
चालू घडामोडी 20, नोव्हेंबर 2024 | कृत्रिम पाऊस म्हणजे काय ? | What is Artificial Rain ?
![[ What is cloud seeding?, What is artificial rain?, Krutrim paus mhanje Kay, krutrim paus kasa padtat, cloud seeding Mhanje Kay, cloud seeding Kashi kartat, Disadvantages of Cloud Seeding, environment notes paryavaran notes Marathi madhe, vinyan ani tantradnyan notes marathi madhe, chemicals, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Krutrim-Paus_1732688427918.webp)
कृत्रिम पाऊस म्हणजे काय ?
What is Artificial Rain ?
बातमी काय आहे ?
• देशाची राजधानी दिल्लीत प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.
• नुकतंच वायू प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पावसाचा पर्याय सुचविण्यात आला आहे.
• यासाठी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी (१९ नोव्हेंबर) केंद्राला पत्र लिहून प्रदेशात कृत्रिम पाऊस पाडण्याची परवानगी मागितली.
Subject : GS - पर्यावरण- प्रदूषण आणि उपाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कृत्रिम पावसासाठी क्लाउड सीडिंग प्रक्रियेत खालील पैकी कोणत्या रसायनाचा वापर केला जातो ?
1. सिल्वर फ्लोराइड
2. सिल्वर ब्रोमाइड
3. सिल्वर आयोडाइड
4. यांपैकी नाही
उत्तर : सिल्वर आयोडाइड (AgI)
कृत्रिम पाऊस म्हणजे काय ?
• कृत्रिम पाऊस याला क्लाउड सीडिंग असेही म्हणतात.
• क्लाउड सीडिंग हे एक अत्याधुनिक तंत्र आहे.
• यामध्ये ढगात बीजारोपण करून पाऊस पाडला जातो.
क्लाउड सीडिंग (Cloud Seeding) कशी केली जाते ?
• क्लाउड सिडिंग करण्यासाठी एक खास वैज्ञानिक पद्धत वापरली जाते.
• क्लाउड सिडिंगसाठी सिल्व्हर आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड किंवा ड्राय बर्फ सारख्या रसायनांचा वापर करतात.
• विमान किंवा हेलिकॉप्टर यांच्याद्वारे ठरवलेल्या उंचीवर आणि ढगांवर या रसायनांच्या कणांचा फवारा केला जातो.
• फवारलेले हे कण ढगात पसरतात.
• हे कण केंद्रक म्हणून काम करतात आणि या ढगातील बाष्प शोषून घेतल्यामुळे या कणांच्या भोवती पाण्याचे थेंब एकत्र होतात.
• जसजसे पाण्याचा थेंब वाढतो तसतसे त्या थेंबाचे वजनही वाढत जाते.
• पाण्याच्या थेंबाचे वजन वाढले की गुरुत्वाकर्षणामुळे पाऊस पडायला सुरुवात होते.
![[ cloud seeding kashi keli jaati, dhaganchi tapasni keli jaati, silver iodide, potassium iodide, dry ice, dry barf , rasyanancha vapar kartat, viman helicopter chya madatine dhagat rasayan favarle jaatat, rasayan kan kendrak mhanun kaam kartat, bashpa soshane, themb ektra karne, thembache vajan vadne, thembachya vajna mule paus padayala survaat hote ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Krutrim-Paus-kasa-hoto_1732686596121.webp)
कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडता येतो तर मंग दुष्काळ कसा ?
• क्लाउड सीडिंग साठी एक विशिष्ट प्रकारचे हवामान आवश्यक असते.
• क्लाउड सीडिंग तेव्हाच होऊ शकते जेव्हा या ढगांची पुरेशी संख्या आणि विशिष्ट खोली असेल.
• तसेच आत ढगांच्या थेंबांची पुरेशी संख्या असणे आवश्यक आहे.
• ढगांच्या थेंबांची त्रिज्या वाढवण्यासाठी क्लाउड सीडिंग केले जाते, जेणेकरून ते मोठे होतील आणि गुरुत्वाकर्षणामुळे ते पर्जन्यमान म्हणून खाली येतील.
• पण, स्वच्छ आकाशात क्लाउड सीडिंग करू शकत नाही.
कृत्रिम पाऊसाचे फायदे आणि मर्यादा काय आहेत ?
• कृत्रिम पाऊसामुळे धूळ आणि इतर प्रदूषके (जसे की PM2.5 आणि PM10) पाऊसा बरोबर धुवून जातात.
• परंतु, क्लाउड सीडिंग वायू प्रदूषणापासून केवळ तात्पुरती मुक्तता देऊ शकतात.
• दुष्काळाच्या ठिकाणी पाऊस पाडला जाऊ शकतो परंतु त्यासाठीही हवामानाची परिस्थिती अनुकूल असावी लागते.
क्लाउड सीडिंगचे दुष्परिणाम काय आहे ?
Disadvantages of Cloud Seeding
• क्लाउड सीडिंगवर अनेक वर्षांचे संशोधन असूनही त्याच्या प्रभावाचे पुरावे स्पष्ट नाहीत.
• यात मानवी हस्तक्षेप वाढल्यास हवामानाचे स्वरूप बदलू शकते.
• क्लाउड सीडिंग साठी रसायनांचा वापर केला जातो.
• या रसायनांचा पर्यावरणावर काय परिणाम होतो हे शास्त्रज्ञांना अद्याप पूर्णपणे समजलेले नाही.
उदाहरणार्थ :
• या प्रक्रियेत वापरलेली रसायने, जसे की सिल्व्हर आयोडाइड माती आणि पाण्यात मोठ्या प्रमाणात साचले तर ते शेतीवर आणि परिसंस्थेवर विपरित परिणाम करू शकतात.
• त्याचबरोबर या रसायनांचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो त्यावर संशोधन चालू आहे.