
चालू घडामोडी 27, जुलै 2024

INS त्रिपुट
स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS त्रिपुट हिचे नुकतेच जलावतरण करण्यात आले.
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) INS त्रिपुट या युद्धनौकेचे 23 जुलै 2024 रोजी जलावतरण करण्यात आले आहे तर या युद्धनौकेची बांधणी खालीलपैकी कोणत्या जहाज बांधणी कंपनीद्वारे करण्यात आली ?
1. माझगाव डॉकयार्ड लिमिटेड
2. गोवा शिपयार्ड लिमिटेड
3. कोचीन शिपयार्ड
4. यांपैकी नाही
उत्तर : गोवा शिपयार्ड लिमिटेड
• भारतीय नौदलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड(GSL) तयार करत असलेल्या दोन प्रगत युद्धनौकांपैकी या पहिल्या युध्दनौकेचे 23 जुलै 24 रोजी गोवा येथे जलावतरण करण्यात आले.
• त्रिपुट हे नाव : शक्तिशाली बाणावरून या जहाजाचे नाव त्रिपुट ठेवण्यात आले आहे.
• भारतीय नौदलाच्या अदम्य भावनेचे तसेच दूरवर आणि खोलवर मारा करण्याच्या क्षमतेचे प्रतिनिधित्व करणारा शक्तिशाली बानावरून या जहाजाचे नाव त्रिपुटी ठेवण्यात आले आहे.
• ऑक्टोंबर 2016 मध्ये भारत आणि रशियामध्ये प्रोजेक्ट 1135.6 श्रेणीतील 4 युद्ध नौका खरेदी करण्याबाबत करार झाला.
• या करारानुसार दोन युद्धनौका थेट आयात केल्या जातील आणि उर्वरित दोन युद्धनौका गोवा शिपयार्ड लिमिटेड तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे भारतात तयार केले जातील.
INS त्रिपुट चे वैशिष्ट्य :
• जहाज 124.8 मीटर लांब, 15.2 मीटर रुंद आहेत जहाजांची पाण्याखालील खोली 4.5 मीटर आहे. जहाजाचे वजन अंदाजे 3600 टन आहे.
• INS त्रिपुट ची गती कमाल 28 नॅाटीकल माईल्स आहे .
• ही जहाजे स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालींनी सुसज्ज आहेत.
• शत्रूच्या क्षेत्रातील जहाजे, पाणबुड्या आणि विमानांविरुद्ध लढाऊ कारवाईच्या दृष्टीने या जहाजांची रचना करण्यात आली आहे.
आत्मनिर्भर भारत :
• भारतीय शिपयार्डद्वारे प्रथमच स्वदेशात या युद्धनौका बनवल्या जात आहेत.
• शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्ससह बहुतांश उपकरणे आणि सुटे भाग स्वदेशी आहेत. यामुळे भारतीय उत्पादन कंपनीद्वारे मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादन केले जाईल त्याचबरोबर देशात रोजगार निर्मिती आणि क्षमता वृध्दी सुनिश्चित होईल.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेल्या प्रोजेक्ट 1135.6 श्रेणीतील INS त्रिपुट ही युद्धनौका भारत आणि ---- देशांमधील कराराशी संबंधित आहे.
1. फ्रान्स
2. अमेरिका
3. रशिया
4. जर्मनी
उत्तर : रशिया
इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन योजना , 2024
Electric Mobility Promotion Scheme (EMPS), 2024
अलीकडेच, केंद्र सरकारने म्हटले आहे की इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) 2024 देशातील इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादन परिसंस्थेच्या ग्रीन मोबिलिटी आणि विकासाला अधिक चालना देईल.
Subject : GS- सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) 2024 बद्दल बरोबर विधान निवडा.
1. या योजनेसाठी 500 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
2. योजनेसाठी वाहनांच्या संख्येवर मर्यादा आहे आणि योजनेचा कालावधीही मर्यादित आहे.
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक
उत्तर : दोन्ही बरोबर
इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन योजनेबद्दल थोडक्यात माहिती :
• उद्दिष्ट : व्यावसायिक हेतूंसाठी दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास चालना देणे आणि भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासासाठी आणि उत्पादनासाठी आवश्यक सहकार्य प्रदान करणे हे EMPS योजनेचे उद्दिष्ट आहे.
• मंत्रालय : अवजड उद्योग मंत्रालय (Ministry of Heavy Industry)
• नुकतेच भारताच्या वित्तमंत्र्यांनी या योजनेसाठी 500 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
• योजनेचा कालावधी : 01 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 असे 4 महिने असणार आहे.
• EMPS 2024 योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरण्याकरता इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन आणि नोंदणी योजनेच्या वैध म्हणजे 01 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 कालावधीत झालेली पाहिजे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
• योजनेसाठी दाखल केलेले अर्ज “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” यावतत्त्वावर निकालात काढले जातील.
• EMPS 2024 योजनेसाठी निधी मर्यादित असून वाहनांच्या संख्येवर मर्यादा आहे आणि योजनेचा कालावधीही मर्यादित आहे.
• योजनेसाठीचा किंवा त्यातील संबंधित भागांसाठीचा निधी 31 जुलै 2024 पूर्वी संपला तर योजना किंवा त्यातील ज्या भागाचा निधी संपला आहे तो भाग बंद करण्यात येईल.
कलारिप्पयट्टू युद्ध कला
Kalaripayattu martial arts
बातम्यांमध्ये : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने देशात ‘कलारिप्पयट्टू’ या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय कलारिप्पयट्टू फेडरेशनला प्रादेशिक क्रीडा महासंघ म्हणून मान्यता दिली आहे.
Subject : GS - कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कलारिप्पयट्टू हा मार्शल आर्ट प्रकार कोणत्या भारतीय राज्यात प्रचलित आहे ?
(SSC GD 2019)
1. महाराष्ट्र
2. आंध्र प्रदेश
3. केरळ
4. ओडिशा
उत्तर : केरळ
कलारीपयट्टू मार्शल आर्ट बद्दल महत्त्वाची माहिती :
• केरळ राज्यातील कलारीपयट्टू ही जगातील सर्वात प्राचीन मार्शल आर्ट्सपैकी एक मानली जाते आणि ती मार्शल आर्ट शैलींची जननी म्हणून प्रसिद्ध आहे.
• कलारीपायट्टू चा अर्थ : कलारीपायट्टू चा अर्थ युद्ध भूमीची कला असा होतो.
• कलारीपायट्टू हा मल्याळम शब्द दोन शब्दांपासून बनला आहे, "कलारी" म्हणजे प्रशिक्षणाचे ठिकाण किंवा रणांगण आणि "पयट्टू" म्हणजे लढणे किंवा प्रशिक्षण करणे.
• संस्थापक : असे म्हटले जाते की भगवान विष्णूचे 6वे अवतार परशुराम हे कलारीपयट्टूचे संस्थापक आहे.
• कलारीपयट्टूमधील हालचाली प्राण्यांच्या लढण्याच्या पद्धतीने प्रेरित आहेत.
• कलारीपयट्टूमध्ये पायांच्या हालचाली ला विशेष महत्त्व आहे.
• कलारीपयट्टू युद्ध कला स्त्रीयाही जोपासत आहेत.
कलारीपयट्टू शिकण्याचे टप्पे :
कलारी प्रशिक्षणाचे मूळ तत्त्व म्हणजे ते तेल मालिशने सुरू होते जे शरीर चपळ आणि लवचिक होईपर्यंत चालते.
कलारीपयट्टूचा सराव प्रामुख्याने 4 टप्प्यात विभागलेला आहे:
1. मैथरी - शरीर नियंत्रण व्यायाम
2. कोलथरी - लाकडी शस्त्रांचा सराव
3. अंकथरी- धातूच्या शस्त्रांचा सराव
4. वेरुमकाई - फक्त हाताने लढण्याचे तंत्र
नोट : परीक्षेमध्ये भारतातील मार्शल आर्ट आणि राज्यांच्या जोड्या विचारतात.
• मर्दानी खेळ : महाराष्ट्र
• मल्ल खांब : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश
• कलारीपयट्टू : केरळ
• वर्मा अती : तमिळनाडू
• सिलंबम : तमिळनाडू
• काथीसामू : आंध्र प्रदेश
• घटका : पंजाब
• पैखा आखाडा : ओडिशा
• थांग - टा (Thang-Ta) : मणिपूर
NPS वात्सल्य योजना
NPS Vatsalya Scheme
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 च्या बजेटमध्ये वात्सल्य योजनेची घोषणा केली.
Subject : GS- सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असणारी NPS वात्सल्य योजनेबद्दल खालील पैकी योग्य पर्याय निवडा.
1. या योजनेअंतर्गत पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करू शकतात.
2. राष्ट्रीय पेन्शन योजने अंतर्गत ही योजना राबविली जाणार आहे.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य
NPS वात्सल्य योजना :
• वात्सल्य योजना ही राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) अंतर्गत ही योजना राबविली जाणार आहे.
• या योजनेअंतर्गत पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करू शकतात.
• पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावे खाते उघडून त्यात नियमित पैशांची गुंतवणूक करू शकतात.
• हा निधी मुलं 18 वर्षांचे होईपर्यंत जमा होईल.
• मुलं प्रोढ ( 18 वर्षांचे) झाल्यावर जमा झालेली रक्कम आपोआप सर्वसाधारण NPS खात्यात हस्तांतरित केली जाईल.
• विशेष म्हणजे, अल्पवयीन मुलानं १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर ही योजना बिगर NPS योजनांमध्ये देखील रूपांतरीत केली जाऊ शकते.
• ही योजना सध्याच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेसारखीच चालते.
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) काय आहे ?
• ही एक स्वैच्छिक सेवानिवृत्ती लाभ योजना आहे जी भारत सरकारने सर्व सदस्यांसाठी निवृत्तीनंतरचे नियमित उत्पन्न सुलभ मिळण्यासाठी सुरू केली आहे.
• हे व्यक्तींना त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये नियमित पैशांची गुंतवणूक करून म्हातारपणाच्या काळात नियमित वेतन मिळण्याची सोय करते.
• NPS मधील गुंतवणूक कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी (Tax deduction) आणि कलम 80CCD(1B) अंतर्गत ₹50,000 पर्यंत अतिरिक्त कपातीसाठी (additional deduction) पात्र आहेत.