
चालू घडामोडी 23, नोव्हेंबर 2024 | नॅनो युरिया म्हणजे काय ? | What is Nano Urea ?
![[ What is Nano Urea, Liquid Nano Urea, drav Nano Urea, urea, nitrogen, farmer, shetkari, khat subsidy, furtilizer subsidy, Aushadhe khat dukane, urea subsidy, IFFCO, Indian Farmers Fertiliser Cooperative Limited, farming, new farming techniques, sheti tantradnyan, Adhunik sheti, nano urea mhanje kay, drav nano urea nemka kasa kaam karto, shetkaryana fayda, peek utpadanaat vaadh, paryavaran sanrakshan, IFFCO kay ahe, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/NANO-UREA-MHANJE-KAY_1733320617337.webp)
नॅनो युरिया म्हणजे काय ?
What is Nano Urea ?
Subject : GS - भूगोल, कृषी
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) द्रव नॅनो युरिया बद्दल खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.
A) इफकोने (IFFCO) गुजरातमध्ये देशातील पहिला नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प उभारला आहे.
B) द्रव नॅनो युरिया शेतकऱ्यांचा खर्च कमी करतो आणि उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करतो.
C) द्रव नॅनो युरियाच्या वापरामुळे पर्यावरण संरक्षण करता येईल.
पर्याय :
1. फक्त A आणि B बरोबर
2. फक्त B आणि C बरोबर
3. फक्त A आणि C बरोबर
4. A, B आणि C बरोबर
उत्तर : A, B आणि C बरोबर
बातमी काय आहे ?
सरकारी मालकीच्या नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) ने अलीकडेच नॅनो लिक्विड युरिया उत्पादनात प्रवेश जाहीर केला.
नॅनो युरिया म्हणजे काय ?
• नॅनो युरिया हे प्रामुख्याने नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आलेले एक द्रव खत आहे, जे वनस्पतीची नायट्रोजन ची गरज पूर्ण करते.
• नॅनो युरिया हे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) द्वारे विकसित केले असून त्यांनी याचा पेटंट घेतलेला आहे.
• IFFCO चे नॅनो युरिया हे एकमेव नॅनो खत आहे जे भारत सरकारने मंजूर केले आहे.
• इफकोने (IFFCO) गुजरातमधील कलोल येथे देशातील पहिला नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प उभारला आहे.
द्रव नॅनो युरिया नेमकं कसं काम करतो ?
• नॅनो युरियाची पानावर फवारणी केल्यानंतर तो सहजपणे पेशींच्या भिंतीतून किंवा पानांच्या रंध्र छिद्रातून वनस्पतींच्या पेशीमध्ये प्रवेश करतो.
• वनस्पतीमध्ये प्रवेश केल्यानंतर ते वनस्पतीच्या वाहक प्रथिनांना बांधले जाऊ शकतात.
• वनस्पतीच्या इतर भागांमध्ये वाहून नेले जातात.
• पिकाच्या गरजेनुसार वनस्पतीमध्ये नॅनो युरिया वितरीत केला जातो.
द्रव नॅनो युरियाचे फायदे काय ?
• पारंपरिक पद्धतीत 70 टक्के युरिया पिकांपर्यंत न पोहोचता हवेत उडून जातो किंवा अतिपाण्यामुळे जमिनीत मुरून बसतो.
• यामुळे जमीन अॅसिडिक बनते तसेच जलस्रोत प्रदूषित होतात.
• परंतु पारंपरिक खता ऐवजी द्रव नॅनो युरियाची फवारणी केल्याचे अनेक फायदे आहेत.
शेतकऱ्यांना फायदा :
• द्रवरूपातील अल्ट्रा स्मॉल पार्टिकल्स पानांच्या माध्यमातून जमिनीत शोषले जातात. युरिया वाया जात नाही,
• नॅनो युरियाची अर्धा लिटरची बाटली पारंपरिक युरियाच्या एका पोत्याएवढे पोषक तत्त्वे देते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळते.
• तसेच पारंपरिक खतांच्या पिशव्या पावसाने भिजल्या तर खराब होण्याची शक्यता असते.
• नॅनो युरियाची साठवणूक आणि वाहतूक करणे सोपे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा आणि साठवणुकीचा खर्च वाचतो.
पीक उत्पादनात वाढ :
• नॅनो युरियामुळे वनस्पतींना योग्य पोषण मिळते आणि कमी कष्टात पिकांचे चांगले उत्पादन घेता येते.
• रिसर्च नुसार नॅनो युरियाच्या वापराने पिक उत्पन्नात सरासरी 8% वाढ दिसून आली आहे.
पर्यावरण संरक्षण :
• नॅनो युरिया पर्यावरणास अनुकूल उत्पादन प्रक्रियेद्वारे तयार केले जाते त्यामुळे पर्यावरणाचा संतुलन राहण्यास मदत होते.
• द्रव नॅनो युरियाच्या वापराने मातीचे आरोग्य राखणे, जलप्रदूषण कमी करण्यासाठी मदत होईल.
IFFCO काय आहे ?
• IFFCO- Indian Farmers Fertiliser Cooperative Limited
• IFFCO ही भारतातील सर्वात मोठी बहु-राज्य सहकारी संस्था आहे.
• जी संपूर्णपणे भारतीय सहकारी संस्थांच्या मालकीची आहे.
• त्याची स्थापना 1967 मध्ये झाली आणि आता ती देशातील सर्वात मोठी सहकारी आणि सर्वात मोठी खत उत्पादक कंपनी बनली आहे.
• IFFCO चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.