
चालू घडामोडी 19, नोव्हेंबर 2024 | ISRO चा उपग्रह SpaceX ने लॉन्च का केला ?
![[ GSAT-N2 SATELLITE, GSAT 20, ISRO Satellite, upagra, SpaceX, Falcon-9 rocket, communication satellite, internet connection, dalanvalan, geostationary orbit, upagrah, dursanchar upagrah, Elon Musk, which company Elon Musk owned, World richest person, jagatil sarvat shrimant vyakti, Tesla car, Twitter, vinyan ani tantradnyan notes marathi madhe, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/ISRO-Satellite-SpaceX-Falcon-ne-launch-kele_1732527989842.webp)
इस्रोचा उपग्रह SpaceX ने लॉन्च का केला ?
GSAT-N2 SATELLITE (GSAT 20)
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतेच इस्रोचा GSAT-N2 नावाचा उपग्रह SpaceX ने लॉन्च का केला. SpaceX या कंपनीची स्थापना खालील पैकी कोणी केली ?
1. मार्क झुकरबर्ग
2. जेफ बेजोस
3. स्टीव जॉब्स
4. एलन मस्क
उत्तर : एलन मस्क (Elon Musk)
बातमी काय आहे ?
भारताचा GSAT-N2 (GSAT-20) संचार उपग्रह SpaceX च्या Falcon-9 रॉकेटद्वारे नुकताच यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.
GSAT-N2 उपग्रह कोणी तयार केला ?
• न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ने हा उपग्रह तयार केला आहे.
• न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत इस्रोची व्यावसायिक शाखा आहे.
GSAT-N2 उपग्रह नेमकं काय काम करणार ?
• GSAT-N2 एक संचार उपग्रह (Communication Satellite) आहे.
• या उपग्रहाचे वजन 4700 किलो आहे.
• GSAT-N2 हा उपग्रह 14 वर्षांच्या मोहिमेसाठी तयार करण्यात आला आहे.
• GSAT-20 उपग्रह विशेषत: दुर्गम भागातील दळणवळण प्रणाली सुधारण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
• याच्या मदतीने दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवता येईल.
• अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप सारख्या दुर्गम प्रदेशांत देखील यामुळे इंटरनेट सुविधा उपलब्ध करता येईल.
• तसेच या उपग्रहामुळे लोकांना विमानातही इंटरनेट सेवा मिळू शकणार आहे.
• भारतातील स्मार्ट शहरांसाठी दळणवळण पायाभूत सुविधा वाढवेल.
• यात 48 Gbps च्या स्पीडने इंटरनेट सुविधा मिळेल.
GSAT-N2 उपग्रह इस्रोने लॉन्च का केला नाही ?
त्यासाठी फाल्कन-9 रॉकेट का निवडले ?
• जिओ स्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये GSAT-N2 उपग्रहाची स्थापना करायची आहे.
• आपल्या पृथ्वीपासून सुमारे 35,786 किलोमीटर उंचीवर असलेल्या कक्षेत (जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये) हे यान अंतराळात पाठवण्यात आले आहे.
• ISRO चे मार्क-3 प्रक्षेपण वाहन या कक्षेत 4,000 किलो ग्रॅम पर्यंतच्या वजनाचा पेलोड ठेवू शकते.
• GSAT-N2 चे वजन 4,700 किलो ग्रॅम असल्यामुळे SpaceX या कंपनीच्या फाल्कन-9 (Falcon-9) रॉकेटची निवड करण्यात आली.
SpaceX या कंपनीची स्थापना कोणी केली ?
SpaceX ही कंपनीचे CEO कोण आहे ?
• एलन मस्क (Elon Musk) यांनी 2002 मध्ये SpaceX (स्पेस एक्स) या कंपनीची स्थापना केली.
• SpaceX या कंपनीचे CEO एलन मस्क हे आहेत.
• एलन मस्क (Elon Musk) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
एलन मस्क (Elon Musk) यांच्या काही महत्त्वाच्या कंपन्या :
• Tesla (टेस्ला) : इलेक्ट्रिक कार कंपनी
• Twitter (ट्विटर) : 2022 मध्ये एलन मस्क ने ट्विटर ही कंपनी खरेदी केली तिचे नाव बदलून X ठेवण्यात आले.