जागतिक एड्स दिन : 2024
World AIDS Day : 2024
Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक एड्स दिन केव्हा साजरी केला जातो ? (SSC GD 2021)
1. 1 डिसेंबर
2. 14 नोव्हेंबर
3. 12 नोव्हेंबर
4. 24 ऑक्टोबर
उत्तर : 1 डिसेंबर
• 1 डिसेंबर : जागतिक एड्स दिन
• 14 नोव्हेंबर : जागतिक मधुमेह दिन
• 12 नोव्हेंबर : जागतिक न्यूमोनिया दिन
• 24 ऑक्टोबर : जागतिक पोलिओ दिवस
HIV आणि AIDS आजारा संदर्भात परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• एड्स आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबरला 'जागतिक एड्स दिन' साजरा केला जातो.
• जागतिक एड्स दिन पहिल्यांदा 1988 रोजी साजरी करण्यात आला.
जागतिक एड्स दिन का साजरी करतात ?
• जागतिक एड्स दिन हा एक क्षण आहे जो आपल्याला आठवण करून देतो की आपण सर्वजण एड्सविरुद्धच्या लढाईत एकत्र आहोत.
• जगभरातील HIV ग्रस्त लोकांसाठी समर्थन दर्शविण्यासाठी आणि एड्स-संबंधित आजारांमुळे मरण पावलेल्या लोकांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी जागतिक एड्स निर्मुलन दिन साजरी करतात.
जागतिक एड्स दिन 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
"योग्य मार्ग घ्या: माझे आरोग्य, माझा हक्क!" ही जागतिक एड्स दिन 2024 ची संकल्पना आहे
“Take the rights path: My Health, My Right!”
HIV (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) म्हणजे काय ?
HIV - Human Immunodeficiency Virus
• HIV हा एक विषाणू आहे जो रोगप्रतिकारक प्रणालीवर हल्ला करतो.
• पांढऱ्या रक्त पेशी ह्या रक्तातील संरक्षक पेशी असतात. या रोगप्रतिकारक शक्तीचे काम करतात.
• शरीरात प्रवेश केल्यावर HIV विषाणू पांढऱ्या रक्त पेशी (मुख्यतः CD4 पेशी) नष्ट करतो.
• HIV विषाणू मानवी रोगप्रतिकारक शक्तीला गंभीरपणे नुकसान करतात.
एड्स काय असतो ?
• AIDS - Acquired Immuno Deficiency Syndrome
• एड्स हा HIV संसर्गाचा शेवटचा टप्पा आहे जो विषाणूमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी झाल्यामुळे होतो.
HIV चा प्रसार कसा होतो ?
• HIV प्रामुख्याने रक्त, वीर्य, योनि स्राव आणि आईच्या दुधासह काही शारीरिक द्रव्यांच्या देवाणघेवाणीद्वारे प्रसारित केला जातो.
• संक्रमणाचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे लैंगिक संपर्काद्वारे, विशेषतः HIV संक्रमित भागीदारासह असुरक्षित लैंगिक संबंध.
• HIV असणाऱ्या व्यक्तीसोबत सुया किंवा सिरिंज शेअर करणे.
• HIV असणाऱ्या व्यक्तीकडून रक्त संक्रमण किंवा अवयव प्रत्यारोपण करणे.
• स्तनपान करताना HIV असणाऱ्या आईकडून बाळामध्ये संक्रमण हे देखील संक्रमणाचे संभाव्य मार्ग आहेत.
टॅटू काढल्यामुळे किंवा बॉडी पिअर्सिंगमुळं HIV ची लागण होऊ शकते का ?
• HIV संक्रमित रक्ताच्या संपर्कात आलेली उपकरणं योग्य पद्धतीनं निर्जंतुक केली नाहीत किंवा तशीच इतर ग्राहकांसाठी वापरली तर HIV चा प्रसाराचा धोका असतो.
• त्यामुळे इंजेक्शनद्वारे, किंवा टॅटू काढल्यामुळे HIV ची लागण होऊ शकते.
HIV ची लक्षणे काय आहेत ?
ताप येणे, थंडी वाजते, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, वजन कमी होणे, स्नायू दुखणे, रात्रीचा घाम येणे, पुरळ उठणे आणि लसिका ग्रंथी सुजणे यासारखी इतर सामान्य लक्षणे देखील असू शकतात.
HIV/ AIDS वर उपचार काय आहे ?
• HIV किंवा AIDS वर कोणताही इलाज नसला तरी HIV AIDS साठी उपचार उपलब्ध आहेत जे व्हायरसचे व्यवस्थापन करण्यात आणि एड्सची वाढ रोखण्यात मदत करू शकतात.
• अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (Antiretroviral therapy, or ART) HIV साठी मानक उपचार आहे.
• ART मध्ये व्हायरस दडपणाऱ्या औषधांचा समावेश असतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पुनर्प्राप्त होते आणि एड्सची वाढ रोखते.
• ART अत्यंत प्रभावी असल्याचे दर्शविले गेले आहे, ज्यामुळे HIV असलेल्या लोकांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगता येते.
HIV/AIDS संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
प्रश्न) एकमेकांबरोबर कप, भांडी शेअर केल्याने किंवा हात मिळवल्याने एचआयव्ही किंवा एड्स होऊ शकतो का ?
उत्तर : नाही
प्रश्न) मच्छर आणि किटकांच्या चावण्यामुळे HIV पसरू शकतो का ?
उत्तर : नाही.
किटक HIV चा प्रसार करू शकत नाहीत. हे विषाणू किटकांच्या शरिरात जगू शकत नसल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
खालीलपैकी कोणता रोग टॅटूद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ शकतो ?
(MPSC 2013)
A. एचआयव्ही-एड्स
B. चिकनगुनिया
C. हिपॅटायटीस बी
पर्याय :
1. A आणि B बरोबर
2. A आणि C बरोबर
3. B आणि C बरोबर
4. A, B आणि C बरोबर
उत्तर : A आणि C बरोबर
एचआयव्ही-एड्स आणि हिपॅटायटीस बी (HIV-AIDS & Hepatitis B) हे टॅटू काढल्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ शकतो.