
चालू घडामोडी 09, डिसेंबर 2024 | NHAI कॉन्ट्रॅक्टदार रेटिंग यंत्रणा काय आहे ? | NHAI Contractor Rating Mechanism
![[ Contractor Rating Mechanism, government contract, rastyanche contract, Pavement Condition Index, NHAI one App, social media handles, rastyanvar khade, rastyanchi complaints, municipal corporation, toll naka, toll, fast tag, National Highways Authority of India, NHAI headquarters, Ministry of Road Transport and Highways, raste vahtuk, ani mahamarg mantralay, Nitin Gadkari, raste vahtuk mantri , national highway, government tendar, bandhkam tender, bandhkam mantralay, vahtuk, NHAI kay kaam karte, contractor la rating cha kay fayda hoiel, rating kuthe baghayala milel, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/NHAI-Contractor-Rating-Mechanism_1733893487551.webp)
कॉन्ट्रॅक्टदार रेटिंग यंत्रणा काय आहे ?
Contractor Rating Mechanism
Subject : GS - सरकारी योजना, अर्थशास्त्र, भूगोल - वाहतूक
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदार रेटिंग यंत्रणा सुरू केली. त्यासंदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) 70 पेक्षा कमी रेटिंग मिळवणारे कॉन्ट्रॅक्टदारांना काम मिळनार नाही.
ब) यामुळे रस्त्यांची गुणवत्ता सुधारेल आणि त्याचबरोबर खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात कमी होऊन सार्वजनिक सुरक्षा सुधारेल.
पर्याय :
1. फक्त अ बरोबर
2. फक्त ब बरोबर
3. अ आणि ब दोन्ही बरोबर
4. अ आणि ब दोन्ही चूक
उत्तर : अ आणि ब दोन्ही बरोबर
बातमी काय आहे ?
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने महामार्ग देखभालीची गुणवत्ता वाढविण्यासाठी कंत्राटदार रेटिंग यंत्रणा सुरू केली आहे.
कोणत्या कंत्राटदारांना काम देणार नाही ?
• मूल्यमापन केलेल्या ‘ कन्सेशनर रेटिंग व्हॅल्यू’ नुसार,कन्सेशनरना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले जाईल.
• 100 पैकी 70 पेक्षा कमी रेटिंग मिळवणारे कॉन्ट्रॅक्टदार 'नॉन-परफॉर्मर' म्हणून घोषित केले जातील.
• त्यामुळे मानांकनामध्ये सुधारणा होईपर्यंत अशे कॉन्ट्रॅक्टदार नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे काम मिळवण्यासाठी अपात्र ठरतील.
रेटिंग कशी दिली जाईल ?
• मूल्यमापन पद्धती ही पृष्ठभाग स्थिती निर्देशांक (पेव्हमेंट कंडिशन इंडेक्स) तसेच NHAI वन ॲपवरील दोष सुधारणेच्या अनुपालनावर आधारित असेल.
• PCI ला 80% गुण दिले जातील आणि NHAI वन ॲपचे पालन करण्यासाठी 20% गुण दिले जातील.
पृष्ठभाग स्थिती निर्देशांक म्हणजे काय ?
Pavement Condition Index (PCI)
खडबडीतपणा, खड्डे, भेगा , उखडलेले असणे, रट डेप्थ आणि पॅचवर्क या सहा कार्यात्मक मापदंडांच्या आधारे पृष्ठभाग स्थिती निर्देशांक (PCI) ठरवला जाईल.
NHAI वन ॲप काय आहे ?
• रस्त्या मध्ये काय दोष आहेत, ते दोष सुधारण्यासाठी कॉन्ट्रॅक्टदारांनी किती प्रयत्न केले, किती दोष सुधारले गेले, यावर 20% गुण दिले जातील
• NHAI वन ॲपवर 95 पेक्षा जास्त दोष डिजिटल पद्धतीने अधिसूचित केले जाऊ शकतात आणि त्याचे निरीक्षण केले जाऊ शकते.
रेटिंग कुठे बघायला मिळेल ?
• अंतर्गत दर 6 महिन्यांनी कन्सेशनरचे मूल्यांकन (Evaluate) केले जाईल.
• रेटिंग NHAI चे संकेतस्थळ (Website) आणि त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवर अपलोड केले जातील.
कॉन्ट्रॅक्टदार रेटिंग यंत्रणेमुळे काय फायदा होईल ?
• रस्त्यांची गुणवत्ता सुधारेल आणि त्याचबरोबर खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात कमी होऊन सार्वजनिक सुरक्षा सुधारेल.
• महामार्गाच्या देखभालीमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढेल.
• वस्तुनिष्ठ मूल्यांकनासाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देते.
• कंत्राटदारांना स्पर्धात्मक राहण्यासाठी चांगले काम करण्यासाठी आणि कामगिरी वाढवण्यासाठी प्रोत्साहित करते.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे काय ? ती काय काम करते ?
National Highways Authority of India (NHAI)
• NHAI ही भारतातील प्रमुख महामार्ग पायाभूत सुविधा निर्माण करणारी संस्था आहे.
• NHAI ची स्थापना संसदेच्या अधिनियमाद्वारे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कायदा, 1988 द्वारे करण्यात आली.
• राष्ट्रीय महामार्ग विकसित करणे, त्यांची देखरेख करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी NHAI वर सोपविण्यात आली आहे.
• मंत्रालय : NHAI ही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया (Ministry of Road Transport and Highways) अंतर्गत काम करते.
सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री कोण आहेत ?
(RRB Group D 2018)
श्री नितीन गडकरी