
चालू घडामोडी 11, जुलै 2024

जागतिक लोकसंख्या दिन : 11 जुलै
World Population Day
दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
Subject : GS- अर्थशास्त्र, दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक लोकसंख्या दिनाबद्दल योग्य पर्याय निवडा.
1. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी साजरा केला जातो
2. जागतिक लोकसंख्या दिन 2024 ची संकल्पना "कोणालाही मागे सोडू नका; प्रत्येकाची गणना करा" ही आहे
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य
जागतिक लोकसंख्या दिना बद्दल महत्त्वाची माहिती :
• लोकसंख्या, लोकसंख्ये संदर्भातील समस्या आणि समाजावर होणाऱ्या त्याचा प्रभाव यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस जगभरात साजरा केला जातो.
• उद्देश्य : जगभरातील लोकसंख्येच्या प्रश्नाकडे लक्ष वेधने, कुटुंब नियोजन, लैंगिक समानता आणि प्रजनन आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करणे हे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचे उद्देश आहे.
जागतिक लोकसंख्या दिन 2024 ची थीम/ संकल्पना काय आहे ?
"कोणालाही मागे सोडू नका; प्रत्येकाची गणना करा"
"Leave no one behind; count everyone"
पहिला जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरी केला गेला ?
11 जुलै 1989 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने पहिला जागतिक लोकसंख्या दिन साजरी केला.
11 जुलैच का ?
11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्जांवर (5 billion) पोहचली. ही गोष्ट नजरेस आणून देऊन डॉ. के. सी. झकारिया यांनी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली.
लोकसंख्या :
• 2021 मध्ये जागतिक लोकसंख्या 7.9 बिलियन होती.
• 2030 पर्यंत जागतिक लोकसंख्या 8.5 बिलियन आणि 2050 पर्यंत 9.7 बिलियन पर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
• स्टेट ऑफ द वर्ल्ड पॅापुलेशन रिपोर्ट 2023 च्या अनुसार भारत चीनला मागे टाकून सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे.
• एका रिपोर्टनुसार 2024 पर्यंत भारताची लोकसंख्या 1.45 बिलियन वर्तवण्यात आली आहे.
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार : 2024
National Gopal Ratna Award
2024 च्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी नामांकन 15 जुलै पासून सुरू होतील.
Subject : GS- सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेला राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
1. कला आणि संस्कृती
2. दुग्ध व्यवसाय
3. बालकल्याण
4. यांपैकी नाही
उत्तर : दुग्ध व्यवसाय
पुरस्काराचा उद्देश :
• राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत 2021 पासून दूध उत्पादक शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था, दूध उत्पादक कंपनी शेतकरी उत्पादक संघटना आणि कृत्रिम वेतन तंत्रज्ञान यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार देण्यात येतो.
• 26 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय दूध दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मंत्रालय : हा पुरस्कार मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागातर्फे देण्यात येतो. ( Ministry of Fisheries, Animal Husbandry and Dairying)
यावर्षी देखील खालील श्रेणींसाठी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दिला जात आहे:
• सर्वोत्तम दूध उत्पादक शेतकरी जो देशी गायी/म्हशींच्या जातींचे संगोपन करतो.
• सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था / दूध उत्पादक कंपनी / शेतकरी उत्पादक संघटना
• सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AIT- Artificial Insemination Technician)
• या वर्षापासून, विभागाने ईशान्य क्षेत्रातील राज्यांसाठी विशेष पुरस्कार समाविष्ट केला आहे जेणेकरुन ईशान्य प्रदेशातील दुग्ध विकास उपक्रमांना प्रोत्साहन आणि चालना मिळेल.
पुरस्काराचे स्वरूप :
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2024 मध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि पहिल्या दोन श्रेणींमध्ये - सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादक शेतकरी आणि सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था / दूध उत्पादक कंपनी / शेतकरी उत्पादक संघटना यांचा समावेश असेल.
1. पहिला क्रमांक - 5 लाख रुपये
2. दुसरा क्रमांक - 3 लाख रुपये
3. तृतीय क्रमांक - 2 लाख रुपये
4. विशेष पुरस्कार : 2 लाख रुपये (ईशान्य क्षेत्रासाठी विशेष पुरस्कार)
• सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ श्रेणीच्या बाबतीत, राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2024 मध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र आणि केवळ स्मृतिचिन्ह असेल. कृत्रिम रेतन तंत्रज्ञ श्रेणीमध्ये कोणतेही रोख बक्षीस दिले जाणार नाही.
नामांकन आणि अर्ज
• नामांकनासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 15.07.2024 पासून सुरू होईल आणि नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 31.08.2024 असेल.
• 2024 वर्षात राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी नामांकन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल द्वारे ऑनलाइन https://awards.gov.in दाखल केले जातील.
काय आहे आनंद विवाह कायदा ?
Anand Marriage Act
अलीकडेच राष्ट्रीय अल्पसंख्या आयोगाने आनंद विवाह कायद्याच्या अंमलबजावणी आणि नोंदणी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेश प्रशासनासांसोबत बैठक घेतली.
Subject : GS- राज्यशास्त्र, कायदे
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच राष्ट्रीय अल्पसंख्या आयोगाने आनंद विवाह कायद्या संदर्भात मीटिंग घेतली तर हा आनंद विवाह कायदा खालीलपैकी कोणत्या समुदायाशी संबंधित आहे ?
1. हिंदू
2. पारसी
3. शीख
4. जैन
उत्तर : शीख
काय आहे आनंद विवाह कायदा ?
• आनंद विवाह कायदा भारतातील शीख समुदायाच्या विवाह विधींना वैधानिक मान्यता प्रदान करतो.
• शीख समाजाच्या चालीरीती आणि प्रथा यांचा आदर करणे आणि त्या स्वीकारणे हा या कायद्याचा उद्देश आहे.
• आनंद विवाह कायदा 1909 मध्ये भारतात ब्रिटीश वसाहतीच्या काळात लागू करण्यात आला होता .
• शीख विवाहांना कायदेशीर मान्यता आणि संरक्षण देण्यासाठी या कायद्याची स्थापना करण्यात आली होती.
• 2012 मध्ये संसदेने आनंदविवाह (दुरुस्ती) विधेयक मंजूर करून शीख पारंपारिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याच्या कक्षेत आणले.
• आनंद विवाह नोंदणीसाठी नियम तयार करण्याचे काम संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांवर सोपविण्यात आले आहे.
• आनंद विवाह कायद्याचे महत्त्व : विद्यमान हिंदू विवाह कायद्यांतर्गत शीख विवाहांच्या वैधतेबद्दल शीख समुदायाने उपस्थित केलेल्या चिंतेचे निराकरण करणे हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर हिंदू विवाह कायद्यांतर्गत त्यांचे विवाह समारंभ न करण्याची शीख समुदायाची दीर्घकालीन मागणी ही हा कायदा पूर्ण करतो.
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस
Subject : GS- दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 5 जून
2. 10 जुलै
3. 24 एप्रिल
4. 14 सप्टेंबर
उत्तर : 10 जुलै
मत्स्य व्यवसाय/ मत्स्य पालन करणारे शेतकरी तसेच इतर मत्स्यपालन भागधारकांच्या अमूल्य अशा योगदानाबद्दल दरवर्षी 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केला जातो.
10 जुलै च का ?
• 10 जुलै 1957 रोजी डॉ चौधरी आणि डॉ. अलिकुन्ही यांनी ओडिशा येथे प्रेरित मत्स्य प्रजननाच्या प्रयोगात यश मिळवले या शास्त्रज्ञांना मिळालेले हे यश भारतातील नीलक्रांतीची सुरुवात ठरली.
• सन 2001 मध्ये डॉ.हिरालाल चौधरी यांच्या कार्यास सन्मानित करण्यासाठी भारत सरकारद्वारे 10 जुलै हा दिवस “राष्ट्रीय मत्स्य-शेतकरी दिवस” म्हणून घोषित करण्यात आला.
• डॉ.हिरालाल चौधरी यांना भारतातील नीलक्रांतीचे जनक (फादर ऑफ ब्लु रेवोल्युशन) म्हटले जाते.
भारतासाठी मत्स्यपालनाचे महत्त्व:
• भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्यपालन देश आहे आणि चीननंतरचा तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे.
• मासेमारी क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यावश्यक आहे त्याचप्रमाणे परकीय चलनाच्या नफ्याचा एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे.
• मत्स्यपालन आणि मत्स्यपालन उत्पादन भारताच्या GDP मध्ये सुमारे 1% आणि कृषी GDP मध्ये 5% पेक्षा जास्त योगदान देते.
• रोजगाराच्या बाबतीत 2 कोटी 80 लाख पेक्षा जास्त लोकांना रोजगाराची संधी मत्स्य व्यवसायाने दिली आहे.
निळी क्रांती (नील क्रांती) /Blue Revolution :
• भारतीय निळ्या क्रांतीमुळे मत्स्यपालन उद्योगांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.
• भारताच्या केंद्र सरकारद्वारे प्रायोजित फिश फार्मर्स डेव्हलपमेंट एजन्सी (FFDA) ने 7 व्या पंचवार्षिक योजनेत (1985-1990) भारतातील नील क्रांतीचे नेतृत्व केले.
• आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक व्यवस्थापन पद्धती आणि पायाभूत सुविधांच्या सहाय्याने सागरी आणि अंतर्देशीय मत्स्यपालनाच्या विकासावर लक्ष केंद्रित करून भारताला जगातील आघाडीच्या मासे-उत्पादक देशांपैकी एक बनवणे हे नील क्रांती चे एक महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतातील नीलक्रांतीचे जनक (फादर ऑफ ब्लु रेवोल्युशन) कोणास म्हणतात ?
1. डॉ.हिरालाल चौधरी
2. डॉ. वर्गीस कुरियन
3. डॉ. एम. एस. स्वामिनाथन
4. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
उत्तर : डॉ.हिरालाल चौधरी
1. डॉ.हिरालाल चौधरी : भारतातील नीलक्रांतीचे जनक
2. डॉ. वर्गीस कुरियन : भारतातील धवलक्रांतीचे (श्वेतक्रांतीचे जनक : भारताचे मिल्कमॅन)
3. डॉ. एम. एस. स्वामिनाथन : भारतातील हरितक्रांतीचे जनक
4. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : मिसाईल मॅन ऑफ इंडिया