
चालू घडामोडी 15, नोव्हेंबर 2024 | Mobility Arrangement for Talented Early-Professionals Scheme
![[ renewable energy, mining, engineering, Information Communications Technology (ICT), Artificial Intelligence (AI), Financial Technology (FinTech) and Agricultural Technology (AgriTech), Mobility Arrangement for Talented Early-professionals Scheme, yojneche uddisht, yojnecha fayda, yojneche vaishisht, study in abroad, shikshan, dusrya deshat shikshan, foreign education scholarship, foreign countries job opportunity, videshat nokri, visa, visa application, passport, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/MATES_1732200627839.webp)
प्रतिभावंत उदयोन्मुख व्यावसायिकांसाठी गतिशीलता व्यवस्था योजना
Mobility Arrangement for Talented Early-Professionals Scheme
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच कोणत्या देशाने भारतीय विद्यापीठाच्या पदवीधरांना MATES योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अनुभव मिळविण्यासाठी 2 वर्षे काम करण्याची संधी देण्यात आली आहे ?
1. अमेरिका
2. श्रीलंका
3. जपान
4. ऑस्ट्रेलिया
उत्तर : ऑस्ट्रेलिया
बातमी काय आहे ?
ऑस्ट्रेलियाने मोबिलिटी अरेंजमेंट फॉर टॅलेंटेड अर्ली-प्रोफेशनल्स स्कीम (MATES) सुरू केली आहे, ज्यामुळे भारतातील प्रतिभावान तरुण व्यावसायिकांना एका विशिष्ट कालावधीसाठी ऑस्ट्रेलियात काम करता येईल.
MATES म्हणजे काय ?
• MATES - Mobility Arrangement for Talented Early-Professionals Scheme
• MATES म्हणजे प्रतिभावंत उदयोन्मुख व्यावसायिकांसाठी गतिशीलता व्यवस्था योजना
• या योजनेअंतर्गत भारतीय विद्यापीठाच्या पदवीधरांना आणि करिअरच्या सुरुवातीच्या व्यावसायिकांना ऑस्ट्रेलियामध्ये 2 वर्षे काम करण्याची संधी देण्यात येते.
• 23 मे 2023 रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात स्वाक्षरी झालेल्या स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी व्यवस्था (MMPA) अंतर्गत ही योजना लॉन्च करण्यात आली आहे.
MATES योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करून तरुण प्रतिभावान व्यक्तींना करिअरच्या संधी शोधण्यासाठी, आंतरराष्ट्रीय अनुभव मिळविण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उद्योगांमध्ये योगदान देण्यास सक्षम करणे हे MATES चे उद्दिष्ट आहे.
MATES योजनेसाठी शैक्षणिक पात्रता कोणती असावी लागते ?
अर्जदारांनी खालील क्षेत्रात बॅचलर पदवी किंवा उच्च पदवी धारण करणे आवश्यक आहे:
• अक्षय ऊर्जा ( Renewable Energy )
• खाणकाम ( Mining )
• अभियांत्रिकी ( Engineering )
• माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान ( Information Communications Technology )
• कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI - Artificial Intelligence )
• आर्थिक तंत्रज्ञान ( Financial Technology - (FinTech) )
• कृषी तंत्रज्ञान ( Agricultural Technology (AgriTech) )
पदवी अर्ज केल्यापासून दोन वर्षांच्या आत असावी .
MATES योजनेचा फायदा काय ?
• 2 वर्षांपर्यंत ऑस्ट्रेलियात राहण्याची आणि काम करण्याची संधी.
• व्यावसायिक कौशल्ये आणि नेटवर्कचा विस्तार करता येईल.
• अभ्यासाच्या क्षेत्राबाहेर काम करण्याची लवचिकता.
• ऑस्ट्रेलियात मुक्कामादरम्यान किंवा नंतर इतर तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी व्हिसासाठी अर्ज करण्याचा पर्याय.