
चालू घडामोडी 22, नोव्हेंबर 2024 | एक्झिट पोल म्हणजे काय ? | What is an Exit Poll ?
![[ What is an Exit Poll ?, Exit poll mhanje Kay, opinion poll mhanje Kay, nivadnuk results, maharashtra vidhansabha nivadnuk, amdar, MPSC bhartachi rajyaghatna notes marathi madhe, election commission of India, vidhansabha nivadnuk it kon jinkl, maharashtra legislative assembly election, maharashtracha Navin mukhamantri kon, maharashtras new cm, who win maharashtra election, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Exit-Poll-Mhanje-kay_1732891177806.webp)
एक्झिट पोल म्हणजे काय ?
What is an Exit Poll ?
बातमी काय आहे ?
• महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे मतदान संपले आहे आणि एक्झिट पोल, ओपनिंग पोल असे शब्द आपण वाचत आहोत किंवा आपल्या कानावर पडत आहेत.
• तर आजच्या लेखात आपण एक्झिट पोल म्हणजे काय ? ते कसे काढले जाते ? त्याचा निष्कर्ष काय असतो ? एक्झिट पोल किती अंशी बरोबर असतात ? एक्झिट पोल आणि ओपनिंग पोल मध्ये नेमका काय फरक असतो ? अशा प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या चालू घडामोडी टॅापीक मध्ये बघणार आहोत.
Subject : GS - राज्यशास्त्र , निवडणूक
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) एक्झिट पोल संदर्भात खालीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
A. एक्झिट पोल निवडणुकी दरम्यान जाहीर करतात.
B. एक्झिट पोल नेहमी बरोबर असतात.
C. लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 126 A द्वारे एक्झिट पोल नियंत्रित केले जातात.
पर्याय :
1. फक्त A बरोबर
2. A आणि B बरोबर
3. B आणि C बरोबर
4. फक्त C बरोबर
उत्तर : फक्त C बरोबर
एक्झिट पोल म्हणजे काय ?
What is an Exit Poll ?
सर्व टप्प्यांतील मतदान झाल्यानंतर मतदारांची मुलाखत घेऊन निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवणे म्हणजे एक्झिट पोल होय.
एक्झिट पोल नेमका कसा करतात ?
• निवडणूक झाल्यानंतर वेगवेगळे न्यूज चॅनेल, वेगवेगळ्या एजन्सी मतदारांना प्रश्न विचारतात जसे की,
• मतदारांनी कोणाला मतदान केले ?
• मतदारांचे वय काय ?
• मतदारांचा राहण्याचे ठिकाण कोणते ? इत्यादी
• हा सर्व जमा केलेला सॅम्पल डेटाचे तज्ञ व्यक्तींकडून विश्लेषण केले जाते.
• मतदारांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे आणि तज्ञांनी केलेल्या विश्लेषणाच्या आधारे निवडणूक निकाल काय असेल याचा अंदाज व्यक्त केला जातो.
एक्झिट पोल किती बरोबर असतात ?
• एक्झिट पोल हा सॅम्पल सर्व्हे असतो, हा डेटा सर्व मतदारांचा नसून त्यासाठी अगदी थोड्याच लोकांनी (मतदारांनी) दिलेली माहिती असते.
• वेगवेगळ्या न्यूज चॅनेलचा एक्झिट पोल वेगवेगळा असू शकतो.
• जमा केलेल्या डेटा आणि विश्लेषण किती प्रमाणात बरोबर किंवा चूक आहेत त्यावर एक्झिट पोल अवलंबून असतो.
• त्यामुळे एक्झिट पोल नेहमी बरोबरच असतातच असे नाही यापूर्वी एक्झिट पोल चुकीचे देखील ठरले आहेत.
एक्झिट पोल कधी जाहीर करू शकतात ?
मतदान झाल्याच्या 30 मिनिटानंतर एक्झिट पोल जाहीर करता येतो.
एक्झिट पोल कोण जाहीर करतात ?
वृत्तपत्रे (न्युज पेपर) आणि न्यूज चैनल एक्झिट पोल जाहीर करतात.
निवडणूक आयोगाची एक्झिट पोल संदर्भात बंदी !!
• लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 126 A द्वारे एक्झिट पोल नियंत्रित केले जातात.
(Representation of the People Act 1951, section 126A)
• भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या दरम्यान मतदारांवर कोणताही प्रभाव पडू नये यासाठी एक्झिट पोल मतदानादरम्यान जाहीर करण्यात बंदी घातली आहे.
• कलम 324 अंतर्गत, भारतीय निवडणूक आयोग, मीडिया एजन्सींना एक्झिट पोलचे निकाल प्रकाशित किंवा प्रसिद्ध करण्यास प्रतिबंधित करते.
ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल मधील फरक काय ?
• ओपिनियन पोल हे मतदारांच्या कलाचा अंदाज घेण्यासाठी निवडणूक होण्यापूर्वी केलेला सर्वे असतो.
• तर एक्झिट पोल मतदारांनी मतदान केल्यानंतर लगेचच एक्झिट पोल काढले जातात.