महापरिनिर्वाण दिन
महामानवास मानवंदना 🙏💐💐
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास - जीवन, इतिहास आणि कार्य
जन्म आणि शिक्षण :
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14,एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला.
• सातारा येथील स्थानिक सरकारी शाळेत शालेय शिक्षण घेतले.
• 1907 मध्ये मॅट्रिक पूर्ण केल्यानंतर, ते एल्फिन्स्टन महाविद्यालयातून B.A. केले.
• कोलंबिया विद्यापीठातून " प्राचीन भारतातील व्यापार " या विषयांवर त्यांनी सन 1915 मध्ये प्रबंध लिहिला आणि त्यांनी M.A ची पदवी प्राप्त केली.
• 1916 मध्ये त्यांनी ‘भारताचा राष्ट्रीय लाभांश - एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास’ हा प्रबंध लिहिला आणि Ph.D. पदवी मिळवली.
• डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून अर्थशास्त्रात D.Sc. ही पदवी मिळवली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोण कोणत्या संस्था / संघटना स्थापन केल्या ?
बहिष्कृत हितकारणी सभा :
स्थापना : 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली.
ब्रीदवाक्य : शिका संघटित व संघर्ष करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.
प्रमुख उद्दिष्ट्ये :
• समाजात जागृती निर्माण करणे
• मानवी हक्कांचे संरक्षण करणे,
• शिक्षण देणे
• आर्थिक स्थिती सुधारणे हे या संस्थेचे काही प्रमुख उद्दिष्ट्ये होते.
समता संघ :
स्थापना : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 4 सप्टेंबर 1927 रोजी समता संघाची स्थापना केली.
मुखपत्र : या संघाचे मुखपत्र समता हे होते.
स्वतंत्र मजूर पक्ष :
स्थापना : 15 ऑगस्ट 1936 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
मुखपत्र : या पक्षाचे मुखपत्र जनता होते.
अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन :
• दलितांचे राजकीय प्रतिनिधित्व करण्यावर आणि त्यांचे नागरी हक्क सुरक्षित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जुलै 1942 मध्ये नागपूर येथे अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन ची स्थापना केली.
महाड सत्याग्रह (महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह) :
• 20 मार्च 1927 रोजी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.
• सार्वजनिक ठिकाणं, पाणवठे आणि चवदार तळं अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी झालेल्या या सत्याग्रहात सवर्ण समाजातील नेते मंडळीही सहभागी झाली होती.
• 20 मार्च या दिवसाचे महत्त्व ओळखून हा दिवस आज 'समता दिन' (Equality Day) तसेच 'सामाजिक सबलीकरण दिन' म्हणूनही साजरा केला जातो.
काळाराम मंदिर सत्याग्रह :
• हिंदू मंदिरांमध्ये दलितांच्या प्रवेशासाठी नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
• 2 मार्च 1930 ला सुरू झालेला हा सत्याग्रह पुढील पाच वर्षे चालला.
गोलमेज परिषद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
• 1930 ते 1932 दरम्यान लंडन येथे ब्रिटिश राजवटीत भारताच्या घटनात्मक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी तीन गोलमेज परिषद आयोजित करण्यात आल्या होत्या.
• या तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.
• दलित समाजाचे प्रतिनिधित्व करत आंबेडकरांनी दलितांना त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र मतदार आणि अधिक राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी केली.
• तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये त्यांच्या सहभागाने दलित समस्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधोरेखित केल्या आणि भारतातील सामाजिक आणि राजकीय सुधारणांवरील भविष्यातील चर्चेसाठी पाया घातला.
पुणे करार काय होता ?
पुणे करारावर कोणी सही केली ?
• ब्रिटीश सरकारच्या जातीय निवाडा द्वारे (Communal Award) दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद होती.
• परंतु महात्मा गांधींनी हिंदू समाजात फूट पडेल या भीतीने याला विरोध केला आणि प्राणांतिक उपोषण सुरू केले.
• तीव्र वाटाघाटीनंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात करार झाला ज्याला पुणे करार म्हणून ओळखले जाते.
• या करारानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदार संघ देण्यात आला.
• 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष मदन मोहन मालवीय यांनी सही केली.
संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
• भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून गौरवले जाते.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री (First Law Minister of India) होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म केव्हा आणि कोठे स्विकारला ?
• 1935 मधील येवला येथील सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी " मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही." अशी घोषणा केली.
• दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे अनेक अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
महापरिनिर्वाण :
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले.
• त्यांच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो.
• मुंबईच्या दादर भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी समाधिस्थळ आहे.
पुरस्कार आणि सन्मान :
भारतरत्न पुरस्कार : 1990 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पंचतीर्थ विकास :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित पाच ठिकाणे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यात आली.
1. जन्मस्थान महू
2. लंडनमधील स्मारक (शिक्षा भूमी)
3. नागपुरात दीक्षाभूमी
4. दिल्लीतील महापरिनिर्वाण भूमी
5. मुंबईतील चैत्यभूमी
संविधान दिन साजरा :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाच्या स्मरणार्थ 2015 पासून, 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.