
चालू घडामोडी 05, डिसेंबर 2024 | जागतिक मृदा दिवस | World Soil Day 2024
![[ World Soil Day, jagtik mruda din, jagtik mruda divas kevha asto, King Bhumibol Adulyadej, King of Thailand, pahila jagtik mruda din, United Nations general assembly, jagtik mruda dinachi sankalpana, jagtik mruda dinachi theme, jagtik mruda din ka sajri kartat, soil erosion, desertification, matichi chup, audyogikikaran, havaman Badal, jangal Tod, vrukshlagvad, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/JAGTIK-MRUDA-DIN-WORLD-SOIL-DAY_1733584911215.webp)
जागतिक मृदा दिवस 2024
World Soil Day 2024
Subject : GS - दिनविशेष, भूगोल- कृषी, पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक मृदा दिना विषयी खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा
अ) दरवर्षी 2 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो.
ब)" जमिनीची काळजी घेणे: मापन, निरीक्षण, व्यवस्थापन " ही जागतिक मृदा दिन 2024 ची संकल्पना आहे.
क) थायलंडचे राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचा जन्मदिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करतात.
पर्याय :
1. अ आणि ब बरोबर
2. अ आणि क बरोबर
3. ब आणि क बरोबर
4. अ, ब आणि क बरोबर
उत्तर : ब आणि क बरोबर
दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो.
जागतिक मृदा दिना बद्दल परिक्षेच्या दृष्टीने IMP वनलाईनर पॉईंट्स :
जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर लाच का साजरी करतात ?
• थायलंडचे दिवंगत राजा भूमिबोल अदुल्यादेज हे मृदा संवर्धन उपक्रमात प्रमुख समर्थक होते.
• 5 डिसेंबर हा थायलंडचे राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचा जन्मदिवस, मृदा संवर्धनात त्यांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ 5 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस जगभरात जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करतात.
पहिला जागतिक मृदा दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• मातीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने 2013 मध्ये अधिकृतपणे जागतिक मृदा दिनाला मान्यता दिली.
• 5 डिसेंबर 2014 रोजी पहिला जागतिक मृदा दिन साजरी करण्यात आला.
जागतिक मृदा दिन 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
" जमिनीची काळजी घेणे: मापन, निरीक्षण, व्यवस्थापन " ही जागतिक मृदा दिन 2024 ची थीम आहे.
Caring for Soils: Measure, Monitor, Manage
• यंदाची थीम मातीच्या आरोग्याचे मूल्यांकन आणि प्रभावी निर्णय घेण्यासाठी अचूक माती डेटा आणि माहितीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर देते.
• मातीचे मोजमाप, निरीक्षण आणि व्यवस्थापनाला प्राधान्य देऊन, या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि पर्यावरणीय आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक शाश्वत पद्धती लागू करू शकतो.
जागतिक मृदा दिन का साजरी करतात ?
• माती ही एक महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहे जी शेती, जैवविविधता आणि जल शुध्दीकरणाला आधार देते.
• माती जीवनासाठी महत्त्वाची आहे कारण ती वनस्पतींच्या वाढीस मदत करते. आणि, हे अनेक कीटक आणि प्राण्यांचे राहण्याचे ठिकाण आहे.
• अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध या चार अत्यावश्यक ‘जगण्याच्या’ घटकांचा माती हा स्रोत आहे.
• आपल्या पृथ्वीचे अस्तित्व मातीशी असलेल्या मौल्यवान दुव्यावर अवलंबून आहे.
• आपल्याला 95 टक्के अन्न मातीतून मिळते.
• याशिवाय, माती झाडांना आवश्यक असलेल्या 18 पैकी 15 नैसर्गिकरीत्या रासायनिक घटकांचा पुरवठा करते.
• परंतु हवामान बदल आणि जंगलतोड, औद्योगिकीकरण यांसारख्या मानवी हस्तक्षेपामुळे मातीचा ऱ्हास होतो, नैसर्गिक समतोल बिघडतो तसेच अन्नातील जीवनसत्त्वे आणि पोषक घटकांची पातळी कमी होते.
• या सर्व गोष्टीं बद्दल लोकांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी आणि जगभरातील लोकांना मातीचे महत्त्व आणि संवर्धन करण्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक मृदा दिन साजरा करतात.