य राष्ट्रांमध्ये सहकार्य आणि शांतता वाढवणे तसेच लोकशाही, न्याय आणि तर्कसंगत आंतरराष्ट्रीय राजकीय आणि आर्थिक व्यवस्था सुदृढ करणे हे या ऑर्गनायझेशनचे उद्दिष्टे आहेत.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) मध्ये सध्या सदस्य देश किती आहे ?
सध्या स्थितीत SCO मध्ये एकूण 9 सदस्य राष्ट्र आहेत.- (चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गीस्तान, ताजकिस्तान, उझबेकिस्तान, भारत, पाकिस्तान आणि इराण).
सिंधू पाणी करार काय आहे ?
बातम्यांमध्ये - 1960 च्या सिंधू पाणी करारावर चालू असलेल्या चर्चेचा भाग म्हणून पाकिस्तानी शिष्टमंडळ नुकतेच जम्मूमध्ये दाखल झाले.
Subject : GS- राज्यशास्त्र (Polity)
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे ? (MPSC गट ब 2020)
1. सिंधू, चिनाब व झेलम
2. सतलज, चिनाब व झेलम
3. रावी, बियास व सतलज
4. चिनाब, बियास व झेलम
उत्तर : रावी, बियास व सतलज

सिंधू पाणी करार काय आहे ?
• सिंधू पाणी करार हा सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या यांच्यातील पाण्याचा वापर आणि वितरण नियंत्रित करण्याचा भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला करार आहे.
• हा करार 1960 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान यांच्या स्वास्वाक्षरीने झाला.
• हा करार जागतिक बँकेच्या (World Bank) मध्यस्थीने झाला.
• या करारानुसार भारताच्या वाट्याला रावी, बियास आणि सतलज या पूर्वेकडील तीन नद्यांचे पाणी मिळाले आहे.
• तर पाकिस्तानच्या वाट्याला सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडील तीन नद्यांचे पाणी मिळाले आहे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान ------ यांनी स्वास्वाक्षरी केली.
1. पंडित जवाहरलाल नेहरू
2. लाल बहादूर शास्त्री
3. इंदिरा गांधी
4. अटलबिहारी वाजपेयी
उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू
महाराष्ट्र कृषी दिन
Maharashtra Agriculture Day
महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो.
तर 1 जुलै ते 7 जुलै हा आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो ?
1. यशवंतराव चव्हाण
2. विलासराव देशमुख
3. वसंतराव नाईक
4. शंकरराव चव्हाण
उत्तर : वसंतराव नाईक

1 जुलै हाच दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून का साजरी करतात ?
राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ 1 जुलै त्यांचा जन्म दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
वसंतराव फुलसिंग नाईक :
जन्म : 1 जुलै 1913
जन्मस्थळ : गहुली (यवतमाळ जिल्हा)
मुख्यमंत्री :
• वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते.
• 1963 ते 1975 या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
• यांना महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
• त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले.
• त्यांनी आपल्या कारकिर्दीत शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले. त्यांनी कृषी औद्योगिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.
• त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला
महत्त्वाचे नोट्स
• जागतिक हरित क्रांती चे जनक : नॉर्मन बोरलॉग
• भारतीय हरितक्रांतीचे जनक : एम. एस. स्वामीनाथन
• महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक : वसंतराव नाईक
कुमारमंगलम तोफखाना संग्रहालय
• अलीकडेच भारतीय लष्कराच्या नाशिक इथल्या तोफखाना केंद्रातील नूतनीकरण केलेल्या कुमार मंगलम तोफखाना संग्रहालयाचे भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
• देशातील माजी लष्कर प्रमुख जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावे साकारण्यात आलेला हा तोफखाना संग्रहालय हे देशातील अद्वितीय संग्रहालय आहे.
• या संग्रहालयाच्या माध्यमातून भावी पिढ्यांना प्रेरणा देणे आणि देशाच्या रक्षणासाठी केलेल्या बलिदानाविषयीचा आदर तळागाळापर्यंत रुजवणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे लेफ्टनंट जनरल अदोष कुमार यांनी उद्घाटनानंतर केलेल्या भाषणातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
• कुमार मंगलम तोफखाना संग्रहालयात जनतेसाठी खुले करण्यात आले आहे.
• भारतीय तोफखान्याच्या गौरवशाली इतिहासाची आणि शौर्याची माहिती पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे.

माजी लष्कर प्रमुख जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम
जन्म : 1 जुलै 1913
जन्मस्थळ : तमिळनाडू
1966 ते 1969 या काळात भारतीय लष्कराचे लष्कर प्रमुख होते.
युद्धे :
• दुसरे महायुद्ध
• 1947 चे भारत- पाकिस्तान युद्ध
• 1962 चीन- भारत युद्ध
• 1965 चे भारत- पाकिस्तान युद्ध इत्यादी
पुरस्कार :
• पद्मविभूषण (भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार)
• डिस्टिंग्वीश सर्विस ऑर्डर
• मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर
✍️एम. एस. स्वामीनाथन यांबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
हरित क्रांतीचे जनक : एम. एस. स्वामीनाथन
https://www.tcs9.in/mr/current-affairs/father-of-green-revolution-m-s-swaminathan
✍️महाराष्ट्र पोलीस भरती 2024 फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇👇
2024 : फ्री टेस्ट
https://www.tcs9.in/mr/test-series/maharashtra-police/free-test-no-1-47
✍️चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Jun 2024 Chalu Ghadamodi Test
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/jun-2024-chalu-ghadamodi-test-51
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C