स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू | PANDIT JAWAHARLAL NEHRU
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन 🙏💐
Subject : GS - आधुनिक भारताचा इतिहास, दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात काँग्रेसने ऐतिहासिक पूर्ण स्वराजाचा ठराव मंजूर केला ?
1) कराची अधिवेशन
2) लाहोर अधिवेशन
3) लखनौ अधिवेशन
4) फैजपूर अधिवेशन
उत्तर : लाहोर अधिवेशन (१९२९)
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
जन्म आणि शिक्षण :
• पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये अलाहाबाद येथे झाला.
• त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे बॅरिस्टर होते आणि त्यांनी दोनदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले होते.
• पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरुवातीचे शिक्षण घरी खाजगी शिक्षकांकडून घेतले.
• त्यानंतर केंब्रिज विद्यापीठातून नैसर्गिक विज्ञानात (natural sciences) पदवी प्राप्त केली.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान :
• 1912 मध्ये एक प्रतिनिधी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसच्या अधिवेशनात उपस्थित राहिले.
• 1916 मध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले आणि महात्मा गांधींच्या विचारांनी ते खूपच प्रभावित झाले.
असहकार चळवळ (1920-1922)
• नेहरूंनी प्रांतीय काँग्रेस सचिव म्हणून संयुक्त प्रांतांमध्ये राजकीय मोर्चे आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
• असहकार चळवळीतील सहभागमुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
मिठाचा सत्याग्रह (1930)
• 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहादरम्यान एका मोठ्या मोर्चाचे नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले.
• मीठ कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
वैयक्तिक सत्याग्रह (1940-1941)
• ब्रिटिश राजवटीविरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराची (Right to Free Speech) मागणीसाठी गांधींजींनी 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला.
• विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही तर पंडित जवाहरलाल नेहरूंना दुसरे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवडण्यात आले.
भारत छोडो आंदोलन (1942)
7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील अधिवेशनात ऐतिहासिक ‘भारत छोडो’ ठराव मांडल्यानंतर नेहरूंसह काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली.
![[ Ashakar Chalval, Non Cooperative Movement, 1920-1922, Mitacha Satyagraha, Salt Satyagraha, 1930, Vyaktik Satyagraha, 1940-1941, Bharat Chodo Andolan, 1942 , 7-August-1942, right-to-speech, saha-mahine-turung ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Pandit_Jawaharlal_Nehru_3_1732104277847.webp)
काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान :
लाहोर अधिवेशन (१९२९)
• १९२९ ला लाहोर अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्यांदा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले.
• त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ऐतिहासिक पूर्ण स्वराज ठराव मंजूर केला, ज्यामध्ये ब्रिटिश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली.
• अधिवेशनाचे शेवटच्या दिवशी 31 डिसेंबर 1929 च्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी रावी नदीकाठी तिरंगा झेंडा फडकविला.
लखनौ अधिवेशन (1936) :
• 1936 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनात जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसजनांना समाजवाद स्वीकारण्याचे आवाहन केले.
• समाजवादाचा प्रथम उल्लेख लखनौ अधिवेशनात करण्यात आला.
फैजपूर अधिवेशन (1937) :
• 1937 मध्ये, नेहरूंनी फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले.
• जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे पार पडलेल्या अधिवेशन हे ग्रामीण भागात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पहिले अधिवेशन होते.
![[ Lahore Adiveshan, 1929, Lucknow Adiveshan 1936, Faizapur Adiveshan 1937 ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Pandit_Jawaharlal_Nehru_4_1732104520286.webp)
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान :
• पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते.
• 15 ॲागस्ट 1947 ते 27 मे 1964 पर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते.
• या सुरुवातीच्या काळात त्यांच्या नेतृत्वाने देशाच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्राला आकार दिला,.
• औद्योगिकीकरण, सामाजिक सुधारणा आणि धर्मनिरपेक्ष लोकशाहीची स्थापना यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.
• पंडित नेहरूंच्या सरकारला दोन मोठ्या युद्धाचा सामना करावा लागला.
• 1947-48 मध्ये पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धा सामना करावा लागला.
• 1962 मध्ये भारत-चीन सीमावादावरून भारत-चीन युद्ध झाले.
महत्वाचे पुरस्कार आणि सन्मान :
• शीत युद्धात अमेरिका व सोवियत रशिया यांपैकी कोणाच्याही बाजूने भाग न घेता भारताची अलिप्त भूमिका जगासमोर प्रखरतेने मांडली. याचमुळे त्यांना अलिप्तवादाचे ( Non-Aligned Movement ) पुरस्कर्ते म्हणूनही ओळखले जाते.
• 1955 मध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
• त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून गौरविण्यात आले.
• त्यांचा जन्मदिवस देशभरात बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
• निधन : 27 मे 1964 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे काही प्रमुख साहित्य :
‣ लेटर्स फ्रॉम फादर टू हिज डॉटर
‣ ॲन ॲाटोबायोग्राफी
‣ द डिस्कवरी ऑफ इंडिया
![[ letters-from-a-father-to-his-daughter, jawaharlal-nehru-an-autobiography, the-discovery-of-india ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Pandit_Jawaharlal_Nehru_Books_1732104609218.webp)